आपण एक गोष्ट विसरतो. स्वार्थ आसक्ती ममत्व हे सगळे देहबुध्दीतून येते. ती गेल्याखेरीज निस्वार्थी प्रेम करता येणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराजानी ते करून दाखविले.
आपणहून त्यांनी आंधळी बाईशी लग्न केले. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तेव्हा त्यांच्या सुश्रुषेसाठी श्रीमहाराजांनी दोन कुळंबीणी ठेवल्या. पु.श्री भटजीबापू यांची दोन तीन मुले गेली. त्यांनतर त्यांचा कर्ता सवरता मुलगा गेला तेव्हा ते म्हणाले सोबत चांगली होती. असो पांडुरंगाची इच्छा.
मला पुत्रवियोगाची सवय आहे. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांची पत्नी गेल्याचे त्यांना समजले तेव्हा जीवनातला एक भाग संपला .माणसाने अशी दुःखे शांतपणे सहन करावयाची असतात असे उदगार त्यांनी काढले. स्वतःच्या संसाराकडे मुलाबळांकडे इतके तटस्थपणे पाहणे देहबुद्धी गेल्याखेरीज शक्य नाही. याला दोन मार्ग आहेत.
एक विवेक पण हा सतत जागृत हवा व दुसरा हे सगळे भगवंताने दिलेले आहे. मीही त्याचाच आहे. त्याला पाहिजे तसे आणि पाहिजे तोपर्यंत तो ठेवील अशी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. तसे हे सर्व कठीणच आहे तथापि भगवंतावर किंवा सद्गुरूंवर अवलंबून राहण्याची कला जमली तर सगळे सोपे आहे.
No comments:
Post a Comment