*आपली नित्य परिपाठाची पोथी कोठें ठेवावी, कशी ठेवावी, वाचावयास कोठें व कसें बसावें?*
संकलन आनंद पाटील
*याविषयींचे नियम हि आपण अवश्य पाळले पाहिजेत. नित्य श्रवणमननाची आपली पोथी शुद्ध व पवित्र जागी ठेवावी, व्यवस्थित ठेवावी, पवित्र व निर्मळ अशा एकांत स्थळीं ती वाचावयास हातीं घ्यावी व श्रीसमर्थांनींच शिकविलेलें*
*ती मननपूर्वक वाचावी ! तात्पर्य आपली पोथी श्रीसद्गुरुरूप आहे अशी अचल भावना असावी. पोथी कोठें हि ठेवली व कसें हि बसून वाचली म्हणून काय बिघडतें, समजली ह्मणजे झालें, असल्या भ्रष्ट कल्पनेचा मनाला स्पर्श हि होऊं देऊं नये.* *वेणाबाईंपेक्षां तर आपणांस जास्त समजत नाहीं ना !*
*एक गोष्ट : एकदां काय झालें, एक महंत दासबोध वाचीत पलंगावर उताणे पडले* *होते. तिकडून वेणाबाई आल्या. त्यांनी हा प्रकार पाहून*
*पलंगापुढें साष्टांग नमस्कार घातला. महंताला वाटलें* *वेणाबाईंनी हा नमस्कार* *आपल्यालाच घातला. तो अधिकारानें व वयानें* *वेणाबाईपेक्षां लहान होता, तेव्हां त्याला याचें जरा आश्चर्य वाटलें पण तें कार वेळ टिकलें नाहीं. श्रीमत् दासबोध ह्मणजे प्रत्यक्ष श्रीसमर्थच आहेत,*
*अशी वेणाबाईंची निष्ठा पाहून महंत ओशाळला, त्याला आपल्या अव्यवस्थितपणाची लाज वाटली व पुन्हां त्याच्या हातून असलें अमर्याद वर्तन घडलें नाहीं.*
No comments:
Post a Comment