श्रीराम,
हे जीवन म्हणजे तरी काय हो? अनुभवांची जणू अखंड मालिकाच! विविध आणि वैचित्र्यपूर्ण घडामोडी! अनुकूल व प्रतिकूल अनुभवांचे बाबतीत ना नियम ना प्रमाण! अमुक घडले की सौख्य किंवा अमुक घडले की दुःख असा सर्वमान्य ठोस निष्कर्ष काढता येत नाही. प्रपंच आणि परमार्थ असे दोन विभाग नाहीत. आपला प्रपंचच परमार्थमय करायचा आहे. कठीण प्रसंग हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतात. त्याला अपवाद नाही. संत, महात्मे तर सतत कसाला लागलेले असतात.
संकट हे प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्याबद्दल ची अवास्तव भयग्रस्त संकल्पना हीच माणसाला अधिक भेडसावते. परंतु ईश्वरी कृपेची रहस्यमयता ही खरोखर अत्यंत अगाध अशीच असते.
प्रसंग गुदरण्यापूर्वीच तो 'सूत्रधार' संकट विमोचनाची सूत्रे हळूच हलवीत असतो.. आपण मात्र धास्तावलो असतो. कित्येकदा असेही घडते की येणारी आपत्ती ही अटळ ठरते. परंतु श्रीगुरू कृपेने धैर्य आपोआप उद्भवते. कधीकधी तर सोडून दिल्याने प्रश्न आपोआप म्हणून काळजी ही घ्यावी पण करीत मात्र बसू नये.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment