TechRepublic Blogs

Monday, June 30, 2025

मृत्यूला आमंत्रण

 एक पोस्ट आयुष्य वाचवण्यासाठी -


2005 साली मिरज मेडिकलमध्ये असताना माझी वर्गमैत्रीण होती मुंबईची चित्रा गुप्ता. माझा आणि तिचा रोल नंबर आडनावामुळे शेजारी होता म्हणून वर्गापासून परिक्षेपर्यंत सगळीकडे ती शेजारी दिसायची. पावसाळ्यात वर्गातल्या काही मित्रमैत्रिणीसोबत चित्रा ठोसेघरचा धबधबा पाहायला गेली. तिथे छोट्याश्या डोहात ती पोहायला येत नसताना उतरली आणि होत्याचं नव्हतं झालं. डोहात की प्रवाहात ती बुडाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी मिळाले तिचे प्रेत. मला ही बातमी कळली त्यावेळी मी गोव्यात होतो आणि त्यावेळी मला अश्रू आवरले नाहीत. चित्राच्या आईवडिलांनी तिच्या आठवणीत त्या धबधब्या शेजारी लावलेला बोर्ड आजही आहे.


चित्राच्या अपघातानंतर आमच्या कॉलेजने वर्षभर सहली बंद केल्या. त्यानंतर ज्युनिअर बॅचच्या मुलांनी खुप आग्रह करून एका बीचवर (बहुदा गोव्यात) सहल आयोजित करण्यासाठी कॉलेज प्रशासनाला भाग पाडले. त्या सहलीत मुलेमुली बीचवर पाण्यात खेळत असताना एका मोठ्या लाटेच्या फटक्यात सहासात मुले पाण्यात ओढली गेली. पुढच्या लाटेत त्यातली काही मुले बाहेर आली पण दोघेजण कमनशिबी ठरले आणि त्यांचा त्यातच अंत झाला. ही बातमी जेव्हा आम्हाला कळली तेव्हा मी आमच्या डीन सरांच्या बंगल्यावर त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी मी डीन सरांच्या डोळ्यात पाणी पाहिले होते.


गेल्या आठवड्यात लोणावळ्यात अख्खं कुटुंब वाहून जाताना, भुशी धरणात एक पट्टीचा खेळाडू बुडून वाहत जाताना जेव्हा व्हिडिओ पाहिले तेव्हा जुन्या वाईट आठवणी परत एकदा जाग्या झाल्या. पावसाळ्यात समुद्र, धबधबे, ओढे, नद्या ही निसर्गाची रूपे मोहक वाटत असली तरी ती प्रत्यक्षात अक्राळविक्राळ असतात हे वैज्ञानिक सत्य बहुतांश लोकांना माहीत नसते. पाण्याचा अगदी उथळ वाटणारा प्रवाह जेव्हा पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहतो तेव्हा तो गाडीची चाके आणि रस्ता यातले घर्षण संपवून टाकतो आणि गाडी अगदी कमी वेगात असतानाही पुलावरून, रस्त्यावरून अलगद खाली घसरत जाऊन मोठे अपघात होतात. एक्सप्रेस महामार्गावर स्पीड लिमिट ट्रॅफिकचे चलन काढण्यासाठी नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे हे समजून घ्या!


नदीत, धबधब्यात, ओढ्यात अगदी गुडघाभर पाणी असताना आपण खूप आनंदाने त्यात उतरतो, पण जेव्हा वर डोंगरात पाऊस सुरू असतो तेव्हा क्षणात flash flood येतो आणि आपल्याला वाहवून नेत संपवून टाकतो. धबधब्याखाली अंघोळ करताना जेव्हा पाण्याचा प्रवाह नव्याने सुरू होतो किंवा अचानक वाढतो तेव्हा वरून दगड निसटून खाली येतात आणि गुरुत्वाकर्षण आणि पाण्याच्या प्रवाहाच्या वेगासोबत ते अजून घातक बनत आपल्या डोक्याची कवटी फोडू शकतात... अगदी छोटे दगडसुद्धा! त्यामुळे कुठेही थेट वरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात खाली उभे राहणे हे मृत्यूला आमंत्रण आहे! पट्टीचे पोहणारे लोकही flash flood मध्ये पोहू शकत नाहीत!


तेव्हा सर्वांना विनंती आहे की पर्यटनाच्या, साहसी ट्रेकच्या, रोमांसच्या, थ्रीलच्या धुंदीत निसर्गाशी पंगा घेवू नका... निसर्ग physics च्या नियमांनी चालतो, आपल्या भावनांना तो किंमत देत नाही. भीती वाटणे हे आपले जीव वाचवणारे नैसर्गिक डिफेन्स तंत्र आहे. भीती वाटण्याची लाज वाटू देवू नका. निसर्गाच्या बाबतीत "डर के आगे जीत" नसते... मौत असते! स्वतःही समजून घ्या आणि आपल्या जिवलग लोकांना समजवा!!


- डॉ. विनय काटे

Saturday, June 28, 2025

शाश्वत समाधान

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल.परमार्थ खालील तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधेल.पहिली म्हणजे देहाने साधूची संगत.दुसरी म्हणजे संताच्यां वांड्गमयाची संगत व त्याप्रमाणे आचरण.आणि तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण.नाम *घेतल्याने त्यांची संगत आपल्याला अखंड लाभू शकते.संतांना सांगितले ते संशय *न घेता विश्वासाने करणे पहिली पायरी.आणि पुढे ते निश्चयानं करणे श्रध्देने आणि प्रेमाने चालू *ठेवणे ही शेवटची पायरी.हाच *शाश्वत समाधानाचा मार्ग आहे."*


*🪷श्रीमहाराज🪷*

Friday, June 27, 2025

लोभ

 लोभाची गंमत आहे अशी की लोभ चिकटतो. ज्याच्यावरती लोभ असतो ना तिथे त्या वस्तूवर आपण चिकटतो. भगवंताचा लोभ लागल्यावर तो अमर्याद हवा. अन्यथा लोभ ही आसक्ती आहे. सगळ्या पापाचं कारण लोभ आहे. श्री.तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.

"विषयी विसर पडिला निःशेष

अंगी ब्रम्हरस ठासावला 

माझी मज झाली अनावर वाचा

छंद या नामाचा घेतलासे

लाभचिया सोसें पुढे चाले मना

धनाचा कृपण लोभ जैसा 

तुका म्हणे गंगासागर संयमी

अवघ्या जाल्या उर्मी एकमय

नामाने ,  विषय म्हणजे हे  दृश्य याचा विसर पडला आणि अंगात ब्रम्हरस भरून राहिला. मग भगवंताच्या नामाचा छंद घेतला  तो इतका की मला माझीच वाचा अनावर झाली की जसे  एखादा पैशाचा लोभी माणूस असला की सारखा पैसा पैसा करतो.तसं त्या ब्रह्मरसाचा आनंद भोगता भोगता माझं मन पुढे पुढे जाते. पुढे म्हणतात ती गंगा आहे सागर आहे , परमात्मा , ते दोघे एकत्र मिसळल्यामुळे वेगळेपण राहिलेच नाही. तसं मला ना लोभ झाला आहे. त्यामुळे सारखे परमात्मा पाहिजे त्याची संगत पाहिजे  हा लोभ झाला आहे. आपल्याला आपल्या गुरूंच सहवास एकसारखा मिळावा हे सारखं राहणं भक्तीच लक्षण आहे. 

कितीही सहवास केला तरी समाधान नाही. परमार्थात अहंकार नाहीस झाल्याशिवाय भक्त नाही. पण भक्तीमध्ये अहंकाराचे उदात्तीकरण होते. भक्त म्हणतो काय तर आम्ही भगवंताचे आहोत , आम्ही भगवंताचे भूषण आहोत.

 श्री.समर्थानी दास्य भक्तीचे उदात्तीकरण केले. दास कोणाचा तर रामाचा. तसं उदात्तीकरण होते याच्या अहंकाराचे. मी त्याचा आहे ना मग अहंकार काय तर मी त्याचा भक्त आहे .

Thursday, June 26, 2025

तत्वदृष्टी

 जगामधील जीवप्राण्यांच्या अंतर्यामी जी चेतना वास करते तोच खरा ईश्वर आहे या भावनेने वागणे ही तत्वदृष्टी होय. तत्वदृष्टीच्या दोन पायऱ्या आढळतात. एक मानव देहधारी सगुण ईश्वर आणि दुसरा निर्गुण ईश्वर. 

सगुणामध्ये विष्णू राम, कृष्ण, शंकर इ. देवता मानव रूपधारी असतात. पण त्या माणूस नसून ईश्वरी चितशक्तीची रूपे मानली जातात. 

या देवतांपैकी कोणती तरी एक देवता आपल्या मनोरचने प्रमाणे माणसाला आवडते. तोच त्याचा ईश्वर होतो. मग तो आहे व सर्वांगाने पूर्ण आहे, तो अनंत रूपे घेऊन जगात वावरतो तो आपला स्वामी व रक्षणकर्ता आहे, त्याला आवडते ते करणे, त्याच्या स्मरणात राहणे हीच त्यांची सगुण भक्ती, या भावनेने जगणे हीच त्यांची सगुण उपासना. ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाची उपासना सगुणाच्या उपासनेतूनच उदय पावते. खरे म्हणजे ईश्वराला देह नाही . 

पण एकीकडे तो विश्वनिर्माण करतो ,पाळतो व संहार ही करतो. तोच विश्वाचे स्वयंभू आदीकारण असून सर्वोत्तम आहे. तोच जगाचा अंतरात्मा असून त्याच्याच इच्छेने जग चालते. हे विश्व आणि सारी विश्वे त्याच्या ठिकाणी आहेत.  तेवढ्याने तो संपत नाही. त्याच्या पालिकडे तो किती आहे ते कोणालाच कळले नाही व कळणारही नाही.

इच्छामरण

 *जातानाचे शब्द*

जीवन आनंदगावकर - सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा सुंदर लेख..


"मी असा काय गुन्हा केला ?" हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंढे यांच्याजवळ, अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. "अरे, हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू ,भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले. 


एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची  आपल्याला अतिशय उत्सुकता असते. एखादे वयोवृद्ध गेल्यावर जेंव्हा नातेवाईक भेटायला येतात तेंव्हा "काय म्हणाले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते. 


अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. 


शेवटच्या आजारपणात माझ्या पत्नीला ॲटॅक आला तेव्हा कार पळवित मी हॅास्पिटलला गेलो. तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना ती एवढेच म्हणाली की,"उशीर झाला". तेचं तिचे शेवटचे शब्द ठरले.


जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच, तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 


सगळी कल्पना असते आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात. पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फ़ॅशन चे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतांनाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. मृत्यू समोर दिसायला लागतो तेंव्हा ही भावना बोथट होते. 


प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेंव्हा जगायचे असते तेंव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेंव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. 


भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे,


दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।


आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. 

पण काहीकाही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. 


सामाजिक कार्यकर्ते ग प्र प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळभात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. 


पु लं नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 


सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ? 


सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांना स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना त्यांनी नर्सकडून एक कागद मागून घेतला आणि त्यावर लिहिले,"आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही". तोच त्यांचा शेवटचा संदेश होता.


"आनंद"चित्रपटात राजेश खन्नाला कॅन्सर दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनात तो कॅन्सरनेच गेला. त्याचे मरतानाचे शब्द होते,"पॅक अप".


शेवटच्या आजारपणात मी वडिलांना भेटायला गावी गेलो. मी परत निघताना फक्त एवढंच म्हणाले, "लवकरच माझ्यासाठी तुला दीर्घ रजा घ्यावी लागेल". पुढे  पंधरा दिवसांनी ते गेले.मी त्यांचे ऐकलेले तेच दोन शब्द!


माझा मुलगा अभिजित अलिकडेच पणजी येथे विषारी जेली फिशचा दंश होऊन गेला. मेडिकल हॅास्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेताना मी त्याच्यासोबत होतो. तो मला म्हणाला,"सगळं संपलय"! तेचं त्यांचे शेवटचे शब्द ठरले. तो पुन्हा शुद्धीवर आला नाही.


अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! 


व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे अहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. 


ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 


माझ्या आवडत्या शिक्षकांना व त्यांच्या पत्नीला दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला. 


ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.


*- जीवन आनंदगावकर*

सेवानिवृत्त न्यायाधीश

Wednesday, June 25, 2025

अहंकार

 साधन आणि शरणांगती यांच्या आड आपला अहंकार येतो. मी करतो म्हणून होणारी ती गोष्ट नाही. त्यांनी सांगितले म्हणून करतो एवढाच भाव पाहिजे. हीच श्रद्धा. शेवटी साध्य आणि साधन एकच आहे. पण ते शेवटी आहे ,  सुरवातीला नाही आणि हे विचाराने समजणारे नाही.

 आपला विचार शुद्ध नसतो. त्यात विकल्प असतो. आपण इंद्रियांच्या द्वारा आनंद घेतो, रस घेतो तो दृश्यातला असतो. तसा नामातून रस आला, नामाची गोडी लागली की जाणीव सूक्ष्म होण्यासाठी आवश्यक तेवढे नामसाधन आपोआप होईल.

 विषयातून मिळणाऱ्या सुखापेक्षा वरच्या दर्जाचे दु:खविरहीत शाश्वत सुख आहे आणि ते नामसाधनेने मिळते असे संत सांगतात. साधन करताना त्या आनंदाची थोडी झलक मिळाली तरी मग साधकाला आणखी नाम घे म्हणून सांगावे लागणार नाही.

Tuesday, June 24, 2025

नाम

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*

*श्रीराम! सत्पुरुषाची संगत हा आयुष्यातला एक दुर्मिळ योग आहे. पण ही संगत नुसती देहाची नसून त्याच्या विचारांची संगत आहे. म्हणून महाराजांची संगत म्हणजे नामाची संगत!*


*महाराज म्हणत, नाम घेताना आपल्या घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा; घरी आल्यावर कसं शांत वाटतं! तसं प्रपंचात कितीही खटपटी करा; नामाला बसल्यावर असं शांत वाटलं पाहिजे.*


*एकत्र नामजपाचं महत्त्व त्यामुळे मिळणाऱ्या सत्संगतीमध्ये आहे. महाराज तर म्हणत, सत्पुरुषाच्या संगती एवढंच किंबहुना त्याहून अधिक साधकाला साधकाची संगत महत्त्वाची आहे. कारण त्याला ज्या सद्गुरू / भगवंताबद्दल प्रेम, त्याच्या संगतीत आपलं प्रेम अजून वाढतं. आणि तो साधक आपल्या सारखाच प्रापंचिक अडीअडचणीतून गेला असल्यामुळं तो आपल्याला समजू शकतो ना! त्याचा आपलं साधन वाढवायला उपयोग करून घ्यावा.*


*~ परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन सारांश*

Monday, June 23, 2025

पुण्यसंचय

 एखाद्या कुळामध्ये जन्मास येणारी माणसें बहुधा अध्यातमदृष्ट्या सामान्य असतात. स्वभावाने ती सात्विक असतात. पण प्रपंचात मुलाबाळांत व घरांदारांत त्यांचे मन गुंतलेले असते. मेल्यानंतर ती माणसे फार तर स्वर्गलोकांपर्यंत जातात. 

आसक्तीमुळे कुटुंबाशी त्यांचा मानसिक संबंध राहतो. म्हणून कर्माच्या नियमाप्रमाणे हा ना तो देह घेऊन ती माणसे त्याच कुटुंबात जन्मास येतात.

 पण सर्वांच्या भाग्याने एखादी नाम घेणारी व्यक्ती त्या कुटुंबांत जन्मास येते. अखंड नामस्मरणाने ती  व्यक्ती मोठा पुण्यसंचय करते. त्याचा परिणाम घडून ते सबंध कुटुंब आध्यात्म दृष्ट्या वरच्या पातळीवर जाते. अध्यात्माचा आणि आनुवंशिक संस्कारांचा संबंध आहे यांत शंका नाही.

 परंतु तो फार गुंतागुंतीचा असतो. सात्विक आईबापाच्या पोटी आसुरी प्रवृत्तीची तर उलट तामसी प्रवृत्तीच्या पोटी दैवी प्रवृत्तीची मुले जन्म घेतात. माणसांचा जन्म कोणाच्या पोटी झाला याला महत्त्व नाही. त्याच्यावर संताची कृपा होण्याला महत्व आहे.

Sunday, June 22, 2025

अंतर्ज्ञानी

 सदर हकीगत पू.श्री.गोंदवलेकर महाराजांच्या वाणी स्वरूपातील आहे. श्री.महाराजांचे शिष्य श्री.बापू साहेब मराठे यांनी सांगितली आहे. श्री.बापूसाहेब यांची मुंबईला बदली झाली. त्यामुळे ते वारंवार श्री.महाराजांना भेटायला जास्त असतं. त्यावेळी ते प्रपंचातील अडचण महाराजांना सांगत. 

प्रपंच आणि रडगाणं एकत्रच असतं. ते गुरुं समोर गायचे नाहीतर दुसरीकडे कुठे सांगणार ? आपण आपल्या आईकडे सांगतो ना तसं. तसं ते रडगाणे त्यांनी दोन तीन आठवडे गायले. नंतर त्यांना वाटायला लागले की हे न संपणारे आहे. 

प्रपंचाचा हा गुणधर्म आहे. त्यामुळे त्यांनी हे रडगाणे गाण्याचे थांबवले. त्याबद्दल ते विचारेनासे झाले. श्री.महाराज अंतर्ज्ञानी असल्याने बापूसाहेब दर्शनाला गेल्यावर महाराज रडगाणे उकरून काढायचे. मग ते त्यांना सांगावं लागायचे. 

हे त्यांनी पू.तात्यासाहेब केतकरांना विचारले की " मी काही रडगाणे गात नाही. अस असताना ते उकरून काढतात ? तात्यासाहेबांनी उत्तर दिले " अरे लहान मुलाच्या नाकातला शेंबूड आई ने नाही काढायचा तर कुणी काढायचा?"

 बापूसाहेब म्हणाले समजले नाही. त्यावर तात्यासाहेब म्हणाले " तू रडगाणे त्यांना सांगत नाहीस. पण ते सतत तुझ्या मनात आहे म्हणजे तो शेंबूड आहे. आणि तो सतत असल्याने जपामध्ये येतो आणि व्यत्यय येतो. त्यापेक्षा तो शिंकरून टाकलेला बरा नाही का ?

 मग तो शेंबूड आईनी नको का काढायला ?  त्याप्रमाणे ते तसं उकरून काढताहेत. तुझ्या जपात त्याचा व्यत्यय आहे म्हणून अत्यंत  करूणेपोटी ते तसं करतात."  काय सुरेख स्पष्ट करून सांगितलं.

Saturday, June 21, 2025

गुरुसेवा

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*गुरुसेवा  करणे  म्हणजे  काय ?*


साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करतो ? तर देवाची प्राप्ति व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाहीतर त्याचाच अभिमान होतो, आणि मिळवावयाचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच होत नसते. गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो; तेव्हां माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.


'मला सर्व कळते' असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की, मला सर्व कळते आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एकच झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.


*१८४ .   नामावर  प्रेम  करणे  म्हणजेच  माझ्यावर  प्रेम  करणे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, June 20, 2025

विश्वाचे आर्त

 *विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले..*


विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले ।

अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥


आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें।

नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥


बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला।हृदयीं नीटावला ब्रह्माकारें ॥३॥


*विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।*

*अवघे चि जालें देह ब्रह्म ।*


असे माऊलींनी म्हटले आहे. त्यांची माणसाबद्दलची आस्था, जीवनदृष्टी आणि जगण्याचे प्रयोजन हे सारे यातून स्पष्ट होते. माऊली माणसाला त्याच्या संपूर्ण गुण-दोषांसह स्वीकारतात. एकदा आपले म्हटले, की ते करावे लागते; पण जिथे सांगणे गरजेचे आहे तिथे ते सांगण्यास ते संकोच करत नाहीत; पण सांगणे कसे असावे याचा ते आदर्श वस्तुपाठ घालून देतात.


*भावार्थ -*

"सर्वांच्या हृदयातील आर्तता, सर्वांचे दुःख, माझ्या हृदयात उमटत असते. हे सर्व विश्व माझेच शरीर आहे आणि तेहि पुन्हा ब्रह्ममय आहे, असे मी अनुभवतो. सर्वांना आवडणारे प्रेम मीच होऊन बसलो आहे. आपला प्रीतिभंग होऊ नये, आपले मनोरथ सुफलित व्हावे, याविषयी त्या त्या प्राण्याला जी जी तळमळ वाटते, ती ती सर्व मलाच वाटते."


" मला क्षुद्र म्हणून काही भेटतच नाही. जे भेटते ते आकाशासारखे विशाल आणि महान भेटते- मग तो क्षुद्र मानलेला जंतु का असेना ! असंख्य आकाशें एकमेकांना भेटत आहेत, असे माझे हे अद्भुत दर्शन आहे ! माझ्यासाठी जणू आकाशांची खाणच उघडली आहे !"


"ऋजु - कुटिल नाना वेष घेऊन परमेश्वर लीला करतो, असे म्हणतात. पण माझ्यासाठी कुटिल किंवा वाकडे कुठेच नाही. जे आहे ते ऋजू - नीटच आहे. वरूनवरून काम-क्रोधादिकांनी किंवा द्वेष - ईर्षा असूयादिकांनी प्रेरित होऊन वागताना कुणी दिसले तरी त्यांच्या त्या विकारांच्या मुळाशी शुभाकांक्षाच भरलेली आहे, असे मी त्यांच्या हृदयात प्रवेश करून पाहून घेतले आहे. विकारांच्या मुळाशी असलेली ब्रह्म-प्रेरणा, विकारांची ब्रह्माकारता ओळखल्यामुळे मला सहजच सर्वांविषयी सहानुभूति

वाटते."


*- आचार्य विनोबा भावे*

(ज्ञानेश्वरांची भजनें)

विश्वाचं मिथ्यत्व

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


   *थोडासा विचार करून बघावा. नामाला लागण्याआधी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा राग यायचा, अगदी संताप व्हायचा. दिवस दिवस मन दु:खात होरपळत राहायचं. परंतु आज तशा घटना घडत असतानाही आपण नाम निरंतर घेत असाल तर आपला संताप, नित्य घटनांचा स्वतःवर होणारा परिणाम याची मात्रा निश्चितच कमी झालेली आढळेल. याचाच अर्थ आपण घेत असलेलं रामनाम आपणास विश्वाचं मिथ्यत्व उलगडून दाखवत आहे.

 हे दृश्य विश्व असत्य आहे , अपूर्ण आहे. आम्हाला सत्याकडं, पूर्णत्वाकडं जायचंय आणि त्यासाठी मुखामध्ये भगवंताचं नाम अखंड , निरंतर राहणं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न आहे ते घ्यायचं कसं? रामनामाशिवाय अजून कुठला उपाय नाही का? यावरही आपण विचार करायला हवा. कलियुगाचा प्रभाव असल्यानं असे अनेक प्रश्न आपल्या मनात येणारच.*

*संदर्भ - आनंदसागरा धनी*

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

Thursday, June 19, 2025

अनासक्ती

 

           श्रीराम, 

              संन्याशाची वस्त्रे धारण करून राहण्यापेक्षा संन्यस्त वृत्तीने रहाणे म्हणजे गृहस्थाश्रमातील वानप्रस्थाश्रमच होय. सामान्यपणे असे दिसून येते की कितीही लहान किंवा मोठी व्यक्ती जेव्हा निवृत्त होते तेव्हा तिची आंतरिक अवस्था फार बिकट बनते. अनेक छंद लावून घेऊनही मन कशात रमत नाही. अप्रत्यक्षपणे का होईना परंतु व्यक्तीवर आणि भोवतालच्या परिस्थितीवर आपले येनकेनप्रकारेण नियंत्रण असावे अशी सुप्त मनिषा जोपासलेली दिसते. आपले अस्तित्व दखलपात्र ठरत रहावे ह्यासाठी घरी आणि दारी त्यांचे आटोकाट केविलवाणे प्रयत्न ही चालू असतात. असा मायेचा पसारा आणि तिचा प्रभाव फार विलक्षण असतो.

              जे अवतीभवती दिसते व असते त्याचा एक दिवस आपल्याला निरोप घ्यायचा आहे. काळाच्या ओघात सर्व काही यथावकाश संपणार आहे. हा विवेक सतत जागा असेल आणि सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्याचे ध्येय जर समोर असेल तर प्रत्येक क्षण आनंदात कसा जगायचा हे समजायला लागते आणि हळूहळू या संसारात अनासक्ती निर्माण होऊ लागते. हाच सारासार विवेक होय.

                      ||श्रीराम ||

Wednesday, June 18, 2025

परमार्थ

 श्रीराम समर्थ


         परमार्थाला सोपा उपाय म्हणजे *सद़्गुरूंना आवडेल ते करणे, त्यांना शरण जाणे आणि ते आपल्या जवळ आहेत ही भावना वाढवणे.* आपला निश्चय कमी पडतो व त्यामुळे प्रगती होत नाही. आता उडी घेतली पाहिजे आणि त्याची तर भीती वाटते. *ही भीती घालवण्यासाठी संतांची वचने आणि पदांचे चिंतन करावे.* ते उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे. *कबीराचे 'मन लागो यार फकीरीमें' हे पद बरेच दिवस माझ्या मनात घोळत होते आणि त्याचा मला फायदा झाला.* पुढे जाण्यासाठी प्रेम आणि विचार दोन्ही पाहिजे.


               --------- *प्रा के वि (बाबा) बेलसरे*


               *********

संदर्भ: *अध्यात्म संवाद (भाग-पहिला) पानं १३८*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

Tuesday, June 17, 2025

वासना

 *भावार्थ मनोबोध (भाग २)*

*श्री रविंद्रदादा पाठक*

संकलन आनंद पाटील 


*मनुष्याचं सगळं जीवन हे त्याच्या नीतिमत्तेच्या आधारावर चालतं. त्यामुळे श्रीमहाराज म्हणाले, प्राण गेला तरी मनुष्याने आपली नीती सोडू नये.' पण मनुष्याच्या* *जीवनातली ही वासना, जी जन्मोजन्मी त्याच्या आतमध्ये आहे, ती मात्र सदैव कृतीशील होण्यासाठी, अग्रेसर होण्यासाठी वाटच बघत असते.*

*भरताने पुरुषाचं चरित्र कसं ओळखायचं हे सांगताना एक अतिशय सुंदर तत्व तुलसीदासांनी १६ व्या शतकात* *रामचरितमानसमध्ये लिहून ठेवलय, की एकांतामध्ये जो स्त्रीशी व्यवहार होतो त्यावरून पुरुषाचं चरित्र हे सांगता येऊ शकतं, हे संत भरताने* *सांगितलंय. अशी ही मनुष्याची अवस्था आणि ही वासना की मनुष्याचा लोभ हा कमी होऊ लागतो.*

 *हा लोभ आपल्य*.   *जीवनातून हद्दपार व्हावा किंवा जितक्या मात्रेमध्ये आज आहे* *तो कमी होत जावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी सत्संगाचा,* *निरूपणाचा,निरुपणातून केलेल्या सत्संगाचा मार्ग समर्थांनी सांगितलेला आहे.

 बऱ्याचदा, श्रीमहाराजांचं प्रवचन* *वाचताना श्रीमहाराजांचे जे काही शब्द असतात, ते आपल्या हृदयाला असे काही जाऊन भिडतात की जणू ते फक्त आपल्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. बऱ्याचदा लोकं म्हणतात की अहो, माझ्या मनामध्ये असा प्रश्न चालला होता, नेमकं श्रीमहाराजांनी त्याच्यामध्ये*

 *मला त्याचं उत्तर दिलं. म्हणजे नेमकं काय होतं की या संतांचं मन हे विश्वमनाशी एकरूप झालेलं असतं आणि आपलं मन हा त्या विश्वमनाचा*

 *एक भाग आहे. त्यामुळे आपली संवेदनाही थेट त्या संतांपर्यंत जाते आणि संत आपल्या वाणीतून, आपल्या ह्या प्रासादिक वाणीतून आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठीच देत आहेत, अशी त्या ऐकणाऱ्याची भूमिका होते. त्यातून त्याचं* *देहमन हरपून जातं. त्याचा विवेक जागृत होऊ लागतो. जी आसक्ती पैशावरती असते तीच आसक्ती या* *निरुपणाच्या आधाराने त्याच्या देहबुद्धीचा -हास करण्यासाठी कारणीभूत ठरते.*

*त्यामुळं समर्थांचं म्हणणं एकच, 'सत्संग', बस्स. क्षणाच्या* *सत्संगापासून सुरूवात करावी आणि आपलं जीवनच मुळी सत्संगस्वरूप करून टाकावं. मनुष्याच्या वृत्ती या काम आणि लोभ या दृष्टीने बाहेर येत असतात, परद्रव्य आणि स्त्रीचा भोग घेण्यासाठी आसक्त झालेल्या असतात त्या वृत्तींना अंतर्मुखता*

*मिळते ती केवळ हरिकीर्तन आणि निरुपणामुळे. जसजसं हे कीर्तन हृदयात उतरतं, जसजसं ही निरुपणं आपल्या कानातून अंतःकरणापर्यंत जातात, तसतसं हे अमृत शरीरभर फिरू लागतं, धमन्यांमधून वाहू लागतं, रक्ताचा थेंब न थेंब ते अमृतमय करू लागतं, तसतशी माणसाची वृत्ती* 

*ही सहज पालटते. ज्या तुलसीदासांचं रामायण मी आपल्याला मनोबोधातून सांगतो ते तुलसीदास देखील या* *कामविकारापासून असे काही मागं फिरले आणि ते 'तुलसीदास' होऊन गेले. ती कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हे ह्या हरिकीर्तनाचं, ह्या निरुपणाचं महत्त्व. आपण आपल्या* *जीवनामध्ये या शाश्वताचा संग करण्यासाठी*

*हरिकीर्तनाचा आधार घ्या, त्यामध्ये आपलं लक्ष हे रामचरणी लावा. निरूपणाचा आधार घ्या. त्यामध्ये आपल्या बुद्धीचा वापर न करता देहबुद्धी विसरून ते निरुपण आपल्या कानांनी श्रवण* *करत, हृदयस्थ करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, असा समर्थांचा आपल्याला बोध आहे.*

संकलन आनंद पाटील

Monday, June 16, 2025

विवेक

 

             श्रीराम,

       अध्यात्म हे सत् चित् आनंदाशी निगडित आहे. या सच्चिदानंदाचे लागेबांधे आपल्या सत्प्रवृत्तीशी व सत्कर्माशी जोडलेले असतात. शुद्ध सात्विकता असेल तर आनंद तिथे असतोच असतो. असा हा स्वसंवेद्य आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सर्व साधनांचा आटापिटा करावा लागतो आणि या साधनांमध्ये विवेक फार महत्वाचा असतो.

            पाण्यात पोहताना कानात जर सोन्याच्या रिंगा असतील तर पोहताना सारखे लक्ष रिंगांकडेच रहाते. अरे पाण्यात तर पडल्या नाहीत ना? आहेत ना? आणि हे बघण्यात.. या सोन्याच्या रिंगांमध्ये जीव गुंतल्याने पोहण्याचा मनमोकळा आनंद घेता येत नाही. 

अगदी त्याचप्रमाणे संसारात जीव गुंतला असेल तर अध्यात्माचा अभ्यास मनापासून होत नाही. संसारात आसक्ती ठेवून अभ्यास म्हणजे नुसते पाण्यात डुंबणे तर संसारात अनासक्ती ठेवून केलेला अभ्यास म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती होय. अध्यात्माच्या अथांग सागरात विनासायास पोहण्यासाठी आवश्यक असलेले दोन टायर म्हणजे विवेक आणि वैराग्य!

              ||श्रीराम ||

Sunday, June 15, 2025

जीवनयात्रा

 जगामध्ये अनंत जीवप्रणी देह धारण करतात आणि आपआपले जीवन जगत असतात. एक जीवनशक्ती सर्व प्राण्यांना जन्मास घालते आणि मरे पर्यंत त्यांची जीवनयात्रा चालवते. 

यावरून असे अनुमान निघते की जीवनशक्तीचा एक महासागर विश्र्वामध्ये अफाट  पणे पसरलेला आहे. प्रत्येक देहधारी प्राण्याच्या अंतरी त्या जीवनशक्तीचा एक अंश प्रभावीपणे वास करतो आणि जीवन चालवितो. हा महासागर हा त्या अंशाचे नव्हे प्रत्येक अंशाचे निजधम आहे.

 त्यामुळे त्या निजधामापासून वेगळेपण आल्याने अंशाला (जीवाला) अंशपणाच्या जीवनामध्ये चैन पडत नाही. वासनेच्या रूपाने जीव आपली बेचैनी प्रगट करतो. महासागराला जीवाची जी हाक आहे तिला वासना म्हणतात. माणसाची वासना म्हणजे अपूर्णतेची पूर्णतेकडे किंवा अंशाची समग्रतेकडे जाण्याची , भेटण्याची जन्मजात आकांशा होय. 

" मला अमुक हवे " असे वाटणे व त्या वाटण्यामुळे मनाचे समाधान भंगणे हे वासनेचे लक्षण ओळखावे. या मध्ये " मला काहीतरी कमी आहे " ही जाणीव असते. या जाणीवेच्या रूपाने माणसाचे अपूर्णपण प्रचीतीला येते.

Saturday, June 14, 2025

देहबुध्दी

 आपण एक गोष्ट विसरतो. स्वार्थ आसक्ती ममत्व हे सगळे देहबुध्दीतून येते. ती गेल्याखेरीज निस्वार्थी प्रेम करता येणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराजानी ते करून दाखविले.

 आपणहून त्यांनी आंधळी बाईशी लग्न केले. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तेव्हा त्यांच्या सुश्रुषेसाठी श्रीमहाराजांनी  दोन कुळंबीणी ठेवल्या. पु.श्री भटजीबापू यांची दोन तीन मुले गेली. त्यांनतर त्यांचा कर्ता सवरता मुलगा गेला तेव्हा ते म्हणाले सोबत चांगली होती. असो पांडुरंगाची इच्छा.

 मला पुत्रवियोगाची सवय आहे. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांची पत्नी गेल्याचे त्यांना समजले तेव्हा जीवनातला एक भाग संपला .माणसाने अशी दुःखे शांतपणे सहन करावयाची असतात असे उदगार त्यांनी काढले. स्वतःच्या संसाराकडे मुलाबळांकडे इतके तटस्थपणे पाहणे देहबुद्धी गेल्याखेरीज शक्य नाही. याला दोन मार्ग आहेत.

 एक विवेक पण हा सतत जागृत हवा व दुसरा हे सगळे भगवंताने दिलेले आहे. मीही त्याचाच आहे. त्याला पाहिजे तसे आणि पाहिजे तोपर्यंत तो ठेवील अशी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. तसे हे सर्व कठीणच आहे तथापि भगवंतावर किंवा सद्गुरूंवर अवलंबून राहण्याची कला जमली तर सगळे सोपे आहे.

Friday, June 13, 2025

स्वधर्म

 आपण जर स्वधर्माला नीट भजलत म्हणजे स्वधर्म नीट पाळलात तर ते कामधेनू सारखं होईल आणि तुम्हाला भगवंत कधीही अंतर देणार नाही. हैद्राबाद मध्ये एक सद्गृहस्थ सरकारी नोकरीत होते. ते शिवभक्त होते आणि कामात फार चोख होते. त्यांचे टेबल कायम स्वच्छ असे. उशीर झाला तरी सर्व काम पूर्ण करून जात. तेथे एक मुसलमान अधिकारी बदलून आला. त्याच्या मनात तेथील कर्मचारी मंडळीनी ह्या सद्गृहस्थ विषयी काही नाही तरी सांगितले. पुढे असे झाले की  ह्या सद्गृहस्थ दोन दिवसात नाही भेटला तर हा अधिकारी त्यांना बोलवायचा व म्हणायचा " दोस्त न मिले तो क्या मजा आहे."  त्याला ह्या मंडळीनी विचारलं तुला ह्या माणसाविषयी प्रेम का वाटत.तर तो अधिकारी म्हणाला तुम्हाला जो पगार मिळतो त्यांचं पूर्ण काम तुम्ही करता का ? हा गृहस्थ ते करतो." हे साध्या व्यवहारात आहे तर आपण भगवंताला स्मरून जर वाट्याला आलेलं कर्म केलंत तर तर जी शक्ती विश्वाला चालविते ती काय स्वार्थी आहे का ? ती तुम्हाला मदत करणारच. तिचे चौफेर लक्ष असतं. म्हणून सत्परूषांला कधीही कमी पडत नाही. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले की सत्पुरुष इतका कर्तव्यरत असतो स्वधर्माविषयी , की भगवंत पाहातच असतो याला कधी मदत करू? पण हा तर कधीच काही मागत नाही. या विश्वाला चालविणार जे विश्र्वमन आहे . त्या विश्र्वमनापाशी  अशी शक्ती असते की योग्य व्यक्तीच्या मनामध्ये योग्य वेळी प्रेरणा करण.  म्हणून सत्पुरुषांना कधीही अडiचण पडत नाही. त्याच्यावरती भार टाकला की जबाबदारी त्याच्यावर जाते. ते विश्र्वमन बरोबर काम करतं. स्वधर्माला इतकं महत्व आहे.

Thursday, June 12, 2025

गुरु

 *।।  श्री  राम  जय  राम   जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*गुरु  कशाला  हवा ?*


व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. 

शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील. मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते,

 म्हणून सद्‍गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.


संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल.

 संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरू‍आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो,

 तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्‍गुरूची संगत केली पाहिजे.

 तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्‍गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच.

 बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा, त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे; तेच करावे आणि आनंदाने रहावे.


*१८३.  भगवंताबद्दल  जिज्ञासा  उत्पन्न  होणे  ही  खरी  भाग्याची  गोष्ट  आहे .  असा  जिज्ञासू  शिष्य  भेटला  तर  संताला  आपले  स्वतःचे  सार्थक  झाले  असे  वाटते  .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, June 11, 2025

घोर विपत्ती

 *एक घार चोचील एक मासा धरून चालली आहे हे पाहून*

*शेकडो कावळे नि घारी तिच्या पाठीस लागले आणि तिला* *टोचटाच करून जेरीस आणून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे जाई तिथे तिथे हे सैन्य कावकाव*

 *करीत तिचा पाठलाग करी. शेवटी दे माय धरणी ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच दुसऱ्या एका घारीने त्याला पकडले. हे बघण्याचाच उशीर,*

 *पहिल्या घारीला सोडून सारे कावळे नि घारी त्या दुसरीचा पिच्छा पुरवू लागले. ती पहिली घार कशी निश्चित होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन* *शांतपणे बसली. अवधूतांनी त्या घारीची ती निश्चित अवस्था पाहून तिला प्रणाम केला व म्हटले,*

*“ह्या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे. नाही तर घोर विपत्ती!"*

Tuesday, June 10, 2025

ध्येय

 पिचलेल्या मनाचे भाग वेगळे झालेले असतात. ते सगळे एकत्र यायला पाहिजेत. जे जन्मतःच तयार असतात. ते पिचणारच नाहीत. अनुसंधान टिकणे महत्वाचे. ती पार्श्वभूमी ठेवून त्यावर चाललं पाहिजे. तुम्ही आम्ही वरवरचे करतो ना त्यामुळे टिकत नाही. 

 व्यवहार करील पण लिप्त होणार नाहीत. आपण तोंडानी ध्येयकरता आहे म्हणतो , पण त्याच आपल्याला भान राहत नाही. सारखी जाणीव राहिली तर जमेल. म्हणून श्रीमहाराज म्हणाले या युगाचे महत्व म्हणजे तो अनुसंधानाच्या मार्गाने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल.

 उदा. आपल्याला प्रवासाला जायचे असेल तर आधीपासूनच अनुसंधान असत सकाळपासून की संध्याकाळी आपल्याला डेक्कनने जायचे आहे. ते जाण्याचे अनुसंधान असते पण आपण  गुरुगृही जाताना सुद्धा गुरुगृहाचे अनुसंधान नसते. कशाकरता जातोय हे अल्प लक्षात राहते म्हणूनच ते सहलीला गेल्यासारखे जातो. 

पु.श्री.ब्रम्हानंदबुवा गोंदवले येथे जाऊन श्री.महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नव्हते. आपण किती विसरतो. ध्येय लक्षात रहात नाही, पटकन विसरतो. त्याला सत्संगती लागते. उदा. भारत आणि चीन यांच्यात युद्ध चालू होते. पु. तात्यासाहेबांना श्री.बेलसरे यांनी विचारलं की हे युद्ध किती दिवस चालेल. ते म्हणाले श्री महाराज काय करतील ते त्यांची इच्छा असेल तसं होईल. त्यावर श्रीबेलसरे म्हणाले तुम्ही म्हणताय त्याचा आर्थ काय? महाराजांचा आणि युद्धाचा संबंध काय? ते म्हणाले( आपण म्हणतो ना बिरुदावलीत श्री महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक ) सर्व जगच जर त्यांच्या म्हणजे गुरूंच्या इच्छेने चालते ही भावना सतत सारखी असेल तर हे युद्ध पण त्यांच्याच इच्छेने त्यांच्याच सत्तेने चाललं आहे अशी खात्री पाहिजे.

Monday, June 9, 2025

दिव्यत्वाची प्रचिती

 ईश्वर ऐकला एकच आहे. त्याच्या सारखा तोच आहे . म्हणून ईश्वराची व्याख्या करता येत नाही. त्याचे फक्त वर्णन करता येते. माणूस जी त्या ईश्वराची संकल्पना करतो तिचे मूळ त्याच्या विवेकशीलतेमधे आहे.

 माणूस  विवेकशीलतेमुळे तर्कशुद्ध विचार करतोच परंतु त्याच्या ठिकाणी नवनिर्मितीची क्षमता देखील प्रत्ययास येते. नवनिर्मितीमधे दिव्यत्वाचा अंश उतरतो. दिव्यत्व म्हणजे काय हे सांगणे सोपे नसते. परंतु असे म्हणता येईल की विश्वाचा विलक्षण विस्तार, 

त्यातील प्रचंड शक्तीचा अक्षय व्यवहार, युगानुयगे बिनबोभाट चालणार कार्यकारणसंबंधाचा व्यापार विवेकदृष्टीने पाहिला की माणसाच्या मनात एक परम आश्चर्याची व किंचित भयमिश्रित आदराची पवित्र भावना निर्माण होते. 

त्या भावनेला अनंताची जाणीव अथवा संवेदना स्पर्श करते. ही अनंताची संवेदना माणसाच्या व्यक्तिमत्वाला काही काळ तरी दृश्याच्या पलीकडे नेते. तेथे दिव्यत्वाची प्रचिती येते. 

त्या प्राचीतीमध्ये ईश्वराच्या संकल्पनेचा उगम आहे. अशा रीतीने अनंताचा स्पर्श होतो तो माणूस क्षणभर का होईना एका अपार्थिव रम्य अस्तित्वाचा अनुभव घेतो. त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तो स्वतः च्या व सर्वांच्या जीवनाचा अर्थ लावतो. तो समग्र अर्थ म्हणजे ईश्वराची संकल्पना होय.

स्मृतीगंधा

 *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼


मला आठवतंय,...

*खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा .... 👌😊🙋‍♀️ 

भरपूर उपभोगलं त्यामुळे.... उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

     

*आता तसं नाही...*

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण.... !

    

*पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,* 

फुल टाईम ' *आईच* ' असायची तेव्हा ती ......!

 *आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची* ....

  

*आता 'मम्मी' थोडी महाग झालीय* 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते....! 


मामा चे गाव तर राहिलच नाही ....

मामा ने सर्वाना मामाच बनवल....🤔

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे.... 

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ....

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय ....

 *हा परिस्थितीचा दोष आहे* ...

   

*मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा... 

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची....👍 शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात *ऑरेंज गोळी* गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी... !!!👍


*आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,* 

*"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"* 

मैत्री बरीच महाग झालीय आता. 

   

*हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ....!!!* 


सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.....


*घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ... 💪

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ....!!!

   

*ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.....* 

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची..... 

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.... 👍


*आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,* 

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

   

एवढंच काय, तेव्हाचे 

*आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले....* 

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. .. 😊

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड... !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार... 😊

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची..... 


*आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं ....!!* 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण ...., मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं .....!! 

   

*काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं.....* 

पण आता ....

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय....😔

    

*म्हणून म्हणतोय... जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं......* 

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार ....ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा .... 😊

नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना .....!!!


🙏

🌹 😊 💖 😊 🌹@

Sunday, June 8, 2025

नामजपाचं महत्त्व

 श्रीराम! सत्पुरुषाची संगत हा आयुष्यातला एक दुर्मिळ योग आहे. पण ही संगत नुसती देहाची नसून त्याच्या विचारांची संगत आहे. म्हणून महाराजांची संगत म्हणजे नामाची संगत! 


महाराज म्हणत, नाम घेताना आपल्या घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा; घरी आल्यावर कसं शांत वाटतं! तसं प्रपंचात कितीही खटपटी करा; नामाला बसल्यावर असं शांत वाटलं पाहिजे. 


एकत्र नामजपाचं महत्त्व त्यामुळे मिळणाऱ्या सत्संगतीमध्ये आहे. महाराज तर म्हणत, सत्पुरुषाच्या संगती एवढंच किंबहुना त्याहून अधिक साधकाला साधकाची संगत महत्त्वाची आहे. कारण त्याला ज्या सद्गुरू / भगवंताबद्दल प्रेम, त्याच्या संगतीत आपलं प्रेम अजून वाढतं. आणि तो साधक आपल्या सारखाच प्रापंचिक अडीअडचणीतून गेला असल्यामुळं तो आपल्याला समजू शकतो ना! त्याचा आपलं साधन वाढवायला उपयोग करून घ्यावा. 


~ परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन सारांश

Saturday, June 7, 2025

पितृऋणातून मुक्त

 श्री.गोंदवलेकर महाराजांजवळ देहात असताना काही भक्त मंडळींनी पैसे ठेवले होते. श्री.महाराजांनी देह ठेवल्यावर काही दिवसांनी ती मंडळी श्री. अप्पासाहेब भडगावकर यांच्याकडे पैसे मागू लागली. कोणी किती पैसे ठेवले याची नोंद श्रीमहाराज यांच्या इथे सापडली नाही.

 सुमारे तीन महिन्यात नंतर श्री.ब्रह्मानंद बुवा गोंदवले येथे  समाधी मंदिराचे  बांधकाम निमित्त आले. येताना त्यांनी रोकड दोन हजार रुपये बरोबर आणले होते. एकंदरीत ह्या ठेव पैशांची कुरबुर त्यांना कळली. त्यांनी काय केले ते जे पैसे आणले होते ते व

 श्री.महाराज कडील पैसे तीन ताटातून रामराया समोर ठेवले.ते त्यांनी तीन दिवस तेथे ठेवले व मंडळीना सांगितले की ज्यांनी श्री.महाराजांकडे पैसे ठेवले असतील त्यांनी येथे येऊन मारुतरायाचे पायावर हात ठेऊन शपथ पूर्वक आपले अमुक एव्हढे पैसे ठेवले होते असा उच्चार करावा आणि तेव्हढी रक्कम ताटातून उचलून घेऊन जावी.

 व्यवहार दक्षता म्हणून तेथे दोन माणसांचा भजनाचा पहारा बसविला होता. अशा रीतीने त्या तीन दिवसांत तीस चाळीस मंडळी येऊन पैसे घेऊन गेली. हे झाल्यावर पू.श्री.ब्रह्मानंद बुवा म्हणाले श्री.भडगावकर यांना म्हणाले " अप्पासाहेब आता आपण पितृऋणातून मुक्त झालो. आता त्या राहिलेल्या ताटातील ते  उरलेले पैसे मोजून मला द्या." 

श्री.भडगावकर यांनी मोजले तर ते बरोबर दोन हजार होते. हे पाहून श्री.ब्रह्मानंद बुवा म्हणाले " अप्पासाहेब आपला बाप इतका थोर होता की त्याने आपले ऋण मुलांच्यावर ठेवले नाही.

 त्यांनी फक्त आपली परीक्षा पहिली." त्यावर श्री.अप्पासाहेब यांचा कंठ दाटून आला आणि ते इतकेच म्हणाले "बुवा आपण आणि श्री.महाराज दोघेही सिद्ध पुरुष आहात. तुमचे सामर्थ्य आम्ही बद्ध प्रापंचिकांना काय कळणार ?"

Friday, June 6, 2025

भय कसलं?

 भगवान श्रीरामकृष्ण परमहंस यांचे अंतरंग लिलासहचर श्री.स्वामी शिवानंद त्यांना महापुरुष महाराज संबोधतात. त्यांनी निरनिराळ्या भक्त साधकांना उपदेश केले. त्यासाधकांनी ते लिहून ठेवले व त्याचे  पुस्तक प्रकाशित झाले.

 त्यातील हा उतारा. १९२३ साली पु स्वामी सुद्धानंद काशीला चालले होते. तर त्यांच्या बरोबर श्रीमहापुरुष महाराजाना येण्या करीता स्वामी सच्चीदानंद महाराजानी (दिनू) पत्र लिहिले. त्यासंदर्भात श्रीमहापुरुष म्हणाले की " दिनू म्हाताऱ्याची अशी धारणा झाली असेल की हा देह आणखी जास्त दिवस राहणार नाही.

 म्हणून तो मला शेवटच्या क्षणी काशीवास घडवू इच्छितो. पण बाबांनो आम्हाला सगळीच ठिकाणं काशी होत. कुठल्याही ठिकाणी कोणत्याही स्थितीत देह जाईना का ते आमच्यापाशी काशीतील मरणासारखंच आहे. श्रीठाकुर जो पर्यंत ठेवतील तोपर्यंत कोणी मारू शकणार नाही. 

परंतु ज्यावेळी ठाकूर हाक मारतील त्यावेळी कोणी ठेवू देखील शकणार नाही. आम्ही तर तयार होऊन बसलेलो आहोत. शेवटच्या क्षणी काशीवास घडावा ह्या साऱ्या गोष्टी प्रापंचिक माणसं करतील. आम्ही तर या जगातील माणसं नाही. ठाकुरांनी कृपा करून सर्व काही दिले आहे. त्यांचे भक्त कुठेही देहत्याग करीनात का  त्याने काही बिघडत नाही.

 त्यांच्यापाशी ते काशीतील मरणांसारखंच आहे. ज्याच्या हृदयी ते विश्वनाथ ठाकूर विराजत आहेत त्यांचं ह्रुदय हीच तर काशी.  त्याला परत भय कसलं?"

Thursday, June 5, 2025

आत्मानंद

 

           श्रीराम,

       या गतीमान जीवन प्रवाहात हव्यासापोटी चाललेला माणसाचा कर्मयोग म्हणजे 'सश्रम कारावास च'! खरे तर आपले लौकिक जीवन म्हणजे एक प्रकारची स्वप्नावस्था आहे असे संत सांगतात. कारण कोणत्याही व्यक्तीचे सान्निध्य हे केवळ प्रारब्धानेच काही काळ लाभते. उजाडलेला दिवस संपला की तो दिवस आणि त्यात घडलेले सर्व काही भोग हे भूतकाळात जमा होतात. ह्या बेभरवशाच्या विनाशवान अवस्थेप्रत नेणाऱ्या क्षणभंगुरत्वातून आपल्या देहाचीही सुटका नाही. मात्र ज्यामुळे आपले अस्तित्व जाणवते ती दिव्य सच्चिदानंद चैतन्यसत्ता आपल्या प्रत्येकाच्या आत निवास करून आहे. त्या दिव्य आनंदाचा शोध व प्राप्तीने होणारा बोध आपल्या सर्वांना करून घ्यायचा आहे. सच्चिदानंद मधील आनंद म्हणजे आत्मानंद. सत् प्रचिती म्हणजेच आत्मप्रचिती आणि सत वैभव म्हणजेच आत्मवैभव!

              हे आत्मतत्त्व ज्याला गुरूकृपेने आत्मसात झाले तो पुनरपि जननं पुनरपि मरणम् या चक्रातून बाहेर पडतो.

                       ||श्रीराम ||

Wednesday, June 4, 2025

तृप्ती

 असमाधान मनामधे कंपन निर्माण करते. त्यामुळे मनाचे संतुलन बिघडते. अस्थिर मनावर कालाचे स्वामित्व चालते. वास्तविक काळ अखंडपणे वाहात असतो. वासना त्याचे त्रिकाळामधे विभाजन करते.

 वासनेची तृप्ती व्हावी म्हणून कर्म करताना भूतकाळाचा संदर्भ सुटत नाही. कर्माचं फळ पुढे  मिळणार म्हणून भविष्याचा संदर्भ सुटत नाही. भूतकाळाची पार्श्वभूमी आणि भविष्याची चिंता याच्या जोडीला वर्तमानकाळाच्या मर्यादा असतात. वासना तृप्त करण्यासाठी कर्म करताना स्वतःच्या मर्यादा, परिस्थितीच्या मर्यादा असतात.

 त्यामुळे मन वर्तमानात कसेतरी कर्माकडे लक्ष देते. त्यामुळे सुखाचे क्षण भोगण्यासाठी अल्प प्रमाणात येतात. त्यात तृप्ती होत नाही. सुखाच्या अतृप्तीमुळे माणसाच्या कर्म करण्याला कधीच खंड पडत नाही. उद्या मी सुखी होईन या फसव्या आशेवर माणूस अखेरपर्यंत कर्म करीत राहतो. कर्म करून मनाचे समाधान होईल आणि ईश्वराचे दर्शन घडेल हा भ्रम मन निर्माण करते.

Monday, June 2, 2025

कर्मयोग

 महाराजांचा कर्मयोग 

जे कर्म केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपल्याला ईश्वरप्राप्ती होते, असे कर्म करत रहाणे म्हणजे ‘कर्मयोग’. कर्म, मग ते व्यवहारातील का असेना, त्या योगे चित्तावर संस्कार होऊ न देता संस्कारबंधनातून कायमची सुटका करून घेणे, हे कर्मयोगात अभिप्रेत आहे. 

 धर्मशास्त्राला अपेक्षित असे कर्म आसक्ती आणि फलाशा त्यागून करणे, किंवा आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हा तुझा धर्मच आहे त्यानुसार तू कर्म करत राहावे परंतु कर्म करताना तू फलप्राप्तीची अपेक्षा बाळगू नकोस किंबहुना तुला फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकारच नाही असे भगवंत सांगतात. बऱ्याचदा फळाची अपेक्षा न करिता कर्म करीत राहणे हे तत्व सामान्य माणसाच्या व्यवहारी मनाला पटत नाही. काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी करणे म्हणजे निरर्थक कर्म करणे असा एक विचार बाळगणारे अनेक लोक असतात. 

 

महाराज हेच सोप्या भाषेत सांगतात  " तूमचे प्रत्येक कर्म हे भगवंताने तूम्हावर सोपवलेले कर्म समजून करा. दिवसभरात जे काही काम आपण करतो ते भगवंताने आपल्यावर सोपवले आहे असे समजून करावे. व्यावहारीक कर्मे करावी. पण भगवंतासाठी करतो हि बुद्धी ठेवावी. मग प्रत्येक कृती त्याचीच सेवा होईल रामाला साक्ष ठेवून कर्म करावे.

म्हणजे रामाच्या अस्तित्वाचे भान  राहील  आपली प्रत्येक कृति ते पाहात आहेत असे वाटू लागले कि त्यांच्यासमोर करायला ज्याची लाज वाटेल असे कर्म माणसाच्या हातून घडणारच नाही प्रत्येक कर्म झाल्यावर भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे .

Sunday, June 1, 2025

प्रपंचाची भावना

 *प्रपंचाची भावना कशी असते ?   संत तुकोबाराय सांगतात,*

(संकलन आनंद पाटील)

 " वाढावे संतान । गृही व्हावे धन धान्य | ल्यावे खावे, बरवे असावे सदैव हीच धरी हाव संसारी ॥ " 

*मात्र मंदिरात जायचा त्याला शीण होतो, चव्हाट्यावर गप्पा*

*मात्र मोठ्या अत्यादराने करतो. उपासना करत नाही पण उचापती मात्र खूप.करतो, सुगंध सोडून माशी जशी दुर्गंधीच पसंत करते ना ?तसं* *हा भाग्यहीन.भगवंत नको म्हणतो, त्याला विसरतो. सगळ्या संतांनी याबाबतीत* *खूप प्रहार केलेत. अगदी कळवळ्याने, पोटतिडकीने त्यांनी आपल्याला प्रबोधन केलं आहे. काय थोर आश्चर्य* *आहे पहा ना, स्वहिताचा म्हणजे परमार्थाचा जरासुद्धा विचारच करत नाहीत. असं काय बळ आहे ? कोणाचा* *भरवसा आहे ? काय दम आहे ? शेवटी कोण कामास येणार आहे ? कशाची निश्चिंतीआहे ? यमदूत* *आल्यावर काय जाब देणार ? मरणं कसं विसरली आहेत ?* *देवकीनंदनाला का बरे* *आठवत नाहीत ? त्या एका* *चक्रपाणीला का बरे विसरली आहेत, की जो या भवबंधनातून*

*आपल्याला सोडवणारा आहे. केवळ उदरंभरणापलीकडे कशाचा विचारच नाही.*


*संतांनी ग्यानबाची मेख सांगितली पहा. उदरनिर्वाह सोडा, प्रपंच सोडा असं नाही सांगितलं. तर एवढंच मात्र ठासून सांगतात केवळ पोटपूजा, प्रपंच करण्यात आयुष्य घालवणं ही नागवण आहे, फसगत आहे. पोटापुरता प्रपंच*

*करा तो 'आवश्यक  आहे पण तो परमानंद  त्याला या मायेच्या प्रपंचात विसरू नका." म्हणजेच शरीर प्रपंचाला द्या पण तुमचे मन, हृदय त्या परमपरमात्म्याच्या चरणी स्थिर राहू द्या.  आणि त्यासाठीच त्या भगवंतांचे गोड नाम सदा, नित्य मुखी असो द्यावे . 

अहंकार

 *सोडायला शिका.....* 



एकदा मी देव पुजा करत होतो. पुजा झाल्यावर मी समईची ज्योत पेटविली.त्या ज्योतीला लावुन अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातुन निसटली.गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला.*समई खाली कलंडताना तेलासकट देव्हाऱ्यातील हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावरायला जवळपास अर्धा तास गेला.*


*खाली पडणाऱ्या अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले.अगरबत्ती खाली पडली असती तर विशेष असा काय फरक पडला असता.अगरबत्ती कांही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ,तेल,हळदी,कुंकू, तांदुळ,तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती.*


आपण आयुष्यात सुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो.क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात.*त्यामुळे क्षुल्लक गोष्टी सोडुन देणेच हितकारक.*


मला रामराम केला नाही,

मला निमंत्रणच दिलं नाही,

स्टेजवर माझं नावंच घेतलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत,

माझा फोन घेतला नाहीं,

मला बसायला खुर्चीचं दिली नाही,

मला उधारी मागितली,

मला कोणी मदतचं केली नाही, माझ्या पोस्टला लाईक केले नाही,

साडीच हलकी दिली...ई.ई...


किरकोळ बाबी,अहंकार सोडा आणि मग पहा....

निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा आपलेपणा येईल


*अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो.अहंकार लगेच सोडता येणार नाही पण कठीणही नाही.आजच प्रयत्न सुरु करा.*


*किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा.*

*मतभेद पराकोटीचे,गंभीर स्वरुपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने,शांतपणाने मिटवा.*