श्रीराम,
अध्यात्म हे सत् चित् आनंदाशी निगडित आहे. या सच्चिदानंदाचे लागेबांधे आपल्या सत्प्रवृत्तीशी व सत्कर्माशी जोडलेले असतात. शुद्ध सात्विकता असेल तर आनंद तिथे असतोच असतो. असा हा स्वसंवेद्य आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सर्व साधनांचा आटापिटा करावा लागतो आणि या साधनांमध्ये विवेक फार महत्वाचा असतो.
पाण्यात पोहताना कानात जर सोन्याच्या रिंगा असतील तर पोहताना सारखे लक्ष रिंगांकडेच रहाते. अरे पाण्यात तर पडल्या नाहीत ना? आहेत ना? आणि हे बघण्यात.. या सोन्याच्या रिंगांमध्ये जीव गुंतल्याने पोहण्याचा मनमोकळा आनंद घेता येत नाही.
अगदी त्याचप्रमाणे संसारात जीव गुंतला असेल तर अध्यात्माचा अभ्यास मनापासून होत नाही. संसारात आसक्ती ठेवून अभ्यास म्हणजे नुसते पाण्यात डुंबणे तर संसारात अनासक्ती ठेवून केलेला अभ्यास म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती होय. अध्यात्माच्या अथांग सागरात विनासायास पोहण्यासाठी आवश्यक असलेले दोन टायर म्हणजे विवेक आणि वैराग्य!
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment