पु.श्री.गुरुदेव रानडे यांच्यापुढे जेवणाचे ताट वाढून आणलं की ते एखादा चमचा आमटी किंवा थोडंस काही तरी खायचे. पुढे ते म्हणत मला सगळं खावं नाही लागत नुसता वास घेतला तरी त्याचा भोग होतो. काहीही असो इंद्रियांवर ताबा असलाच पाहिजे.
एक मासा आहे त्याला पकडण्यासाठी गळाला गांडूळ लावतात त्या गांडूळाच्या आशेंन मासा गळ गिळतो व त्यात अडकतो मरतो. त्याच्या दृष्टीने हे सुख नाही. सुखाचा भ्रम आहे. तशी आपली इंद्रिये पण खाण्याच्या अनुषंगाने सुखावतील पण त्याला मर्यादा घातली पाहिजे.
पु.श्री.तात्यासाहेब केतकर सांगत की गोंदवले येथे जेवणाच्या वेळी सर्व मंडळी पानावर बसलेली असायची. भात वाढलेला असायचा तूप वाढलेलं असायचं पण महाराज काही जेवायला उठायचे नाहीत. पाच दहा मिनिटे वेळ काढायचे.तिथे श्री. काका फडके म्हणून सद्गृहस्थ होते. त्यांनी महाराजाना विचारले की आपण असे का थांबता. तर महाराज म्हणाले " अरे , रोज तुम्ही ऊन ऊन अन्न घरी खाताच ना, त्या अन्नाची चव कमी व्हायला असे केल्याशिवाय तुम्ही कसे तयार होणार ?"
( चवीने कधी खाऊ नये) असं शिक्षण महाराज देत असत. मुद्दा काय तर इंद्रियांना वश होऊ नये. अति जेवण झाली की मन साध्या विषयात एकाग्र होत नाही. हे सगळं सुक्ष्मातल शास्त्र आहे. आपल्या मनात काय तरंग उठतात , कशाची वासना येते हे सगळं म्हणजे आपली घसरण आहे. मन असं सांभाळणे हे पथ्य आहे.
No comments:
Post a Comment