*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*आपण अनुग्रह घेतो तेव्हा त्याचा एक भाग म्हणजे श्रीमहाराजांचे अखंड स्मरण ठेवणे हे होय. आपण अनुग्रह घेतो तेव्हा आपण त्यांचे होतो.
एखाद्या स्त्रीचे लग्न झाल्यावर ती तिच्या पतीची होते. तसेच त्या स्त्रीला हा माझा पती आहे ही जाणीव २४ तास असते. त्याचप्रमाणे मी आता श्रीमहाराजांचा आहे ही जाणीव २४ तास राहिली पाहिजे. स्त्रीला प्रत्येक गोष्ट करताना हे आपल्या पतीला आवडेल का असे वाटते तसेच आपल्याला कोणतीही गोष्ट करताना ती श्रीमहाराजांना आवडेल का हा विचार आला पाहिजे. त्यांना न आवडणारे आपण करु नये. श्रीमहाराजांचे अखंड स्मरण ठेवणे म्हणजेच २४ तास जप करण्यासारखेच आहे.*
*||श्रीराम जय राम जय जय राम||*
No comments:
Post a Comment