TechRepublic Blogs

Tuesday, April 8, 2025

ममत्व

 एकदा एका उद्योग समूहाचे एक संचालक वजा मालक पु.श्री.केशवराव बेलसरे यांना भेटायला आले आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणून श्री.केशवरवजींना  सांगीतले की " मी मुलांच इतके करूनही ती माझे ऐकत नाहीत त्यास काय करावे?" नवकोट नारायण झाला तरी आपण आणि ते या बाबतीत एकच आहोत.

 श्रीमंती आहे त्या बाबतीत की बुवा पैसे असल्यावर भानगड नसेल. मुलं सद्गुणी निघतील अस वाटते. तसं नाही. त्यांनी काय सांगितलं की मुले ऐकत नाही त्यावर पु.बेलसरे म्हणाले "शेठजी, तो प्रपंचाच गुणधर्मच आहे. जसं मुलांनी न ऐकणे.

 मीठ जसं तुमच्या घरी खारट तसं माझ्या घरीही खारटच लागणार. गुणधर्म कधीही बदलत नाही. तो तुम्ही मनावर काय घेता ? मीठ खारटच लागणार. शेठजी तुम्ही पिता या नात्याने जेवढे कर्तव्य आहे तेवढे करा. 

त्यांच्यावर ममत्व ठेवू नका. ममत्व म्हणजे मी त्यांच करतोय तर त्यांनी माझं करावे ही अपेक्षा म्हणजे ममत्व. तुमच्या पोटी आलेत, तूमच कर्तव्यच आहे तेवढे तुम्ही करा आणि ममत्व ठेवू नका. म्हणजे हे दुःख होणार नाही. आणि त्यांनी श्रीमहाराजांच्या चैतन्य गीतेतील ओव्या सांगितल्या हे प्रपंचाचे स्वरूप

ज्याचे करावे बहुत भारी

थोडे चुकता उलट गुरगुरी ||

ऐझे स्वार्थपुर्ण आहे जन

हे ओळखून वागावे आपण ||

जोवरी धरिली जगाची आस

तोवरी परमात्मा दूर खास ||

आस ठेवा रामापायी

आनंद समाधानाने राही ||

हे लक्षात ठेवावे म्हणजे हे मनातले दुःख आहे ते पार निघून जाईल.

No comments:

Post a Comment