*सुख ही गोष्टच अशी आहे की, जी प्रत्येकाला हवी असते.*
संकलन आनंद पाटील
*तहानल्या हरणाने मृगजळामागे धावत राहावे आणि मृगजळाने मात्र दूरदूर पळत राहावे तसे आपण त्याच्या मागे धावतो आहोत. सुख मिळेल का हो बाजारी, सुख मिळेल का हो शेजारी, या आशेने कायम असमाधानी राहतो आहोत. कोणी व्यसनांमध्ये, कोणी पैशामध्ये, कोणी इंद्रि उपभोगात तर कोणी आणखी कशाकशात सुखाचा शोध घेत आहे; परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर हे माहित असून सुद्धा आपण सगळे धावत आहोतच.
अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय? भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत घेता येऊ शकतो का?*
*बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं. अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात काहींना सुख वाटतं तर*
*काहींना फक्त पैसे कमवण्यात. पैसा हे साध्य नसून साधन आहे, हेच आपल्या लक्षात येत नाही. पैशाने कदाचित*
*सुखसोयी विकत घेता येतील; पण त्याने सुख नाही मिळणार कारण ते आपल्या आत मध्येच आहे आणि आपण ते बाहेर*
*शोडतो आहोत. बाजारात औषध मिळेल; पण आरोग्य नाही. चष्मा मिळेल; पण दृष्टी नाही तसेच सुखाचे आणि समाधानाचेच्या बाबतीत पण आहे. सुखाची व्याख्याच न ठरवता आल्याने दु:खाची संगत करावी लागते.*
*मग खरे सुख कुठं आहे.? तर सर्व महात्म्यांनी, सत्पुरुषांनी सांगितलं आहे की, सुख अन् समाधान आपल्या चित्तीच आहे. म्हणजे तो परमानंद चक्रवर्ती आपल्याच हृदयात आहे अन् त्याला आपण विषयांच्या धुंदिने झाकून ठेवलो आहोत.
ते समाधान, सुख फुलवायचे असेल तर त्या भगवंताचे स्मरण करत प्रपंचाचा गाडा पुढे पुढे नेता आला पाहिजे. आणि त्या गाड्यासमोर दुःखाचे, संकटाचे खाच खळगे आले तरी त्या भगवंताच्या किंवा आपल्या सद्गुरुंच्या कानावर घालावे. इतकेच! मग काय आपल्या जीवनात सुख ही सुख आनंद ही आनंद!
No comments:
Post a Comment