गोंदवले येथे श्री. गोपाळ स्वामी नावाचे एक शिक्षक होते. त्यांना झोप फार येत असे. त्यांनी तसे श्रीगोंदवलेकर महाराजांना सांगितले. श्रीमहाराज त्यांना म्हणाले ही रामरायाची कृपाच आहे. जागेपणी काहीतरी करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात त्यापेक्षा स्वस्थ झोपलेले बरे नाही का ? पुढे हेच गोपाळ स्वामी गोंदवले आश्रमात कोठीचे काम पाहात असत. त्यांचा हात आखडता होता.
श्रीमहाराज त्यांना म्हणाले गुरुजी रामराय एवढे देतोय, आपण हात आखडता का घेता? त्यावर गोपाळ स्वामी त्यांना म्हणाले येथे लोक इंद्रियदमन करण्यासाठी येतात. थोडे कमी खाल्लेले बरे. त्यावर श्रीमहाराज म्हणाले गुरुजी आईला लेकराला अजीर्ण झालेले चालते पण लेकरू उपाशी राहिलेले पहावत नाही. तशी माझी स्थिती होते. रामनवमी उत्सव गोकुळाष्टमी उत्सव झाला की मंडळी घरी जायला निघायची.
ते निघाले की महाराजांचे अंत:करणं जड होई. त्यावर एकाने विचारले महाराज आपले एवढे अंत:करणं जड का होते? त्यावर ते म्हणाले मुलीचे लग्न करून द्यावेव त्या मुलीचा नवरा बदफैली निघावा. चार दिवस मुलगी माहेरी येते. आनंदात असते.
घरी जायला निघते त्यावेळी तिच्या आईला ज्या वेदना होतात ना तसेच मला होते. प्रपंच म्हणजे त्या बदफैली नवऱ्यासारखा आहे. म्हणून ते प्रपंचात पुन्हा जातात म्हणूनच माझे अंत:करण त्या मातेप्रमाणे जड होते.
No comments:
Post a Comment