जीवनाला विभाजित करणारे मन मानवीजीवनाचा समग्रपणे विचार करू शकत नाही. उदा. माणसाला संसारापासून मिळणारे देहसुख तर हवे असते पण त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या कटकटी व गैरसोयी मात्र नको असतात.
मोठेपणाची व नावलौकिकाची हौस अन्य सर्व काही हवे असते पण त्या अनुषंगाने येणारी दुःखे नको वाटतात. माणसाला ईश्वरदर्शन व्हावे व समाधान लाभावे हे मनापासून वाटते.
पण त्यासाठी जरुर असलेले निर्मल, निर्वासन आणि नि:स्वार्थी व निष्काम प्रेम करणारे मन सिद्ध करावे लागते. ते तयार करण्याची साधना माणसाला नको असते. याचा अर्थ माणसाचे मन जो विचार करते त्यामध्ये मुळात दोष असतो. दोषयुक्त विचाराचे मूळ माणसाच्या वासनेमध्ये सापडते. प्रत्येक माणसाला वासना असतात. आपल्याला काहीतरी हवे आहे आणि ते मिळाल्यावाचून आपण सुखी होणार नाही असे जे मनाला वाटते त्याचे नाव वासना. वासना माणसाला स्वस्थ बसू देत नाही.
आपली परिस्थिती बद्दलण्याची मनाची प्रवृत्ती हे वासनेचे दृश्य रूप समजावे. वासना हेच कर्माचं मूळ कारण. वासनेचा स्वभाव असा असतो की मनासारखे घडून आले तरी, नाही आले तरी, वासना शांत होत नाही. वासनेच्या या स्वभावामुळे माणसाला सतत असमाधान राहते.
No comments:
Post a Comment