श्रीरामकृष्ण : अहंकार आहे म्हणून ईश्वराचे दर्शन होत नाही, ईश्वराच्या घराच्या दरवाज्यासमोर हे अहंकाररुपी झाडाचे खोड पडलेले आहे. हे खोड उल्लंघिल्याखेरीज त्याच्या घरात प्रवेश करतां येत नाही. "एकजण भूतसिद्ध झाला. सिद्ध होऊन त्याने हाक मारताच लगेच भूत आले. येऊन म्हणाले " काय काम करावे लागेल ते सांगा. जेव्हा तुम्ही मला काम देऊ शकणार नाही तेव्हा मी तुमची लगेच मुंडी मुरगळीन. त्या माणसाने लागोपाठ त्याला कामे सांगितली. ती करवून घेतली.
त्यानंतर त्याला काम आढळेना. भूत म्हणाले "मी आता तूझी मुंडी मुरगाळू ?" तो म्हणाला " थोडं थांब, मी आलोच" अस म्हणून तो त्याच्या गुरुदेवांजवळ जाऊन म्हणाला "महाराज मी मोठ्या संकटात सापडलो आहे. वरील सगळा प्रकार कथन केला,आता काय करू.?" तेव्हा गुरू म्हणाले " तू एक काम कर , तू त्याला एक मोठा कुरळा केस दे व तो सरळ करायला सांग."
भूत रात्रंदिवस कुरळा केस सरळ करीत बसला. केस कसला सरळ होतो ? जसा वाकडा होता तसाच राहिला .अहंकार देखील हा जातो व असाच फिरून येतो. अज्ञानी मुलासाठी पालक नेमला जातो . अज्ञानी मूल मालमत्तेचे रक्षण करू शकत नाही.म्हणून राजा त्याचा भार घेतो. माणसाने अहंकाराचा त्याग केल्याखेरीज ईश्वर त्याचा भार घेत नाही.
No comments:
Post a Comment