संन्यासाची एक व्याख्या आहे ' शरण्यास ' म्हणजे सहा विकार आहेत विकार सोडून देणे. त्यांना नाहीसे करणे हा संन्यास आहे. काही लोक " हम संन्यासी है" म्हणून मिरवतात पण ते संन्यासी नव्हेत. त्यांनी फक्त संन्यासाची वस्त्रे घातलेली असतात. तर हा वृत्तीचा संन्यास आहे. संन्यास म्हणजे सोडणे. तर जे भगवंताच्या आड येतं ते निश्चयाने सोडण हा संन्यास आहे.
आपले म्हणावे तसे नामस्मरण जमत नाही कारण आपण संन्यासी नाही. आपली वृत्ती सर्व ठिकाणी चिकटलेली आहे. इथे योग आणि संन्यास या मध्ये फरक नाही. योग म्हणजे जोडणे. ज्याचा जीव भगवंताशी कायमचा जोडला आहे तो योगी. योग काय शिकवतो. तर " जीव परमात्म्याशी ऐक्य करी." योग गुरू शिकवितो ना मग तो काय करतो तर भगवंताला आणि शिष्याला जोडून देतो. या संदर्भात पू.श्री.रामकृष्ण यांनी सुंदर दृष्टांत दिला. " गंगेमध्ये एखाद खूप मोठं जहाज असतं , त्या जहाजाला लहान लहान होड्या बांधलेल्या असतात.
ते जहाज जस जातं तशा त्या होड्या त्याच्या बरोबर जातात. तसं मग गुरू हा मोठं जहाज आहे. त्याला तुम्ही आपली लहान होडी बांधलीत की तो आपल्याला आपोआप घेऊन जातो. हा योग खरा. तेव्हा योगामध्ये परमेश्वराला चित्त जोडणं हा जर प्रमुख अर्थ असेल तर संन्यास आणि योग यात फरक नाही.
No comments:
Post a Comment