महाराजांचा कर्मयोग
जे कर्म केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपल्याला ईश्वरप्राप्ती होते, असे कर्म करत रहाणे म्हणजे ‘कर्मयोग’. कर्म, मग ते व्यवहारातील का असेना, त्या योगे चित्तावर संस्कार होऊ न देता संस्कारबंधनातून कायमची सुटका करून घेणे, हे कर्मयोगात अभिप्रेत आहे.
धर्मशास्त्राला अपेक्षित असे कर्म आसक्ती आणि फलाशा त्यागून करणे, किंवा आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हा तुझा धर्मच आहे त्यानुसार तू कर्म करत राहावे परंतु कर्म करताना तू फलप्राप्तीची अपेक्षा बाळगू नकोस किंबहुना तुला फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकारच नाही असे भगवंत सांगतात. बऱ्याचदा फळाची अपेक्षा न करिता कर्म करीत राहणे हे तत्व सामान्य माणसाच्या व्यवहारी मनाला पटत नाही. काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी करणे म्हणजे निरर्थक कर्म करणे असा एक विचार बाळगणारे अनेक लोक असतात.
महाराज हेच सोप्या भाषेत सांगतात " तूमचे प्रत्येक कर्म हे भगवंताने तूम्हावर सोपवलेले कर्म समजून करा. दिवसभरात जे काही काम आपण करतो ते भगवंताने आपल्यावर सोपवले आहे असे समजून करावे. व्यावहारीक कर्मे करावी. पण भगवंतासाठी करतो हि बुद्धी ठेवावी. मग प्रत्येक कृती त्याचीच सेवा होईल रामाला साक्ष ठेवून कर्म करावे.
म्हणजे रामाच्या अस्तित्वाचे भान राहील आपली प्रत्येक कृति ते पाहात आहेत असे वाटू लागले कि त्यांच्यासमोर करायला ज्याची लाज वाटेल असे कर्म माणसाच्या हातून घडणारच नाही प्रत्येक कर्म झाल्यावर भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे .
No comments:
Post a Comment