*मनोहिताय ....*
नमस्कार !!
काही दिवसांपूर्वीची गोष्ट! आमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर होत. बोलता बोलता Physical Fitness आणि आहाराचा विषय निघाला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सगळेच खूपच aware आहेत याबाबत ! “मी रोज योगा करते”, '‘मी सूर्यनमस्कर घालतो” तर काही जण म्हणाले “मी तर Gym Join केले आहे” वगैरे. आहाराबाबतही तेच, व्यवस्थित चौरस आहार, कुणाचं Keto Diet तर काही जणांच Intermittent Fasting! शिवाय Vitamins, Calcium या supplements सुद्धा! हे सगळं उत्तमच पण मी सहज म्हटलं, आपण Physical Fitness साठी एवढे जागरूक आहोत पण ‘मनाचे’ काय? मनाच्या fitness साठी आपण काही करतो का? यावर मग जवळ जवळ शांतताच पसरली.
मित्रमैत्रिणींनो, *_Mental Fitness म्हणजेच मनाची तंदुरुस्ती ही एक अत्यावश्यक पण दुर्लक्षित गोष्ट आहे._* खर तर ‘मन’ हे सर्व इंद्रियांचा राजा आहे. उदा. आपण कानाने ऐकतो पण आपलं मन तिथे नसेल तर शब्द आत सुद्धा शिरत नाहीत ! इतर सर्वच इंद्रियांच्या बाबतीत हे सत्य आहे. हे जर मन निकोप नसेल तर अनेक रोगांना अमंत्रणच मिळते! Acidity, Ulcer पासून त्वचारोग, हृदयरोग अगदी Cancer सुद्धा.
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे....
*इंद्रियाणां मन:च अस्मि*
*भूतानाम अस्मि चेतना*!
अर्थ: प्राणीमात्रांत चेतना ‘मी’ आहे आणि सर्व इंद्रियातील ‘मन’ मी आहे! इतक महत्वाच हे मन. हे निरोगी, निकोप आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायलाच हवेत.
सात दिवसांचे आपण सात mind exercises किंवा mental health challanges ठरवून.
चला तर मग बघूया तंदुरुस्त मनासाठीची challanges
*दिवस-१ ला - _LOVE - YOURSELF_*
आज स्वतःवर प्रेमाची बरसात करा ! आज स्वतःला सांगा की तुम्ही किती युनिक आहात. स्वतःमधले सगळे सुंदर गुण, कला, चांगुलपणा हे सगळं सांगा स्वतःला. तुमच्या हृदयात असलेलं प्रेम जागृत करा. स्वतःकडे आरशात बघून एक सुंदर स्माईल द्या अगदी प्रेमाने भरलेलं!
*दिवस- २ रा - _ACCEPTANCE_*
आज कशाकशाविषयी तक्रार करायची नाही! याचीही सुरवात स्वतःपासूनच. स्वतःच वजन, रंग, रूप, आरोग्य कसलीही तक्रार नाही. घरच्या लोकांनी काही मनाविरुद्ध गोष्ट केली तरी Accept करायची. तक्रार नाही. कामाच्या ठिकाणी काही आवडल नाही तरी तक्रार नाही. दिवसभरच्या घटना जशा घडतील तशा स्वीकारायच्या, तक्रार नाही .
And those who avoid complaining invite happiness……….
*दिवस -३ रा - _GRATITUDE_*
आजचा दिवस कृतज्ञतेचा. आपल्या आयुष्यातल्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. विश्वास असेल तर देवाचे आभार मानायला हरकत नाही ! आपल्या प्रियजनांनाही सांगायला विसरू नका. अशा दहा गोष्टीची यादी करा, ज्याच्याबद्दल आपण ग्रेटफुल आहोत. आज मन gratitude ने भरून जाऊदे आणि मग बघाच काय होत ते! A grateful heart is a magnet of miracles!
*दिवस -४ था - _OFF LINE DAY_*
आजचा दिवस WHATSAPP, FACEBOOK, INSTAGRAM सगळ्यापासून लांब राहायचा दिवस. मनावर ताबा आणणे, मन ताब्यात ठेवण्याच पाहिल पाऊल! OFF LINE राहिल्यामुळे मिळणारा वेळ विशेषकरून आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर घालवा. कित्येक दिवसाच्या राहिलेल्या गप्पा मारून घ्या ! आपल्या प्रियजनांबरोबर प्रेमानं, मजेत वेळ घालवा.
*दिवस - ५ वा - _RESPECT_*
आपल्यापेक्षा लहान, आपले subordinates आणि बाकीच्या सगळ्यांशी आज अत्यंत आदरानं वागायचं. उगीच ढोंग नाही, मनापासूनचा! काही वेळा आपण मानसिक रुग्णांविषयी अनादराने बोलतो तो वेडा, खुळा इ. किंवा दिव्यांगाबद्दल पांगळा, बहिरा, आंधळा असे अनुद्गार काढतो. स्वतःपेक्षा वेगळया असलेल्या लोकांविषयी आदरानेच बोलण्याकडे आज लक्ष द्या.
*दिवस - ६ वा- _DECLUTTER_*
आपल्या साठवणूकीच्या हव्यासापोटी अशा अनेक गोष्टी आपल्याकडे पडून असतात, महिनोमहिने, कधीकधी अनेक वर्ष वापरात नाही अशा तीन गोष्टी शोधा आणि योग्य व्यक्तीला दान देऊन टाका. घराबरोबर मनही declutter करायला हवं ! आपल्या मनात डोकावून बघा अशी कुठली गोष्ट आहे का? जी निव्वळ कचरा आहे? एखाद्याबद्दल राग? कशाचीतरी jealousy? अशी एक गोष्ट शोधा आणि मनातून उचलून फेकून द्या. मनाला सांगा, माझ्या प्रिय सुंदर मना ही घाण मी तुझ्या सुंदर घरातून काढून टाकत आहे. आणि कल्पना करा की ती घाण तुम्ही जाळून टाकत आहात.
आज कमीतकमी पंधरा मिनिटे शांत बसा . कानात ear Plugs घाला. स्वतःच्या श्वासाचं निरिक्षण करा. बाहेरचा आवाज बंद झाला की आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. विचार आले तर त्यांच्या मागे लागू नका. त्यांना बघून सोडून द्या. रस्त्याने चालताना अनेक माणसे येतात/जातात आपण सगळ्यांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे चालतो तसेच करावे. आपण आपली स्वतःची company enjoy करावी.
This will really rejuvinate your mind !
*हा सप्ताह आपण अनेक वेळा करू शकतो किंवा एखादा जास्त आवडलेला दिवस जास्त वेळा पालन करू शकतो. असे करता करता ही आपली जीवनशैली बनून जाईल आणि आपल्या मनाच रूपांतर एका सुंदर, सुद्रुढ, स्थिर आणि आनंदान भरलेल्या मनात होऊन जाईल!*
No comments:
Post a Comment