*साधकाने देहाच्या मृत्यूपूर्वीचे मरण एकदा मरून पाहावे.’*
*तुकोबादेखील अभंगातून म्हणत की, मी माझ्या मृत्यूचा अनुपम्य सोहळा पहिला!*
*माणगंगेच्या काठी भलं, गांव वसलं हे गोंदवलं |*
*रूप अनुपम्य हे अवतरलं, चालतं बोलतं ब्रम्ह इथे आलं ||*
*हे परब्रम्हाचे चैतन्य अनुभवायचे असेल तर "गोंदावलेवास" जरूर करावा, पण तिथे* *गेल्यावर "रामनामी श्वास" घ्यावा हे महत्वाचे आहे. आणि रामनामी श्वास घेण्यासाठी लौकिकाचा ध्यास सुटणे ही अट आहे. हा लौकिकाचा ध्यास सुटणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे होय.*
*लौकिकाचा ध्यास सुटण्याची महत्वाची खुण* *म्हणजे ‘मीपणा’ मरून जाणे. माझे घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझा पैसा, माझे कुटुंबीय, माझी प्रतिष्ठा या सर्व ममत्वाचा, देहबुद्धीचा कायमचा त्याग कसा करावा, हे सदगुरूंकडून शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!*
No comments:
Post a Comment