*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*श्रीराम! सत्पुरुषाची संगत हा आयुष्यातला एक दुर्मिळ योग आहे. पण ही संगत नुसती देहाची नसून त्याच्या विचारांची संगत आहे. म्हणून महाराजांची संगत म्हणजे नामाची संगत!*
*महाराज म्हणत, नाम घेताना आपल्या घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा; घरी आल्यावर कसं शांत वाटतं! तसं प्रपंचात कितीही खटपटी करा; नामाला बसल्यावर असं शांत वाटलं पाहिजे.*
*एकत्र नामजपाचं महत्त्व त्यामुळे मिळणाऱ्या सत्संगतीमध्ये आहे. महाराज तर म्हणत, सत्पुरुषाच्या संगती एवढंच किंबहुना त्याहून अधिक साधकाला साधकाची संगत महत्त्वाची आहे. कारण त्याला ज्या सद्गुरू / भगवंताबद्दल प्रेम, त्याच्या संगतीत आपलं प्रेम अजून वाढतं. आणि तो साधक आपल्या सारखाच प्रापंचिक अडीअडचणीतून गेला असल्यामुळं तो आपल्याला समजू शकतो ना! त्याचा आपलं साधन वाढवायला उपयोग करून घ्यावा.*
*~ परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन सारांश*
No comments:
Post a Comment