*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा : उद्या बरीच मंडळी वेंकटापूर, बेलधडीला जाणार आहेत. पू. बाबा मात्र येथेच राहणार आहेत. वेंकटापूर येथील श्रीव्यंकटेशाच्या मूर्तीबद्दल पू. बाबा म्हणाले, दृश्यात (material cause) उपादान कारण आणि (efficient cause) निमित्त कारण ही भिन्न असतात. उदाहरणार्थ, माती व कुंभार किंवा दगड व शिल्पकार. पण वेंकटापूरची मूर्ती मात्र दगडातून हळूहळू आपोआप बाहेर उमटत आहे. केवळ भगवंताच्या बाबतीतच उपादान कारण आणि निमित्त कारण एकच असतात.
उद्या तुम्ही सर्वजण तेथे जाणार आहात तेव्हा श्रीव्यंकटेशाजवळ काय मागावे असे वाटते ते मागून घ्या. ही मूर्ती म्हणजे श्रीब्रह्मानंद महाराजांच्या तपश्चर्येचे फळ आहे. तेथे परमात्मा जागृत आहे. तो मागितलेले लवकर देतो.*
*श्रीमहाराजांनी वेंकटापूरबद्दल असे सांगितले आहे की एकवेळ काशीला जायचे राहिले तरी चालेल पण एकदा तरी वेंकटापूरला जाऊन यावे. १९१० साली देहात असताना श्रीमहाराज वेंकटापूरला गेले होते तेव्हां म्हणाले होते की मी आता येथेच राहतो.
पुढे पू. तात्यासाहेब वेंकटापूरला गेले असतांना पेटीवर श्रीमहाराज पुन्हा मी आता येथेच राहतो म्हणाले. तिसरा प्रसंग रामेश्वरला असाच घडला. त्यावेळी श्री. गणपतराव दामले म्हणाले की आम्ही काय केले असता तुम्ही आमच्याबरोबर राहाल ? त्यावर श्रीमहाराज म्हणाले,
पाणी आणा. पाणी आणल्यावर म्हणाले, संकल्प सोडा की मी माझा प्रपंच तुम्हाला दिला. त्याप्रमाणे केल्यावर ते परत आले.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment