मैत्री या संदर्भात पु.श्री.गुरुदेव रानडे व श्री.काकासाहेब तुळपुळे (गुरुदेवांचे गुरुबंधू) यांची एक आठवण . १९१२ - १३ साली दोघेही डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात राहात होते.
त्यावेळी एका प्रसंगाने एका मित्रा बद्धल बोलताना श्री गुरुदेव म्हणाले " माझा एक स्नेही नुकताच एम.ए. झाला आहे आणि त्याला एकदम मोठ्या ऑफिसरची जागा मिळाली आहे.
तेव्हा पासून त्याचा अभिमान वाढला आहे. देव आणि परमार्थ याची तो उपेक्षा करू लागला आहे. त्यामुळे त्याच्या बद्धल मला प्रेम वाटत नाही.
पुढे म्हणाले ग्रीक तत्वज्ञानाने तीन प्रकारची मैत्री सांगितली आहे.
१) स्वतःच्या लाभासाठी
२) परस्परांच्या संगतीत राहून सुख मिळविण्यासाठी
3)तत्त्वासाठी.
यातील तत्वासाठी केलेली मैत्री ही खरी मैत्री होय.
त्यामुळे परमार्थ हे ज्याचे ध्येय आहे त्यांनी त्याकरिता उपयुक्त व उपकारक मित्र असे संबंध जोडावेत.ह्यावर श्री.काकासाहेब म्हणाले आपण म्हणता ते खरे आहे. काका पुढे म्हणाले तुमचा मित्र नास्तिक जरी असला तरी भलेपणा दाखविला पाहिजे व पूर्वीच्या मैत्रीमुळे त्यांचा तुमच्या भलेपणावर हक्क आहे.
यावर श्रीगुरुदेव म्हणाले माझ्या मित्राचा माझ्या भलेपणावर हक्क आहे आणि तसा सर्व जगाचा पण आहे. हे ऐकून काकांना फार आश्चर्य वाटले कारण वयाच्या पंचविसाव्या वर्षीच जगाला भलेपणा दाखवायचा हे गुरुदेवांना इतक्या लहान वयात स्पष्टपणे समजले होते.
No comments:
Post a Comment