कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे,
श्रीराम जय राम जय जय राम
नदी जशी समुद्राकडे वाहतच असते, तशी जिवंतपणी कर्मवृत्ती ईश्वराकडे लागल्या की, बाह्यत: जरी तो भक्त शरीरधारी म्हणून वेगळा दिसत असला, तरी आतल्या आत त्या चैतन्याशी वृत्तिरूपाने जोडलेलाच असतो. त्यामुळे सर्व बंधरहित अंतिम चैतन्याशी एकरूप होण्याची अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती हा जिवंतपणीच अनुभवीत असतो. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते.
म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे.
व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण, इत्यादि सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे. नामाकरिता नाम घ्या कीं त्यात राम आहे हे कळेल.
!! श्री महाराज !!
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
No comments:
Post a Comment