एक सत्य घटना
पुण्यात वारजे च्या रस्त्याच्या कडेला बसून एक आजी भाजी विकत असत , दुपारी बाजूला उभ्या असलेल्या रिक्षातच बसून घरून आणलेला डबा खायचा आणि सतत एका वहीत काहीतरी लिहीत असत .
एकदा एका मुलाने मोठ्या कुतुहलाने त्या आजींना विचारले ,
आजी तू इतके काय लिहीत असतेस त्या वहीत ?
. आजी म्हणाली ....
"मला लिहिता वाचता काही येत नाही रे बाळा. एकदा एक माणूस आला होता त्याने मला एका कागदावर एक वाक्य लिहून दिले. आधी मी त्याच्यावरच खूप वेळा गिरवत असे ... असे करता करता मला ते वाक्य पूर्ण तसेच लिहिता येऊ लागले म्हणून मी ते वहीत लिहायला सुरुवात केली. वेळ मिळाला की मी ते वाक्य लिहीत बसते.
मुलाने आजीला विचारले - बघू - ते वाक्य मला दाखवू शकशील का ? विचारले तर तिने लगेच वही समोर केली , वाक्य होते .... *श्री राम जय राम जय जय राम* .
मुलगा तिला म्हणाला -"आजी मी इथे जवळच - रहातो
जवळच माझा मोठा
बंगला आहे ,तिथेच मी राहतो ,रोज असे रिक्षेत बसून जेवणापेक्षा दुपारी थोडा वेळ माझ्या घरी येत जा.
त्यावर ती आजी म्हणाली , नको रे बाळा. माझ्या दिराचा पण इथेच खूप मोठा फ्लॅट आहे , मी तिथे पण जाऊ शकते पण तसे केले तर परत संसाराच्या गोष्टीत अडकणार आणि माझे हे लिहिणे तितका वेळ थांबणार. मी इथेच मजेत आहे.
मुलगा आजीला म्हणाला -
"आजी अग हा मंत्र माझा गुरू मंत्र आहे ,
गोंदवलेकर महाराजांचा जपमंत्र आहे हा!!
आजीने त्याला विचारले की -
"तू भेटला आहेस का रे ह्या महाराजांना ?
मला जाशील का रे त्यांच्याकडे घेऊन ? मुलाने सांगितले की आजी - अग आता महाराजांची समाधी आहे , तिथे मी दर महिन्यास जातो पुढच्या वेळी जाईल तेव्हा तुला पण नक्की घेऊन जाईल. !
आजी म्हणाली - पण हे बघ तू माझा खर्च मला करू देणार असशील तरच मी तुझ्या बरोबर येईल ! मुलगा हो म्हणाला आणि आजीला घेऊन गोंदवल्याला गेला. तेथे समाधी मंदिरात
गेल्यावर लगेच
आजींनी अगदी आनंदोत्साहाने त्या मुलाला मठात भिंतीवर लावलेला एक फोटो दाखवला आणि म्हणाल्या - , " अरे ह्यांनीच तर मला हा मंत्र लिहून दिला आहे .....
तो फोटो होता -
परमपूज्य
श्रीगोंदवलेकर महाराजांचा. !!
हेच तर खरे नामावरील प्रेम व नामावरील भक्ती !
No comments:
Post a Comment