*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*मुक्काम हेबळ्ळी. संध्याकाळी पू. बाबांची खोली.*
*पू. बाबा : आपण नाम टिकविण्याचा अभ्यासच केला पाहिजे. मी काय होतो आणि आता कसा झालो आहे. (ती सौ. आईंकडे पाहून) ह्यांना विचारा. एकदा खूप राग आला तेव्हां घरातल्या सगळ्या कपबशा फोडल्या होत्या. श्रीमहाराजांच्या सहवासामुळे आता शांत झालो आहे. म्हातारपण कठीण आहे पण नामस्मरणाची सवय केल्यास ते सोपे जाईल.
आज सकाळी फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला तेव्हां कितीजणांचे नामस्मरण चालू होते. (सर्वांचे नाही हेच उत्तर असल्याने कोणीच बोलले नाही) असे कां व्हावे ? फोटो काढणाऱ्याचे नाम राहिले तर मी एकवेळ समजू शकतो. पण तुम्हाला फोटोला उभे रहाण्यापलीकडे काय काम होते ?
मग नाम कां झाले नाही ? माझे तर नाम चालले होते. तुम्ही करीत नाही, पण अभ्यासाने हे शक्य आहे. इथले वातावरण चांगले आहे. माझे समाधीवर नाम कसे छान जमले, लय लागला. गर्दी नसेल तेव्हां निदान आठ दिवस तुम्ही सर्वजण येथे केवळ नामस्मरण करण्यासाठी या.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment