श्रीराम,
या गतीमान जीवन प्रवाहात हव्यासापोटी चाललेला माणसाचा कर्मयोग म्हणजे 'सश्रम कारावास च'! खरे तर आपले लौकिक जीवन म्हणजे एक प्रकारची स्वप्नावस्था आहे असे संत सांगतात. कारण कोणत्याही व्यक्तीचे सान्निध्य हे केवळ प्रारब्धानेच काही काळ लाभते. उजाडलेला दिवस संपला की तो दिवस आणि त्यात घडलेले सर्व काही भोग हे भूतकाळात जमा होतात. ह्या बेभरवशाच्या विनाशवान अवस्थेप्रत नेणाऱ्या क्षणभंगुरत्वातून आपल्या देहाचीही सुटका नाही. मात्र ज्यामुळे आपले अस्तित्व जाणवते ती दिव्य सच्चिदानंद चैतन्यसत्ता आपल्या प्रत्येकाच्या आत निवास करून आहे. त्या दिव्य आनंदाचा शोध व प्राप्तीने होणारा बोध आपल्या सर्वांना करून घ्यायचा आहे. सच्चिदानंद मधील आनंद म्हणजे आत्मानंद. सत् प्रचिती म्हणजेच आत्मप्रचिती आणि सत वैभव म्हणजेच आत्मवैभव!
हे आत्मतत्त्व ज्याला गुरूकृपेने आत्मसात झाले तो पुनरपि जननं पुनरपि मरणम् या चक्रातून बाहेर पडतो.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment