TechRepublic Blogs

Monday, April 14, 2025

प्रपंच

 ।। जय जय रघुवीर समर्थ।।


 *तर, एक नम्र विनंती* 🙏



तर, आता आजच्या लेखास सुरुवात करतो🙏


 *कालचा प्रश्न...* 


 *प्रपंच करायचा की नाही?* 


 *नाती जपायची की तोडायची?* 


संसारात अशी नाती तोडता येत नाहीत, अशी काही स्टेटमेंट्स प्रतिक्रिया म्हणून आली🙏


मंडळी, श्री समर्थ " *साधनेत येणारे अडथळे सांगत आहेत* आणि ते सुद्धा

 ' *ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकांना '* 

ह्याचा अर्थ आपण फक्त 

' *ते वाचन* ' करायचे आहे🙏 

 *अनुकरण* करण्यासाठी समजून घ्यायचे आहे🙏


 *आता, आपण* ... 

*प्रपंच सुखाने करावा, नेटका करावा* ... 


 *नाती तोडायची?* 


तर मुळीच नाही, आहेत ती जपायची आहेतच🙏


 *मग काय करायचं?* 


प्रपंच करताना 3 शब्द पक्के डोक्यात असावे🙏


 *उचित, प्रमाण , अलिंप्य* 


जे करावे ते ' *उचित* ' असलं पाहिजे. 🙏


जे कराल ते ' *प्रमाणात* ' असलं पाहिजे, वाहवत जायचं नाही. 🙏


जे कराल त्या पासून ' *अलिंप्य* ' राहता आलंच पाहिजे 🙏


आता, 

चिंतन पहावे की 

' *मला जर साधना करायची आहे, माझ्या सद्गुरूंची आज्ञा, गुरुवाक्य प्रमाण मी मानले पाहिजे आणि त्याचवेळी मांडून ठेवलेला ' प्रपंच ' हे दोन्ही कसे करावे?* 


श्री समर्थ म्हणतात, 


 *तये क्रियेचे लक्षण।* 

 *आधी स्वधर्म रक्षण।* 

 *पुढे अद्वैत श्रवण।* 

 *केले पाहिजे।। श्रीराम।।* 



 *साधकाने, बाधक कर्मे सोडायची आहेत, पण मग नेमकी कुठली कर्मे करावी जेणेकरून परमार्थ अंगी बाणेल?* 


 *साधकाने नेमक्या कोणत्या क्रिया कराव्या?* 


 *कर्मस्वरूप कसे असावे?* 


 *स्वधर्म रक्षण म्हणजे नेमके काय?* 


 *अद्वैत श्रवण, म्हणजे काय?*

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू 


तो पर्यंत, कृपया ' *वाचन* ' नक्की करावे 

 🙏🙏


धन्यवाद

 *समीर शशिकांत लिमये* 


No comments:

Post a Comment