||श्रीराम
आनंद आणि उत्साह ह्या दोन चाकांवरच वाढत्या वयाचा रथ चांगल्या तर्हेने चालतो. आपल्या दैनंदिन जीवनाकडे आपण कशा दृष्टिकोनातून पाहतो ह्यावरच आपले सौख्य अवलंबून असते. अर्धा पेला रिकामा आहे ह्या ऐवजी अर्धा पेला भरलेला आहे ही समाधानाची भावना हे जीवन सुसह्य करण्यास मदत करते.
मुळात कोणतेही दुःख कधीच कायम स्वरूपाचे नसते तरी देखील, प्रत्येक दुःखी घटनेनंतर हमखास सतावणारा एक यक्षप्रश्न सतत मनात येत असतो की 'हे माझ्याच बाबतीत असे का घडले? या प्रश्नाला कधीच उत्तर नसते.. किंबहुना जे घडते ते तसेच घडणारे असते. कारण प्रत्येकाचे विधीलिखित हे ठरलेले आणि अटळ असते. मग अशा परिस्थितीत मनात राग द्वेषानी उद्विग्न होऊन दुःखी व्हायचे की ईश्वर शरणागतीने आलेल्या प्रसंगाला सामोरे जायचे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असते. त्यासाठी विवेक मात्र सतत जागा असायला हवा.
प्रत्येक प्रतिकूल प्रसंगाला अत्यंत शांतचित्ताने सामोरे जायला शिकणे आणि अनुकूल प्रसंगात शांत रहायला शिकणे म्हणजेच नित्य विवेक जागा ठेवणे ही साधनेची सुरुवात होय.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment