TechRepublic Blogs

Sunday, June 8, 2025

नामजपाचं महत्त्व

 श्रीराम! सत्पुरुषाची संगत हा आयुष्यातला एक दुर्मिळ योग आहे. पण ही संगत नुसती देहाची नसून त्याच्या विचारांची संगत आहे. म्हणून महाराजांची संगत म्हणजे नामाची संगत! 


महाराज म्हणत, नाम घेताना आपल्या घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा; घरी आल्यावर कसं शांत वाटतं! तसं प्रपंचात कितीही खटपटी करा; नामाला बसल्यावर असं शांत वाटलं पाहिजे. 


एकत्र नामजपाचं महत्त्व त्यामुळे मिळणाऱ्या सत्संगतीमध्ये आहे. महाराज तर म्हणत, सत्पुरुषाच्या संगती एवढंच किंबहुना त्याहून अधिक साधकाला साधकाची संगत महत्त्वाची आहे. कारण त्याला ज्या सद्गुरू / भगवंताबद्दल प्रेम, त्याच्या संगतीत आपलं प्रेम अजून वाढतं. आणि तो साधक आपल्या सारखाच प्रापंचिक अडीअडचणीतून गेला असल्यामुळं तो आपल्याला समजू शकतो ना! त्याचा आपलं साधन वाढवायला उपयोग करून घ्यावा. 


~ परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन सारांश

No comments:

Post a Comment