TechRepublic Blogs

Monday, April 28, 2025

आत्मिक उन्नती

 

          श्रीराम,

      भगवंताजवळ पोहोचायचं एक प्रभावी माध्यम म्हणजे भजन. त्यात वृत्ती रंगली की संसार व व्यवहार काही क्षण विसरून जायला होते. संसार आणि व्यवहार हा कर्तव्य कर्म रूपाने कोणालाच चुकत नसतो. 

पण यातच मनाने गुंतुन पडल्यास परमार्थ साधनेला वृत्ती अनुकूल होऊ शकत नाही. प्रसन्न व आनंदी राहणे ही एक विलक्षण साधना आहे. प्रसन्नता आणि आनंद अबाधित राखण्यासाठी वृत्ती मनमोकळी आणि निर्भय बनली पाहिजे.

 जेथे आवश्यक तेथे तडजोड, पण जेथे जरुर आहे तेथे आक्रमक बनावे लागते. आनंदासाठी आनंद आणि प्रेमासाठी प्रेम अशी निर्व्याज सद्भावनायुक्त वातावरणात स्वतःची आत्मिक उन्नती फार झपाटय़ाने साधता येते. अशा समवृत्तीच्या साधक मित्रमैत्रिणीत कोणतेही बंधनकारक दडपण नसते आणि उगाचच पोसलेले ताणतणाव नसतात. किंवा कोणत्याही प्रकारची आसुरी असूया नसते.

             अशा सगळ्या समवृत्तीच्या साधक मित्रमैत्रिणींनी मिळून भगवंताचे भजन केले की संसार आणि व्यवहार काही क्षण विसरायला होते आणि मग शांततेचा अनुभव येतो.

                      ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment