प्रत्येक ठिकाणी माणसाला आपल्या मर्यादेची जाणीव आहे. मग प्रयत्न खरा की परिस्थितीने येणारे खरे ? याला प्रारब्ध म्हणतात. परिस्थितीचे जे दडपण आपल्यावर असते त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध आणि प्रयत्न या संदर्भात पु.श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " जो पर्यंत मीपणा आहे तो पर्यंत प्रयत्न श्रेष्ठ. मीपणा गेला की प्रारब्ध श्रेष्ठ." ही खरी आत्मज्ञानाची बुद्धी. सत्पुरुष देह प्रारब्धावर सोडतात. एक ब्रिटन तत्वज्ञानी म्हणतो "तुम्ही इथे डोळ्यांची पापणी जरी हालविली, तरी त्याचा परिमाण आकाशगंगेवरती होतो. संबंध विश्व बंधनात आहे. ते सर्व नियमांनी चालते." तर मग माणसाला स्वातंत्र्य काय आहे? तेव्हा तत्वज्ञान दृष्ट्या माणसाला स्वातंत्र्य नाही. मग स्वातंत्र्य आहे हा भ्रम आहे. हा मीपणाचा भ्रम आहे. सगळे जर प्रारब्धाचे आहे तर मग आपल्या हातात काय आहे.? विश्वाची जे रचना आहे, ज्या घटना घडतात त्यामध्ये माणूस थोडा इकडचा तिकडे हलू शकतो. ह्याला श्री.गोंदवलेकर महाराजांनीं छान उदा.दिले. एका घराला दोन खोल्या आहेत. त्यामध्ये चार माणसे राहतात. प्रत्येकाची निजण्याची जागा ठरलेली. मग स्वातंत्र्य किती? एखादा ह्या कोपऱ्यात निजत असेल तर दुसऱ्या कोपऱ्यात निजेल एवढे स्वातंत्र्य आहे ." तसं माणसाला मर्यादित स्वातंत्र्य आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment