प्रपंच हा दृश्य असल्यामुळे अपूर्णच असणार आणि अपूर्ण असल्यामुळे ताप देणार . आज पर्यंत या प्रपंचात कोणाच्याही मनासारखे सगळं झालं असं शक्यच नाही. ग्रीस देशामध्ये आलेक्सझांडर राजा होता. तो डायोजिनिसकडे , हा संन्यासी पंथाचा माणूस, जात असे. आलेक्झांडरने त्याला विचारले की सगळं जग जिंकल्यावर काय करू? यावर डायजोनिस त्याला म्हणाला " जग जिंकून आल्यावर तुला हवं ते कर पण एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव. तू जेव्हा जाशील आणि लोक तुझे प्रेत नेतील, तेव्हा तुझे हात मोकळे असू देत." याचे कारण जेव्हा विचारले तेव्हा डायजोनिस म्हणाला " या जगामध्ये मोठे मोठे सम्राट जरी झाले तरी त्यांच्या बरोबर आत्मा तेव्हढाच येतो. बाकी काही येत नाही." तसं आपल्याबरोबर आपलं नाम येईल एव्हढी खात्री झाली पाहिजे की हेच माझ्याबरोबर येणार आहे, इतर काहीही नाही. देह सुटायला लागला की अति कष्ट असतात. प्राण सुटायला लागला की सहन होत नाही. ते अतिशय त्रास दायक असतं. जेव्हा सविकल्प समाधी लागते त्या वेळेला सर्व प्राण एके ठिकाणी येतो. तो एकत्र येतो तेव्हा आपले सांधे असतात त्यातून सगळीकडून येतो. तो एकत्र येत असताना अतिशय दुखतं, शरीर मृतवत होते. साधी सविकल्प समाधी लागताना इतका त्रास होतो तर प्राण जाताना काय होत असेल? मृत्यूच्या वेळी काय होत असेल. माणसाला त्या वेळी सगळं बाजूला ठेवून नाम घेणे कर्म कठीण आहे. त्याला प्रचंड अभ्यासच पाहिजे. प्रपंचाच्या ज्या वाफा येतात त्या सगळ्या संभाळूनच नाम घेतलं पाहिजे. आग विझवणारे जसे वेगळे कपडे घालून आगीत जातात तसं प्रपंचात राहील पाहिजे. प्रपंचात तक्रारीच जास्त. तुमच्या मनासारखं व्हायचं नाही. ह्यामध्ये आपले मन भगवंतापाशी ठेवलं तरच सुखदुःख होणार नाही.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment