🌺श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🌺
🌷श्री राम जय राम जय जय राम 🌹
🌺पत्नीसमवेत पुन्हां गुरुभेट 🌺
पंढरपूरहून परत आल्यावर कांहीं दिवस गेलें, आणि परत आपल्या गुरूच्या दर्शनासाठीं जाण्याची भाषा श्रीमहाराज बोलूं लागले. आईनें जेव्हां हें ऐकलें तेव्हां ती म्हणाली, "तुला काय वाटेल तें कर ! पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा; तिला घरीं ठेवून तूं एकटा जाऊं नकोस."
आई असें बोलली हें तर खरेंच; परंतु सरस्वतीला देखील श्रीमहाराजांच्या संगतीची खरी चटक लागली होती, म्हणून ते जायला निघाले कीं आपण त्यांच्याबरोबर जायचें असा तिनें निश्चय केला. शिवाय श्रीमहाराज कित्येक प्रसंगीं श्रीतुकामाईंच्या गोष्टी सांगत, त्या ऐकून त्यांचें दर्शन घ्यायला येहळेगांवला जावें असें तिला फार वाटे. जाण्याचें ज्यावेळीं ठरलें तेव्हां श्रीमहाराजांनीं तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण ती घरीं राहायला कबूल होईना.
प्रवासाच्या कष्टांचें आणि वाटेमधील संकटांचें श्रीमहाराजांनीं पुष्कळ वर्णन केलें, पण तिचा निश्चय ढळेना.
शेवटी, सन १८७४ मध्यें एके दिवशीं मध्यरात्रीं श्रीमहाराज एकदम जाण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच
No comments:
Post a Comment