जग काय आहे तर ते परमात्मास्वरूपच आहे. त्या परमात्मस्वरूपाची तीन अंगे आहे. तो सच्चिदानंद आहे. सत, चित व आनंद. आनंद हे त्याचे खरे स्वरूप आहे.
कारण प्रेरणा तिथूनच येते. सारखा आनंद बाकीच्या गोष्टी आनंदामध्ये आपोआप येतात. जर हे विश्व आनंदमय आहे आणि हा अनुभव सत्पुरुषांना आहे तर मग हे जग सुद्धा आनंदमय असलं पाहिजे.
आम्हाला ते दिसत नाही. आता समजा प्रत्येक व्यक्ती हा मणी समजला आणि ते एका धाग्यात ओवलेले आहे आहेत. मग ते सुद्धा आनंदमय असले पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. जर असं आहे तर मग दुःख करण्याचे कारणच काय ?
या आंनदाचे स्वरूप मी विसरतो तेव्हा दुःख आहे, हे त्याच्या इच्छेने आहे, हे मी विसरतो. आपल्या दृष्टीने सुख आणि दुःख आपण बघू तसं आहे. एक नारायण बुवा जालवणकर म्हणून दत्त भक्त होते. त्यांना लग्न करायचे नव्हते.
आईने आग्रह केला म्हणून लग्न केले. बाळंतपणात त्यांची बायको मेली म्हणून त्यांनी गावात पेढे वाटले. कारण पाशातूनमुक्ती मिळाली. ही श्रुष्टी जर आनंदमय आहे तर आपण आपल्या मनाची धारणा जी आहे ती बदलली की झालं. ती धारणा बदलायला तो अंतर्यामी आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. हे ती धारणा बदलणं आहे.
No comments:
Post a Comment