साधन आणि शरणांगती यांच्या आड आपला अहंकार येतो. मी करतो म्हणून होणारी ती गोष्ट नाही. त्यांनी सांगितले म्हणून करतो एवढाच भाव पाहिजे. हीच श्रद्धा. शेवटी साध्य आणि साधन एकच आहे. पण ते शेवटी आहे , सुरवातीला नाही आणि हे विचाराने समजणारे नाही.
आपला विचार शुद्ध नसतो. त्यात विकल्प असतो. आपण इंद्रियांच्या द्वारा आनंद घेतो, रस घेतो तो दृश्यातला असतो. तसा नामातून रस आला, नामाची गोडी लागली की जाणीव सूक्ष्म होण्यासाठी आवश्यक तेवढे नामसाधन आपोआप होईल.
विषयातून मिळणाऱ्या सुखापेक्षा वरच्या दर्जाचे दु:खविरहीत शाश्वत सुख आहे आणि ते नामसाधनेने मिळते असे संत सांगतात. साधन करताना त्या आनंदाची थोडी झलक मिळाली तरी मग साधकाला आणखी नाम घे म्हणून सांगावे लागणार नाही.
No comments:
Post a Comment