*प्रपंचाची भावना कशी असते ? संत तुकोबाराय सांगतात,*
(संकलन आनंद पाटील)
" वाढावे संतान । गृही व्हावे धन धान्य | ल्यावे खावे, बरवे असावे सदैव हीच धरी हाव संसारी ॥ "
*मात्र मंदिरात जायचा त्याला शीण होतो, चव्हाट्यावर गप्पा*
*मात्र मोठ्या अत्यादराने करतो. उपासना करत नाही पण उचापती मात्र खूप.करतो, सुगंध सोडून माशी जशी दुर्गंधीच पसंत करते ना ?तसं* *हा भाग्यहीन.भगवंत नको म्हणतो, त्याला विसरतो. सगळ्या संतांनी याबाबतीत* *खूप प्रहार केलेत. अगदी कळवळ्याने, पोटतिडकीने त्यांनी आपल्याला प्रबोधन केलं आहे. काय थोर आश्चर्य* *आहे पहा ना, स्वहिताचा म्हणजे परमार्थाचा जरासुद्धा विचारच करत नाहीत. असं काय बळ आहे ? कोणाचा* *भरवसा आहे ? काय दम आहे ? शेवटी कोण कामास येणार आहे ? कशाची निश्चिंतीआहे ? यमदूत* *आल्यावर काय जाब देणार ? मरणं कसं विसरली आहेत ?* *देवकीनंदनाला का बरे* *आठवत नाहीत ? त्या एका* *चक्रपाणीला का बरे विसरली आहेत, की जो या भवबंधनातून*
*आपल्याला सोडवणारा आहे. केवळ उदरंभरणापलीकडे कशाचा विचारच नाही.*
*संतांनी ग्यानबाची मेख सांगितली पहा. उदरनिर्वाह सोडा, प्रपंच सोडा असं नाही सांगितलं. तर एवढंच मात्र ठासून सांगतात केवळ पोटपूजा, प्रपंच करण्यात आयुष्य घालवणं ही नागवण आहे, फसगत आहे. पोटापुरता प्रपंच*
*करा तो 'आवश्यक आहे पण तो परमानंद त्याला या मायेच्या प्रपंचात विसरू नका." म्हणजेच शरीर प्रपंचाला द्या पण तुमचे मन, हृदय त्या परमपरमात्म्याच्या चरणी स्थिर राहू द्या. आणि त्यासाठीच त्या भगवंतांचे गोड नाम सदा, नित्य मुखी असो द्यावे .
No comments:
Post a Comment