*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*तपस्या , योग , ध्यान हे केल्याने भगवंत प्राप्ती होईल पण नाम घेत घेत सेवा केल्यानं भगवंत लवकर भक्तांच्या अधीन होतो. आपला अहंकार आपल्याच नकळतपणे कमी होतो व श्रीमहाराजांवर आपोआप प्रेम जडते. अपरिमित आनंद मिळतो , असिम आत्मशांती मिळते व अंत:करण स्वच्छ होते. पूर्वी गुरुकुलामध्ये आश्रमात असताना भगवान श्रीराम वशिष्ठ मुनींच्या व भगवान श्रीकृष्ण स्वतः जंगलात जाऊन लाकडे तोडून त्याची मोळी करून सांदिपनी ऋषींच्या आश्रमात घेऊन येत. राजसूय यज्ञात तर भगवंतांनी सर्व साधू संतांची उष्टी खरकटी काढली याहून सेवेचे दुसरे अनन्य साधारण महत्व ते काय असणार ?*
*सेवा तीन प्रकारची असू शकते. मानसिक , शारीरिक व वित्त सेवा. सेवेच्या व्यतिरिक्त जेवढे मार्ग आहेत ते सर्व लौकिक मार्ग आहेत. झाडांच्या मुळांना पाणी घातले की ते जसे पाने फुले इ. पर्यंत पोहचते तसे एक गुरुची सेवा केली की सर्व चराचराची सेवा केल्यासारखे होते.सेवेमध्ये सातत्य , प्रयत्न आणि चिकाटी असणे अत्यंत जरुरी आहे.*
*लेख - गुरूगृही सेवा - आनंदाचा ठेवा*
*श्रीमहाराजांचा सेवेकरी*
No comments:
Post a Comment