प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे प्रपंचामध्ये माणसाला सुखदुःख येत असते. ते आपण केलेल्या कर्माचे फळ असल्यामुळे सुखाने हुरळून जाऊ नये व दुःखाने अस्वस्थ होऊ नये.
असे न होण्यास आपले मन शांत राहणे जरूर आहे. जो पर्यंत मी कर्ता आहे अशी भावना असते तो पर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे आणि देहाने मन शांत ठेवावे. रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्याचे ठिकाणी चिकटावें त्या साठी मनापासून प्रार्थना करावी.
आपली नोकरी, अधिकार पैसा ऐश्वर्य इतकेच नव्हे तर आपले नातेवाईक वगैरे गोष्टी तात्पुरत्या असतात. त्या सगळ्यांन मध्ये टिकणारी जर गोष्ट असेल तर ते भगवंताचे नाम होय. आपण व्यवहारात, या सगळ्यांच्यात राहून देहाने सर्व गोष्टी कराव्या लागणार. त्या अगदी छान पणे कराव्या. तरी त्या पासून आपल्याला समाधान मिळेल हा भ्रम कधी होऊ देऊ नये.
No comments:
Post a Comment