TechRepublic Blogs

Saturday, May 31, 2025

मृग नक्षत्रा

 *'आभाळ'*  म्हणलं कि मग त्यानं भरून यावं.

*'सर'* म्हटलं तर तिनं बरसून जावं.


*'पाऊस'* म्हणलं कि मग तो कोसळत रहावा.

*'धुवांधार'* या शब्दाचा अर्थ त्याच्याकडे पाहून कळावा.


*'मेघ'* म्हटलं कि तो धरेवर बरसत रहावा.

*'ढग'* म्हटलं कि मग त्यानं फक्त गडगडाट करावा.


*'थेंब'* म्हटलं कि तो ओंजळीत जपून ठेवावा.

आणि

*'मृदगंध'* मात्र मनाच्या कुपीत आयुष्यभर साठवावा.


☔☔


  मृग नक्षत्राच्या हार्दिक शुभेच्छां. 

💦💧💦💧💦💧🌳🌳

Friday, May 30, 2025

म्हातारपण

 ✍️ *वाचण्यात आलेला सुंदर लेख*

            *🧑‍🦯म्हातारपण!!* 🙋🏻‍♂️


*रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू लागला.*

        *"मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे, आपल्याकडे.* 

*माझा मित्र प्रतिक आणि त्याची बायको प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे, म्हणून मी, आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं, आपल्या घरी पार्टी करायची.* 

       *अनायसे रविवारच आहे उद्या, मस्त धम्माल करूया सगळे मिळून, आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी खूप काही विशेष करु नकोस, तर अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून.* 

   *खाऊन खाऊन त्यांच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं म्हणून अमित खळखळून हसला.* 

      *त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो.* 

      *मैत्रीची जादूच खरी आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?*

      *बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाचीही छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता.* 

        *हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली.* 

*हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता.* 

       *घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत.* 

       

*मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलची,     सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी, असा शॉर्ट अँड स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.*  

        *गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता.* 

      *सगळेच जण हसण्या, बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला,* 


*"नाना अहो हे काय?, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू."*   

      *भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले,* 

*तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली.* 


*"असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका."* 


*असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.*  

      *थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला,* 


*"वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं.*

 

       *खरंच खूप छान वाटतंय आज मला.* 

*फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा,*

    *अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू.* 

*काही उमजत नाही गं आताशा त्यांना.* 

*उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग.*

     *अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली.* 


*"हो रे, अगदी बरोबर आहे तुझं.* 

*कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ?* 

*पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?*

       

*मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ?* 

*तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील,* 

*मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ?* 

*नाही ना ?*

        *लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.*  

*जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला.*

      *वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं.* 

*तू दिलेला शी - सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला,* 

*तुला फ्रिडम दिलं, उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?...* 


*असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा  ऐकून घे.*  

       *मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना.* 

*नविन नविन असताना, खूप रडायला यायचं.* 

*आईची आठवण त्रस्त करायची.*

        *तू कामात बिझी असायचा,* 

*अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते फक्त नाना.* 


*एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच.* 


*कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.*

       

*आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ?* 

      

*हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही.* 


*उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो.*


       *पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते.* 

*मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?*

    

        *अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला,* 


*"मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ?* 

*पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार.* 

*बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर."*


       *"अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ?* 

*आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने*


       *आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते.*   *"अमित"...….*


      *अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं.* 


*नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.*


       *नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले.* 


*"अरे अमित तू ?* 

*ये बाळा, झोपला नाहीस का अजून ?* 

*अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी."*


       *नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला.*

 

       *"नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो.   यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही.* 

     *आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी."*


      *लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले.*

 

       *केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि..* 


*चिमुकले घरही मग आनंदाने हसले….!!!*


_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



Wednesday, May 28, 2025

ईश्वराच्या सान्निध्यात रहाणे

 

           श्रीराम,

       सार नसलेल्या संसारात आपण कोठवर रमायचे हा फार महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाला दैनंदिन जीवनात वावरताना अत्यंत प्रामाणिकपणे आपला अंतर्मुख आढावा घेण्यासाठी एक मोक्याची जागा शोधावी लागते. (उदा:-स्टेजवरील विंग तिथून प्रेक्षागृह व स्टेज दोन्ही दिसते.) रोज प्रामाणिकपणे आढावा घेत राहिलो की हळूहळू आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी तटस्थ बनते.

 म्हणजेच विवेक जागा रहातो. आणि मग मात्र कोणतीच घटना प्रतिकूल वाटेनाशी होते. प्रत्येक घटना अनुकूल वाटायला लागली की २४×७ ×३६५ आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होते. अशी  कायम आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होणे म्हणजेच कायम सत् चित् आनंद स्वरूप ईश्वराच्या सान्निध्यात रहाणे.

                   नावेत बसलेल्याने पैलतीर गाठले की त्याला स्थैर्य लाभते. उडत्या पक्ष्याला घरट्यात परत फिरून यावेच लागते, मगच त्याला स्थैर्य मिळते. तसेच गतिमान जीवनाच्या या प्रवाहात आपल्याला स्थैर्य अनुभवाचे असेल तर ते आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होते. पण त्यासाठी ईश्वरी शरणागती आणि आत्मानात्मविवेक जागा हवा.

                    ||श्रीराम ||

Tuesday, May 27, 2025

प्रारब्ध

 श्री.समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'यत्न तो देव जाणावा' पण असे दिसते की दैवात असलेल्या गोष्टी घडणारच त्या अटळ आहे असे आहे तर प्रयत्नाला काही वावच नाही असे दिसते.

 अशी शंका एका भक्ताने श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारली. त्यावर श्री.महाराज म्हणाले "जन्मला आल्यावर माणसाला ऐहिक सुख दुःख कसे आणि किती मिळवायचे हे त्याच्या प्रारब्धानुसार ठरलेले असते हे खरे आहे. 

काही प्रयत्न जरी आपल्याला दिसला तरी त्याचे फळ प्रारब्धानुसारच मिळत असते. तरीही यत्न तो देव जाणावा असे म्हटले आहे त्यात दुहेरी हेतू आहे. एक म्हणजे हा प्रयत्न नंतरच्या काळाला किंवा पुढच्या जन्माला प्रारब्ध या सदराकडे जमा होत असतो.

 पण प्रयत्न हा जर केवळ कर्तव्यबुध्दीने आणि फळाची आशा न धरता केला तर तो "प्रारब्ध" या सदरात मोडत नाही. म्हणून अशा तऱ्हेने यत्न करण्याची सवय लावून घ्यावी. पण त्यात दुसरा हेतू तो परमार्थाला लागू आहे. मनुष्याला एक खास देणगी दिली आहे ती बुध्दीची व सारासार विवेकाची. तिचा योग्य वापर करून परमार्थाची कास जो धरील तो नराचा नारायण होऊन जाईल. हे विवेकाचे सुप्त सामर्थ्य आहे. ह्या अनुषंगाने भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे हे स्वातंत्र्य वापरून त्याने आत्मोन्नतिकडे वाटचाल करावी हे समर्थांना सांगावयाचे आहे.

Monday, May 26, 2025

स्मरण

 


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा : ज्योतीऐवजी श्रीरामाचीं किंवा श्रीमहाराजांची सतेज मूर्ती कल्पावी. हे ध्यान करतांना ताटस्थ्य-शून्यावस्था येत नाही ना हे पाहिले पाहिजे. श्रीमहाराजांच्या विचारांपेक्षाही त्यांच्या जीवनातील घटनांचे चिंतन केले तर त्याचा नामस्मरणास चांगला उपयोग होतो. आपण जणू काही ते प्रसंग पुन्हा जगतो. (In fact, we relive those incidents)*


*अनुसंधान ठेवण्यास मन रिकामे ठेवावे किंवा संतचरित्रातील गोष्टींचे चिंतन करून मन त्यांनी भरून टाकावे. रिकाम्या मनात प्रसन्नता रहात असेल तर ते करायला हरकत नाही. पण सर्वसामान्यपणे आपल्या गुरूंच्या चरित्रातील प्रसंगांचे कल्पनेने स्मरण केले तर त्याचा आतील इंद्रियांशी स्पर्श होऊन अनुसंधान चांगले टिकेल.*


    *🍁अध्यात्म संवाद🍁*

Sunday, May 25, 2025

शास्त्र

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।* ‌ 


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*परमार्थ  हे  कृतीचे  शास्त्र  आहे .*


एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्‍गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ. दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.


संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.


नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.


*१८० .   सर्व  काही  करावे  ।  पण  खरे  प्रेम  साधनावर  असावे  ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

अनुभव

 श्रीराम समर्थ


सभोवार ईश्वर आहे. 


       पॉंडिचेरी येथें श्रीअरविंदांच्या आश्रमामधें माताजी नांवाच्या मोठ्या अधिकारी बाई होत्या. त्यांनी जपासाठी मंत्र मागितला. तेव्हां ' ॐ नमो भगवते' हा सात अक्षरी मंत्र त्यांना मिळाला. माताजीनी त्या मंत्राचा अखंड जप केला. जातायेता, खातापिता, स्नान करतांना, कपडे घालतांना त्यांचा जप चालूं असे. त्या जपाचा परिणाम त्यांच्या मनावर तर झालाच, पण तो मंत्र त्यांच्या शरीरातील पेशींमधून ऐकूं येऊं लागला. जपामधें त्या जसजशा लीन होऊ लागल्या तसतसा ईश्वर आपल्या समोर पसरलेला आहे असा त्यांना अनुभव आला. ईश्वराचा जणूं काय आपल्याला स्पर्श होत आहे इतका खरेपण त्या अनुभवाला होता.

               *********

संदर्भः साधकांसाठी संतकथा ह्या प्रा के वि बेलसरे ह्यांच्या पुस्कातून पान १२४

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Friday, May 23, 2025

सुख

 🌹🌻 - शाश्वतचे सुख कसे लाभेल ?  🌹🌻


असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. 


कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. 

आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. 

पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. 


एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. 


प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? 

अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? 

तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. 

या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.


खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. 


परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : 

एक, देहाने साधूची संगत; 

दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि 

तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. 


संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.


१७९. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार; 

भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ.

Thursday, May 22, 2025

पोथी कोठें ठेवावी

 *आपली नित्य परिपाठाची पोथी कोठें ठेवावी, कशी ठेवावी, वाचावयास कोठें व कसें बसावें?*

संकलन आनंद पाटील 

*याविषयींचे नियम हि आपण अवश्य पाळले पाहिजेत. नित्य श्रवणमननाची आपली पोथी शुद्ध व पवित्र जागी ठेवावी, व्यवस्थित ठेवावी, पवित्र व निर्मळ अशा एकांत स्थळीं ती वाचावयास हातीं घ्यावी व श्रीसमर्थांनींच शिकविलेलें*

*ती मननपूर्वक वाचावी ! तात्पर्य आपली पोथी श्रीसद्गुरुरूप आहे अशी अचल भावना असावी. पोथी कोठें हि ठेवली व कसें हि बसून वाचली म्हणून काय बिघडतें, समजली ह्मणजे झालें, असल्या भ्रष्ट कल्पनेचा मनाला स्पर्श हि होऊं देऊं नये.* *वेणाबाईंपेक्षां तर आपणांस जास्त समजत नाहीं ना !*

*एक गोष्ट  : एकदां काय झालें, एक महंत दासबोध वाचीत पलंगावर उताणे पडले* *होते. तिकडून वेणाबाई आल्या. त्यांनी हा प्रकार पाहून*

*पलंगापुढें साष्टांग नमस्कार घातला. महंताला वाटलें* *वेणाबाईंनी हा नमस्कार* *आपल्यालाच घातला. तो अधिकारानें व वयानें* *वेणाबाईपेक्षां लहान होता, तेव्हां त्याला याचें जरा आश्चर्य वाटलें पण तें कार वेळ टिकलें नाहीं. श्रीमत् दासबोध ह्मणजे प्रत्यक्ष श्रीसमर्थच आहेत,*

*अशी वेणाबाईंची निष्ठा पाहून महंत ओशाळला, त्याला आपल्या अव्यवस्थितपणाची लाज वाटली व पुन्हां त्याच्या हातून असलें अमर्याद वर्तन घडलें नाहीं.*

महर्षी शांडिल्य

 *"पहिल्या दालनापर्यंत..."*



आपल्या भारतवर्षात *महर्षी शांडिल्य* एक थोर ऋषी म्हणुन मानले गेले.  त्यांचा *"शांडिल्यभक्तिसूत्राणि"* हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.


*सर्वज्ञान* मिळवण्याच्या आशेने त्यांच्या आश्रयी आलेले त्यांचे अनेक शिष्य होते. सर्वज्ञान मिळवून देण्यासाठी ते नेहमी महषींना विनंती करीत असत.


पण महर्षि शांडिल्यांच्या मते ती वेळ अजुनी आलेली नव्हती. सर्वज्ञानाचा साक्षात्कारी अनुभव मिळविण्यासाठी बरीच तपश्चर्या करण्याची तयारी लागते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे ते आपल्या शिष्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून तो दिवस लांबणीवर टाकत असत.


त्यामुळे शिष्यगणात नाराजी पसरू लागली होती आणि सारे आतुर होऊ लागले होते. उतावळे होऊनच मग त्यांनी शेवटी महर्षींना विचारले की ते तो अनुभव लवकर का घडवून आणत नाहीत ?


“वत्स हो, सर्वज्ञानाची अनुभूती ही काही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी माणसाला खूप पूर्वतयारी करावी लागते. त्यापूर्वीच जर तुम्ही तो अनुभव घेतला तर तो तुम्हाला झेपणारच नाही. तुम्हाला त्यापूर्वी बरीच साधना करावी लागणार आहे, गुरुदेवांनी उत्तर दिले."


“पण आजवर आम्ही काय कमी साधना केली ? शिवाय तुम्ही आम्हांला सांगितलं होतं की ज्ञानाच्या मार्गाने गेलात की दिव्य सर्वज्ञानाचा साक्षात्कार होईलच.आजवर तुमच्याकडून आम्ही इतके ज्ञान मिळविले. आम्ही तयार झालो आहोत. मग तो दिव्य साक्षात्कार का घडवून आणत नाही?” 


एका धीट शिष्याने विचारले.


“असे? तुम्ही तयार आहात का? अंतिम सत्याचा साक्षात्कार घेण्याएवढे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेत का इतक्यात?” गंभीरपणे मंद हास्य करीत महर्षी उद्गारले. मग थोडा काळ मूक राहून ते पुढे म्हणाले, 


“तुमच्या मागणीतून अहंभाव आणि

उतावीळपणाचा गंध येतो आहे. आणि तुमच्या आविर्भावात प्रेम आणि श्रद्धा यांचा अभावच दिसून येतो."


“पण मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. तेव्हा तुमच्या मागणीला नकार देणे मला कठीण वाटते. मी असे करेन. तुम्हा सर्वांना तुमच्या लायकीनुसार त्या अंतिम सत्याची एक झलक दाखवू शकेन. चला, सर्वजण डोळे मिटून घ्या.”


डोळे मिटताच गुरुदेवांच्या कृपेने काही क्षणातच सर्व शिष्यांना आपण अवकाशात तरंगत गेल्याचा अनुभव आला.तसेच अलगद तरंगत ते एका थोरल्या भव्य कमानीपर्यंत पोहोचले. कमानीचा दरवाजा त्यांच्या स्वागतासाठी हळुवार उघडला आणि गुरुदेवांचा आवाज आकाशवाणीसारखा आला, 


"वत्स हो! अंतिम प्रकाशमान सर्वज्ञानाच्या आवारात तुमचे स्वागत असो. तुम्ही आत या आणि तुमचा प्रवास चालू राहू द्या.”


कमानीच्या आत शिरताच एका अनाकलनीय अद्भुत विश्वात शिरल्याचा भास सर्वांना झाला. त्या विश्वातून तरंगत ते सर्व एका नव्या भव्य कमानीच्या बंद दरवाजासमोर पोहोचले. त्यांच्या नजरेसमोर हा दरवाजादेखील उघडला, पण त्यातून आत शिरल्यावर एका काळ्याकभिन्न अंधाराने त्यांचे स्वागत केले. चोहोबाजूंना पाहावे तर काहीच दिसू शकत नव्हते! त्यातून वाट चुकून ते सर्व धडपडू, अडखळू लागले. त्यांचा सर्व आत्मविश्वास आणि त्यांचे धैर्य त्या अंधारात वितळून जाऊ लागले. त्या विस्तीर्ण अंधकाराचा जोर सहन न झाल्याने शेवटी सारे शिष्य एक सुरात ओरडले, 


“गुरुदेव, आम्हाला वाचवा. आम्ही कुठे आहोत, आम्हाला कुठे जायचे आहे, काही कळत नाही. हा अंधार आम्हाला असह्य वाटतो.”


त्याचक्षणी त्यांचे डोळे उघडले तेव्हा समोर महर्षी शांडिल्य आपले नेहमीचे स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून त्यांच्याकडेच पाहत होते. 


“गुरुदेव, हे काय झाले?”


शिष्यांनी एक सुरात विचारले, 


“आम्ही असे कुठे अडकलो? आम्ही ज्यात पूर्ण फसलो तो अंधार काय होता? आम्हांला काहीच कसे काय दिसू शकत नव्हते?”


*“कारण तुमची आजवरची तयारी ही त्या प्रासादाच्या पहिल्या दालनात पोहोचण्याचीच झाली आहे. पुढे जाण्याची शक्ती अजून तुम्ही मिळवलेली नाहीच आहे.”*



*गुरुजी पुढे म्हणाले,* 

“तुम्ही ज्या दालनात प्रथम प्रवेश केलात ते ज्ञानाचे दालन होते. तुम्ही दुसऱ्या दालनात प्रवेश तर केलात, तो प्रेमाच्या दरवाजातून तो तर सर्व प्राणिमात्रांसाठी उघडतो. पण प्रेमाच्या दालनात शिरताच तुम्ही आंधळे झालात. *अहंभाव* आणि *उतावळेपणा* या दोन दोषांनी तुम्हाला अंध बनविले आणि त्यामुळे तुम्हाला प्रेमाच्या दालनाचे दर्शन होऊ शकले नाही. या दृष्टिदोषांमुळे तुम्ही भरकटलात.



"एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वज्ञानाच्या अंतिम आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ प्रचंड ज्ञान पुरेसे नाही. ते तुम्हांला अंतिम आनंदाच्या जवळपास प्रथम दालनात पोचवू शकते. *केवळ प्रेम आणि श्रद्धा यांची शक्तीच तुम्हांला त्यापुढे नेऊन सर्वज्ञानी बनवू शकते.* ज्ञान आणि प्रेम यांच्या सुयोग संगमावरच सर्वज्ञानाचा साक्षात्कार होऊ शकतो.


“म्हणून माझे म्हणणे नीट ऐका. ज्ञान संपादन करणे आणि त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. पण त्याचवेळी अहंभाव आणि उतावीळपणा यांचा त्यागदेखील करायला हवा.पूर्ण श्रद्धेने दिव्यत्वाला सामोरे जा आणि त्या ईश्वराच्या निर्मितीची अत्यंत प्रेमाने सेवा करा. आत्यंतिक ज्ञान आणि आत्यंतिक प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्या दोन्ही बाळगल्या तरच आत्यंतिक साक्षात्कारी प्रकाश दिसू शकतो.


"जा,ईश्वराने निर्मिलेल्या या प्रचंड जगात फिरून तेथील लोकांची मनोभावे आणि प्रेमभावनेने सेवा करा. त्यानंतर त्या दुसऱ्या दिव्य दालनात प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे या!”



या कथेतून बोध काय बोध घेता येईल? 


*"अहंभावाव्यतिरिक्त मिळवलेले ज्ञान आणि प्रेमभाव आणि श्रद्धा यांच्या सहाय्याने केलेली सेवा यामुळेच आयुष्याचा अर्थ कळतो आणि परमात्म्याचे दर्शन होते. तसेच मानवी आयुष्यात शारीरिक आणि अशारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवरून केवळ प्रेमाच्या शक्तीमुळेच तग धरता येतो आणि या दोन्ही पातळ्यांना जोडणारा निश्चित दुवा हा मार्गदर्शक गुरूचाच असतो!"*



*- आचार्य रत्नानंद*

Wednesday, May 21, 2025

प्रपंच

 एक सद्गृहस्थ प.पु.श्रीप्रल्हाद महाराजांच्या मठात साखरखेरड्याला प्रथम गेले होते. त्याच्या सासुरवाडीच्या मंडळींचे पु.श्रीप्रल्हाद महाराज गुरू होते. ते आले तेव्हा दुपारची वेळ होती. मंदिर बंद होते. त्यांना खूप तहान लागली होती. हे सद्गृहस्थ मंदिराच्या बाहेर ओट्यावर बसून होते. प्रथमच गेल्यामुळे ओळखीचे कोणीही नव्हते. 

अचानक आवाज आला " तुम्हाला तहान लागली आहे ना ? पाणी प्या." महाराज मागे स्वतः उभे आणि त्यांनी रामरायाच्या समोर भरून ठेवलेल्या चांदीच्या तांब्यापेल्यातलेच पाणी आणले. महाराज म्हणाले तुम्ही कुलकर्णी यांचे जावई आहात ना, आत या. श्रीमहाराजांनी स्वतः त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली. पुढे त्यांना अनुग्रह दिला व ते शिष्य झाले. 

हेच पुढे निवृत्त झाल्यावर एकदा श्रीप्रल्हाद महाराजांकडे आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले " जमा किती आहे?" ह्याना वाटले बँकेत किती पैसे जमा आहेत. बँकेत पैसे कमी जमा आहेत हे सांगितले. पुढे म्हणाले त्यातून मुलीचे लग्न व्हायचे आहे, मुलगा मार्गी लागायचा आहे. त्या मानाने ही जमा अगदी तुटपुंजी आहे. 

हे ऐकल्यावर श्रीमहाराज म्हणाले " ह्या बँकेतील जमा नाही विचारत. तुमचा आत्तापर्यंत जप किती जमा झाला आज?"  तेव्हा ते म्हणाले " महाराज माझी पाटी एकदमच कोरी आहे" महाराज म्हणाले " मग आता जास्त  जप करावयास हवा. रामराय सर्व सांभाळतील." तिथपासून ह्यांनी मनापासून जप करायला सुरुवात केली व जास्तीतजास्त नामात रहाण्याचा प्रयत्न केला. आहे त्या परिस्थितीत मुलामुलींचे लग्नकार्य सर्व चांगले झाले. कर्ज काढण्याचे काम पडले नाही. श्रीमहाराजांनी सांगितलेले नाम पतीपत्नींने मनापासून घेतले. आमचा प्रपंच श्रीप्रल्हाद महाराजानी सांभाळला अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.

Tuesday, May 20, 2025

प्रारब्ध

 प्रत्येक ठिकाणी माणसाला आपल्या मर्यादेची जाणीव आहे. मग प्रयत्न खरा की परिस्थितीने येणारे खरे ? याला प्रारब्ध म्हणतात. परिस्थितीचे जे दडपण आपल्यावर असते त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध आणि प्रयत्न या संदर्भात पु.श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " जो पर्यंत मीपणा आहे तो पर्यंत प्रयत्न श्रेष्ठ. मीपणा गेला की प्रारब्ध श्रेष्ठ." ही खरी आत्मज्ञानाची बुद्धी. सत्पुरुष देह प्रारब्धावर सोडतात. एक ब्रिटन तत्वज्ञानी म्हणतो  "तुम्ही इथे डोळ्यांची पापणी जरी हालविली, तरी त्याचा परिमाण आकाशगंगेवरती होतो. संबंध विश्व बंधनात आहे. ते सर्व नियमांनी चालते."  तर मग माणसाला स्वातंत्र्य काय आहे? तेव्हा तत्वज्ञान दृष्ट्या माणसाला स्वातंत्र्य नाही. मग स्वातंत्र्य आहे हा भ्रम आहे. हा मीपणाचा भ्रम आहे. सगळे जर प्रारब्धाचे आहे तर मग आपल्या हातात काय आहे.? विश्वाची जे रचना आहे, ज्या घटना घडतात त्यामध्ये माणूस थोडा इकडचा  तिकडे हलू शकतो. ह्याला श्री.गोंदवलेकर महाराजांनीं छान उदा.दिले. एका घराला दोन खोल्या आहेत. त्यामध्ये चार माणसे राहतात. प्रत्येकाची निजण्याची जागा ठरलेली. मग स्वातंत्र्य किती? एखादा ह्या कोपऱ्यात निजत असेल तर दुसऱ्या कोपऱ्यात निजेल एवढे स्वातंत्र्य आहे ." तसं माणसाला मर्यादित स्वातंत्र्य आहे.

Monday, May 19, 2025

साधनेची सुरुवात

 

                  ||श्रीराम

                आनंद आणि उत्साह ह्या दोन चाकांवरच  वाढत्या वयाचा रथ चांगल्या तर्‍हेने चालतो. आपल्या दैनंदिन जीवनाकडे आपण कशा दृष्टिकोनातून पाहतो ह्यावरच आपले सौख्य अवलंबून असते. अर्धा पेला रिकामा आहे ह्या ऐवजी अर्धा पेला भरलेला आहे ही समाधानाची भावना हे जीवन सुसह्य करण्यास मदत करते.

             मुळात कोणतेही दुःख कधीच कायम स्वरूपाचे नसते तरी देखील, प्रत्येक दुःखी घटनेनंतर हमखास सतावणारा एक यक्षप्रश्न सतत मनात येत असतो की 'हे माझ्याच बाबतीत असे का घडले? या प्रश्नाला कधीच उत्तर नसते.. किंबहुना जे घडते ते तसेच घडणारे असते. कारण प्रत्येकाचे विधीलिखित हे ठरलेले आणि अटळ असते. मग अशा परिस्थितीत मनात राग द्वेषानी उद्विग्न होऊन दुःखी व्हायचे की ईश्वर शरणागतीने आलेल्या प्रसंगाला सामोरे जायचे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असते. त्यासाठी विवेक मात्र सतत जागा असायला हवा.

           प्रत्येक प्रतिकूल प्रसंगाला अत्यंत शांतचित्ताने सामोरे जायला शिकणे आणि अनुकूल प्रसंगात शांत रहायला शिकणे म्हणजेच नित्य विवेक जागा ठेवणे ही साधनेची सुरुवात होय.

                 ||श्रीराम ||

Sunday, May 18, 2025

यात्रेकरी

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌷 रामेश्वरचा यात्रेकरी 🌷*


 *श्रीमहाराज तेथून निघाले आणि श्रीसमर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. तेथे त्रिरात्र राहून ते पुढें रामेश्वराच्या वाटेला लागले. रामेश्वराला जाऊन परत येहळेगांबाला येण्यास त्यांना बरेच दिवस लागले. वाटेंत तिरुपतीला व्यंकोबाचे दर्शन घेऊन श्रीमहाराज जेव्हां खालीं आले तेव्हां रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्रीमहाराजांनीं त्याला उठवून बसवलें, आणि खायलाप्यायला घातल्यावर 'तुझी अशी अवस्था कां झाली ?' हा प्रश्न त्याला विचारला, त्यानें आपली हकीकत सांगितली ती अशी :*

*"मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलंगी आहे. मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा. मी एकुलता एक होतों म्हणून माझ्या आईबापांचें माझ्यावर अतिशय प्रेम होतें. या प्रेमामुळे माझे लाड फार झाले. पण या लाडांच्या पायीं मला अनेक त-हेच्या वाईट संवयी लागल्या. मी मोठा झाल्यावर त्यांमध्यें व्यसनांची भर पडली. माझी आई होती तोंवर सगळे नीट चाललें; परंतु मी तीस वर्षांचा असतांना ती बारली आणि माझ्या बापानें दुसरें लग्न केलें. माझी नवीन आई घरांत आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली. ती माझ्या अत्यंत द्वेष करी. मी घराबाहेर पडावें असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. कर्मधर्मसंयोगानें याच सुमारास मला उपदंश झाला आणि माझें अंग सगळीकडे फुटलें. मी फार आजारी पडलों आणि मला उठण्याचीहि शक्ति राहिली नाहीं. परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा व प्रामाणिक गडी आमच्या घरीं होता. त्यानें अगदीं मनापासून माझी शुश्रूषा केली. औषधपाणी चालू होतें, तरी माझ्या रोगामध्यें कांहीं सुधारणा होईना. उलट, दिवसेंदिवस मी खंगतच चाललों. माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नसती पीडाच वाटत होती. म्हणून माझ्या अन्नांत विष कालवून माझा निकाल लावावा असें एक दिवस तिनें ठरवलें, पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिनें रचला. ही गोष्ट गड्यानें माझ्या कानावर घातली तेव्हां पहिल्यानें मी अत्यंत घाबरलों, पण कांहीं वेळानें एक विचार माझ्या मनांत आला आणि मी शांत झालों. लहानपणापासून श्रीरामेश्वरावर माझे फार प्रेम आहे. मी असा विचार केला कीं, 'आजपर्यंत या जगांतली सर्व उत्तम सुखें त्याच्या कृपेनें मी भोगलीं. आतां त्याच्याजवळ मागण्याचें असें मला आणखी कांहीं उरलेलें नाहीं. एकच आतां वाटतें, तें हैं कीं, आपलें शरीर अंतकाळीं त्याच्या चरणावर जाऊन पडावें.' म्हणून, 'मला उचल आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेव' असें मी माझ्या गड्याला सांगितलें. त्याप्रमाणें मध्यरात्र झाल्यावर त्यानें मला आपल्या पाठीवर घेतलें आणि रस्त्यावर आणून ठेवलें. मोठ्या कष्टानें त्यानें माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतों; कुणालाही कांहीं मागत नाहीं, यदृच्छेनें जें मिळेल तें खाऊन मी जगतों; माझ्या शक्तीनें जाववेल तितकी रामेश्वरची वाट रोज चालतों. सध्यां मी येथपर्यंत आलों आहें, पुढें काय होणार आहे तें रामेश्वर जाणें. परंतु या अवस्थेंतदेखील मी आनंदांत आहे."*


*भिकाऱ्यानें सांगितलेली ही हकीकत ऐकून श्रीमहाराजांना आणि त्यांच्या बरोबरच्या चार बैराग्यांना त्याचें फार कौतुक वाटलें, श्रीमहाराज त्याला म्हणाले, "श्रीरामेश्वराच्या दर्शनाची तूं काळजी करूं नकोस. आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊं. तूं नामस्मरण तेवढे कर." त्याला उचलून नेण्यासाठीं श्रीमहाराजांनी एक झोळी तयार केली, व ती एका मोठ्या बांबूला अडकवली. पाळीपाळीनें दोघेदोघेजण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले. अशा रीतीनें कांहीं दिवसांनीं तो भिकारी रामेश्वरला पोंचला. तेथे गेल्यावर श्रीमहाराजांनीं त्याला चांगलें स्नान घातलें आणि देवदर्शनासाठीं मंदिरामध्यें नेलें, श्रीरामेश्वराला आपल्या प्रिय दैवताला - समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला कीं, त्यावेळीं त्याच्या तोंडून तेलुगु भाषेत एक सुंदर पद बाहेर पडलें, आणि त्यानें देवाच्या पायावर डोके टेकलें तें पुन्हां वर उचललेंच नाहीं. श्रीमहाराजांनीं त्याला वाळवंटावर नेलें आणि स्वतः आपल्या हातानें यथाविधि अग्नि दिला.*

- *चरित्र*

Friday, May 16, 2025

श्रद्धा

 *💫 श्रद्धा* 


*एका जुन्या इमारतीमध्ये एका वैद्यांचे घर होते. ते मागच्या भागात राहात असत आणि पुढच्या भागात त्यांनी दवाखाना उघडला होता.*


*दररोज, दवाखाना उघडायच्या आधी त्यांची पत्नी त्यादिवशीसाठी आवश्यक असलेल्या सामानाची यादी लिहून देत असे. वैद्य महाराज गादीवर बसून प्रथम देवाचे नाव घेत आणि ती यादी उघडू बघत. पत्नीने लिहिलेल्या वस्तूंच्या किमती बघून हिशेब करीत असत. नंतर परमेश्वराला प्रार्थना करीत की "हे परमेश्वरा, मी केवळ तुझ्या आदेशानुसार तुझी भक्ती सोडून येथे प्रपंचात येऊन पडलो आहे."*


*वैद्य महाराज आपल्या मुखाने कधीही कोणा रुग्णाकडून पैसे मागत नसत. कोणी देत, तर कोणी देत नसत, परंतु एक गोष्ट मात्र नक्की होती की त्या दिवशीच्या गरजेच्या सामानापुरते पैसे जमा झाल्यावर ते कोणाकडूनही पैसे घेत नसत. मग भले रुग्ण कितीही धनवान असला तरी काही फरक पडत नसे.*


*एके दिवशी वैद्य महाराजांनी दवाखाना उघड़ला. गादीवर बसून परमेश्वराचे स्मरण करुन पैशाचा हिशेब करण्यासाठी यादी उघडली आणि एकटक बघतच राहिले. क्षणभर त्याचे मन विचलित झाले. त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. पण लगेच त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला. रोजच्या वाणसामानाच्या यादी नंतर त्यांच्या पत्नीने लिहिले होते  : *”20  तारखेला आपल्या मुलीचे लग्न आहे तिच्या लग्नाला लागणारा आहेर."* 


*ते काही वेळ विचार करीत राहिले, नंतर बाकीच्या वस्तूसाठी लागणाऱ्या पैशाचा हिशेब केला आणि आहेराच्या सामानापुढे लिहिले, हे काम परमेश्वराचे आहे. परमेश्वरच स्वतः त्याची व्यवस्था करेल.*


*एक दोन रुग्ण आले होते. वैद्य महाराज औषध देत होते. त्याचवेळी, एक मोठी गाडी त्यांच्या दवाखान्याच्या समोर येऊन थांबली. वैद्यजीनी फारसे लक्ष दिले नाही, कारण त्यात नविन काहीच नव्हते. दोन्ही रुग्ण औषध घेऊन निघून गेले. कारमधून एक सूट-बूट घातलेले साहेब गाडीतून उतरले आणि नमस्कार करून बाकावर बसले. वैद्यजी म्हणाले की, “तुम्हाला स्वतःसाठी औषध हवे असेल तर या स्टूलावर येऊन बसा म्हणजे तुमची नाडी तपासता येईल आणि जर कोणा रुग्णाचे औषध घेऊन जायचे असेल तर रोग्याची अवस्था सविस्तर सांगा.”*


*ते साहेब सांगू लागले, "वैद्यजी! आपण मला ओळखले नाही. मी कृष्णलाल, परंतु आपण मला ओळखणार तरी कसे, कारण मी १५-१६ वर्षांनंतर या दवाखान्यात येत आहे. तुम्हाला मी आपल्या मागच्या भेटीची आठवण करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात सर्व गोष्टी येतील.*


*जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो, तेव्हा परमेश्वरच मला तुमच्याकडे घेऊन आला होता कारण  ईश्वराने माझ्यावर कृपा केली होती. त्याला आमचा संसार फुलवायचा होता.  त्याचे असे झाले होते की, मी गाडी घेऊन गावी आमच्या वडिलोपार्जित घरी जात होतो.

 बरोब्बर आपल्या दवाखान्याच्या समोरच आमची गाडी पंक्चर झाली. ड्रायव्हरने गाडीचे टायर काढले व पंक्चर दुरूस्त करायला घेऊन गेला. तुम्ही पाहिले की मी कारजवळ उन्हात उभा आहे, तेव्हा तुम्ही माझ्या जवळ आलात आणि दवाखान्याकडे बघून म्हणालात की आत येऊन खुर्चीवर बसा. मला हायसे वाटले आणि मी खुर्चीवर येऊन बसलो. ड्रायव्हरला जरा जास्तच वेळ झाला होता.*

 

*एक लहान मुलगी इथे तुमच्या टेबलाजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी म्हणत होती, “बाबा चला ना, मला भूक लागली आहे."*


*तुम्ही तिला म्हणत होतात, "बाळ, जरा धीर धर, जाऊ या." मी विचार करत होतो की मघापासून मी इथे बसून आहे, म्हणून तुम्ही जेवायला जात नव्हता. माझे येथे बसणे तुम्हाला जड जाऊ नये म्हणून मी काही तरी औषध घ्यायल हवे असे ठरवले. 

मी म्हणालो, "वैद्य महाराज मी मागील ५-६ वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत असून तिथूनच कारभार चालवतो. तेथे जाण्याआधी माझे लग्न झाले होते परंतु आजपर्यंत मी अपत्य-सुखापासून वंचित आहे. येथे ही उपाय केला आणि इंग्लंडमध्ये सुद्धा उपाय केला, पण नशिबाने  माझी निराशाच केली.”*


*आपण म्हणाला होता, "हे बंधू, ईश्वरावर नाराज होऊ नये. लक्षात ठेवा, त्याच्या जवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, धन-दौलत, सुख-दुःख, जीवन-मृत्यू, सगळं काही त्याच्या हातात आहे. जे काही घडायचे असते ते परमेश्वराच्या आदेशानुसार होत असते. अपत्य द्यायचे असेल तर ते तोच देईल.*


*मला आठवते, तुम्ही बोलता बोलता पुड्याही बनवत होतात. सर्व औषधे आपण दोन भागात विभागून दोन वेगवेगळ्या पाकिटात भरून ठेवली आणि मला विचारुन एका पाकिटावर माझे नाव लिहिले आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लिहून ते औषध कसे घ्यायचे याची माहिती दिली होती.*


*मनात नसतानाही त्यावेळी मी ते औषध घेतले ,कारण मला तुम्हाला थोडेफार पैसे द्यायचे होते. परंतु औषधे घेऊन जेव्हा मी पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणालात, "ठीक आहे.” मी आग्रह केला तर म्हणालात, “आजचे खाते बंद झाले आहे." मी म्हणालो, "तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले नाही." 

त्याच वेळी तिथे एक माणूस आला आणि आपली चर्चा ऐकून मला म्हणाला की आजचे ‘खाते बंद होणे ' याचा अर्थ असा की, "आज घरच्या सामानासाठी लागणारी जितकी रक्कम वैद्यमहाराजांनी ईश्वराजवळ मागितली होती, ती ईश्वराने देऊन झाली आहे. जास्तीचे पैसे ते घेत नाहीत."*


*मला जरा आश्चर्यच वाटले आणि मनात लाजही वाटू लागली, की माझे विचार किती खालच्या दर्जाचे होते आणि हे साधे-सरळ वैद्य महाराज किती महान आहेत. मी घरी जाऊन पत्नीला औषधे दाखवली आणि सारे काही सांगितले ती म्हणाली, "वैद्यजी माणूस नसून, देवता आहेत. त्यांनी दिलेल्या  औषधनेच आपले मनोरथ पूर्ण होइल."*


*आज माझ्या घरी दोन फुले उमलली आहेत. आम्ही दोघं पती-पत्नी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असतो. इतकी वर्षे काम-धंद्यातून वेळच मिळत नव्हता की मी इथे येऊन आभाराचे दोन शब्द तुम्हाला सांगावेत. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आणि गाडी थेट तुमच्या दारात येऊन थांबली.* 


*वैद्यजी, आमचे सारे कुटुंब इंग्लंडला स्थायिक झाले. भारतात फक्त माझी एक विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहाते. माझ्या भाचीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला आहे. कुणास ठाऊक जेव्हा-जेव्हा मी तिच्या आहेराचे सामान खरेदी करीत असे, तेव्हा-तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुमची लहान मुलगी येत असे आणि मग मी प्रत्येक वस्तू दोन-दोन खरेदी करीत असे. मी तुमचे विचार जाणून आहे, त्यामुळे तुम्ही हे सामान कदाचित घेणार नाही. पण मला वाटत होते, की माझ्या सख्या भाचीकडे पाहिल्यावर मला जो चेहरा  सारखा दिसत असे, तीसुद्धा माझी भाचीच आहे. मला वाटत असे की तिच्या आहेराची जबाबदारी सुद्धा देवाने माझ्यावर सोपवली आहे.*


*वैद्यजी आश्चर्याने अवाक झाले. ते हळुवार आवाजात म्हणाले, “कृष्णलालजी, परमेश्वराची अगाध लिला माझ्या लक्षात येत नाहीए! तुम्ही माझ्या पत्नीची ही आजची यादी पहा."*


*आणि वैद्य महाराजांनी यादी उघडून कृष्णलालजींच्या हाती दिली. तिथे हजर असलेला प्रत्येक जण हे पाहून हैराण होत होता की ‘आहेराचे सामान’ च्या पुढे वैद्यजींनी लिहिले होते, *‘हे काम परमेश्वराचे आहे, परमेश्वर जाणे.*’


*वैद्यजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, "कृष्णलालजी, विश्वास ठेवा की आजपर्यंत असे कधीच घडले नाही की माझ्या पत्नीने यादीत त्या दिवशीची गरज लिहिली आणि त्याची परमेश्वराने त्या दिवशी व्यवस्था केली नाही. तुमचे म्हणणे ऐकून तर मला असे वाटते की माझी पत्नी कोणत्या दिवशी काय लिहिणार आहे, हे परमेश्वराला माहित असते. नाहीतर त्याने तुम्हाला एवढ्या दिवस आधीच सामानाची खरेदी करायला लावले नसते. वा! परमेश्वरा वा! तू महान आहेस, तू दयाळू आहेस. मी अगदी अवाक आहे की कशाप्रकारे  तो त्याचे चमत्कार दाखवीत असतो."*


*वैद्य महाराज पुढे बोलू लागले, "आजपर्यंत त्याने नेहमीच माझी काळजी घेतली आहे. मी एव्हढेच शिकलो आहे की , *रोज सकाळी प्रथम परमेश्वराचे  आभार माना, सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना, जेवताना त्याचे आभार माना,  झोपताना त्याचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा.”*


_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



Thursday, May 15, 2025

नामाची जादू

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*जसजसे नाम वाढत जाईल तसतसे तुमचा सत्वगुणाचा साठा वाढत जाऊन तुम्हाला एका नामाशिवाय काही करावेसे वाटणारच नाही. नाम हेच तुमचे मुख्य धेय्य होऊन जाईल व तुम्ही त्यातच डुंबून जाल. मात्र हे मी महाराजांच्या कृपेने करतोय हे सतत आपल्या मनाला बजावत रहा. म्हणजे अहंकार येणार नाही. महाराज म्हणतात की नाम करत असाल ना तर काही करायची गरज नाही. तुम्ही कुठेही समाजात मिसळायची गरज नाही. लोकच तुम्हाला शोधत येतील. पुढे जाऊन महाराज म्हणतात हे तर काहीच नाही स्वतः संत तुम्हाला येऊन सदिच्छा देऊन जातील.ही नामाची जादू आहे. खूप सोपं साधन आहे. पण आपण आपल्याला प्रपंचात गुंतवून घेतल्यामुळे ते अवघड होऊन जातं. महाराजांना सतत आळवत रहावं की महाराज काही तरी द्या मला. कीती दिवस प्रपंच ओढायाचा ? तुम्ही मनापासून आळवलं की ते देतात.....नामच देव, नामच* *पारसमणी, नामच विधाता....*


*गोंदवले म्हणजे नामाचा महासागर*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*

Wednesday, May 14, 2025

शबरी

 *प्रभु येणार....*

*शबरीकडून आपण काय बरे शिकू शकतो?*



रामायणातील *शबरीची* व्यक्तिरेखा म्हणजे अमर्याद आणि विनम्र भक्तीचे मूर्त रूपच. 


*शबरी* ही भिल्ल समाजातील एक सामान्य स्त्री. धर्माच्या प्राप्तीसाठी ती अरण्यात गेली, जिथे मातंग ऋषींनी तिचा शिष्या म्हणून स्वीकार केला. ऋषींनी तिला मंत्र दिला. प्रभू श्रीरामांचे दर्शन होईल म्हणून आशीर्वादही दिला. मातंग ऋषींचे शबरी व्यतिरिक्त अन्य शिष्यही होते. परंतु शिष्य म्हणून आपल्याला शबरीचेच नाव माहित आहे! तिच्या गुणवैशिष्ट्यांनी ती इतर सर्वांहून श्रेष्ठ ठरली.


*शबरीकडे* होती अमर्याद चिकाटी आणि गुरूंच्या शब्दांवर अढळ श्रद्धा. शबरीची चिकाटी इतकी अमर्याद होती की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केलेल्या अखंड प्रतीक्षेला शबरीचे रूपक म्हणून वापरले जाते. 


*शबरीचे आयुष्य पाहा,* 

दिवसांमागून दिवस आणि वर्षामागून वर्षे अशी तब्बल ४० वर्षे तिने प्रभू रामचंद्रांची चिकाटीने प्रतीक्षा केली. हे खरोखरच विस्मयजनक आहे. प्रत्येक दिवशी शबरी श्रीरामांचा येण्याचा मार्ग स्वच्छ करून फुलांनी सुशोभित करीत असे. श्रीरामांसाठी मधुर बोरे गोळा करून दिवसभर त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असे. हे तिने जवळजवळ ४० वर्षे केले आणि प्रत्येक दिवशी तेवढ्याच उत्साहाने !


'सहसा जेव्हा आपण आध्यात्मिक साधनेची सुरुवात करतो,तेव्हा काही महिन्यानंतरच किंवा फार फार तर काही वर्षांनंतर आपली सहनशीलता संपते. साधना करूनही अजून काही प्रचिती येत नाही अशी तक्रार आपण गुरूंकडे करतो. क्वचित प्रसंगी किंवा बहुतांशी आपण साधना करणेच सोडून देतो अथवा आपल्या साधनेतील उत्साह संपुष्टात येतो. ज्या जोमाने आपण साधनेला सुरुवात केलेली असते तो काही काळातच ओसरतो. याचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीची कमतरता आणि गुरुंवरील श्रद्धेचा अभाव.'



शबरीची गुरुवरील श्रद्धा आयुष्यभर अविचल राहिली आणि त्याचबरोबर तिची अमर्याद चिकाटी सुद्धा! त्यामुळेच ती तिचे ध्येय अर्थात प्रभू दर्शन प्राप्त करून घेऊ शकली. अखेरीस ४०वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम लक्ष्मणासोबत तिच्याझोपडीत आले. तिची मनोकामना पूर्ण झाली. तिच्या गुरूंच्या शब्दांची पूर्तता झाली. तिची साधना सफल झाली!


*आपण तिच्याकडून काय बरे शिकू शकतो?*


ध्येयप्राप्तीसाठी आपल्याकडे सहनशीलता आणि चिकाटी हे गुण असणे आवश्यक आहे. निराश न होता हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती आपण या गुणांमुळे करू शकतो. म्हणूनच जेव्हा आपले गुरु अथवा शिक्षक काही कामगिरी आपल्यावर सोपवितात, तेव्हा ती आपल्या आवडीची असो अथवा नसो, त्याचा परिणाम आपल्याला लगेच मिळो अथवा न मिळो, आपण ते कार्य पूर्ण श्रद्धेने व चिकाटीने करणे आवश्यक आहे.

भविष्यात आपल्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.

संसार

 *संसार भगवंताच्या आड येत नाही.*  (संकलन आनंद पाटील)


*कारण कां म्हणाल तर, संसार हा जीवनाच्या बाह्यांगाचाच विषय आहे; पण भगवंत आणि त्याचे नाम जीवनाच्या अंतरंगाचा विषय आहे. हा संसार माणसाला त्रास देत नाही. तो जड आहे. तर* *माणसाच्या मनात पोसलेली, घट्ट रुतूनशी बसलेली संसारासक्ती आड येते. देह, पुत्र, कलत्र, धन, गृह, लौकिक इत्यादि " अहं - मम"* *ज्ञानाचे विषय ज्यात असतात, त्याला स्थूल संसार म्हणतात.*

*"असोनि संसारी" याचा अर्थ असा नव्हे की, नाम घेण्याकरता संसारातच असावे* *लागते. याचे तात्पर्य इतकेच की, ज्यांना पूर्व* *संस्कारामुळे संसारासक्ती सुटत नाही, अशा संसारासक्तांना पण हरिनाम* *घेता येते. नाम घेता-घेता नामाची गोडी लागते, आणि संसारासक्ती हळू-हळू कमी* *होते. कारण नामस्मरणाने* *संसाराचे लटकेपण कळून येते; पटते. त्यामुळे त्याची गोडी कमी होते व ज्याचे नाम, त्या* *भगवंताची गोडी* *वाढतच जाते. आपले* *श्रीतुकोबाराय काय म्हणतात ते पहा, " तुका म्हणे नाही*


निरसला देह। तोवरी हे अवघे सांसारिक ॥" 

*ज्यांच्या देहाचा नाही तर देहबुद्धीचा निरास झाला नाही ते संसारीच. त्यामुळे त्यांनी पण नाम घ्यावयासच पाहिजे. वेदांनी व सर्व शास्त्रांनी बाहू उंचावून नामस्मरणाचा गौरवच केला आहे. मनुष्यमात्राला त्याचा अधिकार सांगितला आहे.*

" *सकळांसी येथे आहे अधिकार." नामस्मरणाच्या आड कोणताही वर्णाश्रमधर्म येतच नाही. याच्या उलट नामस्मरणावाचून* *वर्णाश्रमधर्म केवळ व्यर्थ आहेत; कारण कोणतेही वर्णाश्रमधर्माला अनुसरून असणारे कर्म सांग -सफल होण्यासाठी नामाचीच गरज आहे. “*

   *एकंदरीत काय तर* *नामस्मरणासाठी मनुष्यमात्राला शास्त्रमान्यता आहे, सामर्थ्यही आहे, ज्ञानही आहे, पण इच्छा ( नाम घेण्याची ) मात्र प्रबळ पाहिजे. इच्छाच नसेल तर बाकी नामस्मरण होणार नाही.* *दिवसातून एकदाच नामस्मरण केलं ( टाकणं टाकल्यासारखं ) व बाकी सर्व काल संसारातच*

*व्यतीत केला तर मात्र ते नाम उद्धारास पर्याप्त म्हणजे पुरेसे नाही.* "हरिचे चिंतन सर्वकाळ ।" किंवा गोविंदाचे पवाडे ||" नामस्मरण सतत व " दिन - रजनी हाचि धंदा |

*शीघ्र वेगाने ( म्हणजे दोन उच्चारात- स्मरणात अंतर नको) करावयास हवे. अशाने काय होईल?*

*"अशा अविश्रांत, अखंड नामस्मरणाने, चित्तात अन्य विषय, विकार, विकल्प शिरण्यास वावच मिळणार नाही. जसा ट्रॅफिक जाम झाल्यावर, रस्त्याच्या पलीकडे जाण्यास अवसरच / संधी मिळत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले,*

"जिव्हे वेगू करी । ” "भागवतकार म्हणतात, "हे जिव्हे रससारज्ञे, सर्वदा, मधुराप्रिये। नारायणास्य पीयूषं, पिब जिव्हे निरंतरम् ||" 

*एवढी एक जीव्हा वश झाली,तर मग बाकीच्या इंद्रियांचा काय पाड ? आपल्या जनाबाई म्हणतात,*

 "दळिता कांडिता । तुज गाईन अनंता । न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥ नित्य हाचि कारभार । मुखी नाम निरंतर ।। "

Tuesday, May 13, 2025

समाधानी

 श्रीराम समर्थ


         माणसाने आयुष्यांत काहीही पराक्रम केलेले असोत, अखेर भगवंताच्या स्मरणाशिवाय इतर काही उपयोगी पडत नाही हे आपण शिकावे. या देहाच्यापायी माणूस अगदी लाचार दीन होतो. बरे, कोणाची मदत न घेता जगावे म्हटले तर ते शक्य होत नाही. अशा अडचणींमध्ये भगवंताच्या नामांत राहणाराच मनाने समाधानी राहू शकेल. देहाला लागणाऱ्या सोप्या सोयी करुन घ्याव्या पण त्याच्यामुळे मी सुखी आहे असे वाटतां कामा नये. आपले तिथें घोडे पेंड खातें.


         *प्रकृति अस्वास्थाच्या या सगळ्या खटापटीमधे नामाचा अभ्यास ढिला पडता कामा नये. खरे म्हणजे त्याचा नाद लागवा, येता जाता, जरा वेळ मोकळा मिळाला की नाम घेत बसावें. असो, नामाविषयी सांगावे तेवढें थोडेच वाटते.*


               --------- *प्रा के वि बेलसरे* 


               ********* 

संदर्भः *पत्राद्वारे सत्संग* पान ७१-७२ 

संकलन श्रीप्रसाद वामन महाजन

Monday, May 12, 2025

वाणी

 श्रीराम समर्थ


*संतांची वाणी


          आपलें समाधान सर्वांच्या वाट्यांस यावें म्हणून संत लोकांत मिसळतो. *त्याच्या वागण्याची अशी खुबी असते की बाहेरून तो साध्या माणसासारखा दिसतो व वागतो. पण आंतून मात्र तो अहंकारविमुक्त असा आत्मनिष्ठ विश्वमानव असतो.* सर्व घडामोडीमधें तो ईश्वराची सत्ता पाहातो. सर्व प्राणिमात्रांना तो ईश्वराचें व्यक्त रूप मानतो. म्हणून विश्वाच्या व्यवहारामधें त्याला पदोपदी अनंताचे अनंतांगी दर्शन घडते. हें दर्शन वस्तुतः वाणीच्या पलीकडे असणारा अतींद्रिय अनुभव आहे. पण तो अनुभव अतिशय रसरशीत असल्यानेच वाणीमधें  व्यक्त झाल्यावांचून राहात नाही. वाणीमधें आकार घेतांना बहुतेक तो काव्याचें रूप घेतो. *संत वक्तपणानें आपला अनुभव निवेदन करीत नाही कारण त्याला कर्तेपणाचा स्पर्श होत नाही.* संतांचा अनुभव म्हणजे तें चिन्मयाचें स्फुरण असतें. *म्हणून संताच्या एकेक वचनामधें वेदान्ताचें मर्म सांपडतें.*. अक्षर अशा अनंत ईश्वरानें भरलेली संतांची वाणी कधी शिळी होत नाही. ती सदैव ताजी व सतेज राहते. याच कारणामुळें ती प्रतेक युगांतील माणसांना समाधान तर देतेच पण ज्याला ईश्ववराची जिज्ञासा आहे त्याला अगदी अचूक मार्गदर्शन करते.

               ---------- *प्रा के वि बेलसरे*


               **********

संदर्भ: *संतांचें आत्मचरित्र हें त्यांचेच पुस्तक मलपृष्ठ.*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

Sunday, May 11, 2025

अनुसंधान

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*रोज श्रवण करण्याचा नियम ठेवावा. सद्गुरूच्या किंवा साधकाच्या मुखाने भगवंताबद्दल, नामाबद्दल व भक्तीबद्दल श्रवण करण्याने नकळत श्रद्धा वृद्धिंगत होते. सद्गुरूच्या मानसिक सहवासाने भगवंताचे दर्शन हे जीवनध्येय निश्चित होते. साधनाचे कष्ट कोठेपर्यंत वाटतात? भगवंत हवाच अशी तळमळ लागेपर्यंत.

 म्हणून तळमळ लागण्यासाठी रोज मनापासून प्रार्थना करावी. अनुसंधानाची चटक लागली की भगवंत मागेमागे चालतो. परंतु, मला भगवंत हवा ही तळमळ एकाच पातळीवर टिकत नाही. आतमधील व बाहेरील अशुभ शक्ती साधकाला खाली ओढतात. पण तेथे त्याचा विचार करणे उपयोगी पडत नाही. 

आपले विचार अज्ञानामधून उगवतात. त्यांच्यापासून आपली सुटका करून घ्यावी. खरे म्हणजे आपले अंतरंग निस्तरंग व्हायला पाहिजे.* *सारे पूर्वग्रह नाहीसे होऊन निर्विकल्प व निर्विचार झालेले मन अनुसंधानास पात्र असते. अनुसंधानाला आकार नाही, विकार नाही व पर्याय नाही.* *म्हणून नामामध्ये चित्त रंगू लागले की अनुसंधानास निराळा प्रयत्न करावा लागत नाही.*

  *प. पू. बाबा बेलसरे*

Saturday, May 10, 2025

श्रद्धा

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : श्रीमहाराजांच्या येथे नियमित येणाऱ्या भक्ताला श्रीमहाराज म्हणाले की सर्व संसार सुस्थितीत असणे देखील चांगले नाही. ते गोड विषासारखे आहे. त्या गृहस्थांना हे सांगणे रुचले नव्हते. खरोखर सत्य व प्रिय सांगणे अवघड आहे.*


*दुसरी एक सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची हकिगत. बडोद्याचे एक गृहस्थ मुंबईला मेकॅनॉन मेकॅन्झीत नोकरीला होते. बोरीवलीस रहात. पुढे मालाडला राहायला आले. येथे ते श्रीमहाराजांकडे येत असत. पुढे ते आजारी पडले तेव्हां श्रीमहाराज त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आले. मीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. पुढे त्यांचा आजार वाढला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यावेळी मी त्यांच्याजवळ होतो. तेथून परत आल्यावर श्रीमहाराजांनी मला विचारले की अंतकाळी त्यांना रामाचे तीर्थ घातले ना? मी म्हणालो, तीर्थ कसले घालता ? त्यांचे प्राण केव्हांच गेले होते ! तेव्हां श्रीमहाराज म्हणाले, तुम्हा लोकांची श्रद्धा नाही; तीर्थ आपले काम करतेच. आत्तादेखील त्यांचा सूक्ष्म देह स्मशानात त्यांच्या स्थूल देहाभोवती घिरट्या घालतो आहे. आपण श्रद्धेत किती कमी पडतो ते ह्या प्रसंगावरून लक्षात आले.*


*-- अध्यात्म संवाद*

Friday, May 9, 2025

संवाद

 *अध्यात्म संवाद*

संकलन आनंद पाटील 

*गोंदवल्याला श्री. आण्णासाहेब घाणेकर रोज जेवणे झाली की पंधरा-वीस ताटे डोक्यावर घेऊन नदीवर धुवायला जात.* 

*श्रीमहाराजांना हे समजले तेव्हां एकदा आण्णासाहेब ताटे गोळा करीत असतांना श्रीमहाराज तेथे गेले आणि म्हणाले,*

*"असू दे, आण्णासाहेब, बाकीची माणसं करतील. श्रीमहाराजांनी सांगितले म्हणून त्यावेळी* *आण्णासाहेब थांबले आणि नंतर त्यांनी ताटे धुवून आणण्याचा क्रम तसाच चालू ठेवला. पुढे श्री. 

आण्णासाहेबांना अर्धांग झाले तेव्हां श्रीमहाराज मला बरोबर घेऊन बेळगावला त्यांना भेटायला गेले. आण्णासाहेबांचे शरीर लाकडासारखे झाले होते. गेल्याबरोबर श्रीमहाराज त्यांना भेटले. महाराज आले*

*आहेत म्हणून त्यांना सांगितले* *तेव्हां प्रथम त्यांना समजले नाही. पण समजल्यावर ते मोठ्याने रडू* *लागले. श्रीमहाराज म्हणाले, त्यांचा भावनेचा भर ओसरल्यावर आपण* *त्यांना भेटू.* *नंतर (पेटीवर) भेटल्यावर श्रीमहाराजांनी त्यांना विचारले,*

*'आण्णासाहेब, नाम चालू आहे ना ?' तेव्हां हृदयाकडे हात दाखवून ते म्हणाले, 'ऍथे चालू आहे.' कंटाळा वाटत नाही ना म्हणून विचारल्यावर नाही* *म्हणाले. फक्त माझ्यामुळे ह्या लोकांना कष्ट होतात याचे वाईट*

 *वाटते असे म्हणाले. तेव्हां श्रीमहाराज म्हणाले,* *'आण्णासाहेब, त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली.' पुढे म्हणाले, 'माझी माणसे कशी आहेत ते दाखवायला ह्या मुलाला आणले आहे. ' आणि मला म्हणाले, 'माझ्या गळसरीतला एकेक मणी गळून पडत आहे.' (पहा : अध्यात्मसंवाद भाग १ संवाद. १०४ )*

संकलन आनंद पाटील

Thursday, May 8, 2025

द्वार

 *माझा महाटा बोलु अमृतालाही कौतुके पैजा जिंकणारा, असं*

*मातृभाषेविषयी प्रगाढ प्रेम* *असणाऱ्या ज्ञानराजांनी दार हा मराठी शब्द न वापरता " द्वार” हा संस्कृत शब्द वापरला. या द्वारात उभे राहिले असताना चारी मुक्ती लाभतात. मुक्तींच्या संदर्भात द्वार या शब्दाला विशेष अर्थ आहे.*

*श्रीमद्भागवतात म्हटले आहे, "महत् सेवां द्वारं आहः विमुक्ते ।" संतांची सेवा हे मोक्षाचे द्वार आहे. श्रीगुरुसेवा हे मोक्षाचे दार आहे. ज्ञानेश्वरीतही ज्ञानराज म्हणतात, “जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।" आणि सेवा,* *श्रीगुरुंची / संतांची म्हणजे काय ? तर ज्ञानेश्वरमहाराजांनी स्पष्ट सांगितले आहे, “स्वामीचिया मनोभावा । न चुकीचे हेचि परमसेवा । "*

*श्रीगुरु / संतांचा मनोभाव काय असतो ? तर “आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥ "* *किंवा सेवा शब्दाचा अर्थ श्रीतुकोबांनी सांगितला,*

*"सगळ्या सेवेबरोबर " आवडी उच्चारावे नाम" या सगळ्याचा* *अर्थ असा झाला.” नामस्मरण हेच देवाचे दार आहे.*

Wednesday, May 7, 2025

उद्दिष्ट

 श्रीराम समर्थ


*पू बाबां बेलसरे यांनी साधकांना केलेली महत्वाची सुचना*



          आपण परमार्थाकडे वळलो की आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी तिकडे वळावे असे आपणांस वाटू लागते. *आपला हेतू चांगला असतो पण आपले उद्दिष्ट विसरून आपण ह्या नसत्या व्यापात गुरफटून जाण्याची भीती असते. आपल्याला विशेष काही साधलेले नसते पण लोकांना सागण्याची उबळ येते. ह्या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे.* माझेच सांगतो, १९३५-३६ चा सुमार असावा. श्रीमहाराजांकडे नियमित येऊ लागलो होतो. एक दिवस के. इ. एम. हाॕस्पिटलमधल्या माझ्या जुन्या वर्गमित्राला - डाॅ फडके यांना - श्रीमहाराजांकडे घेऊन आलो. श्रीमहाराजांना ते आवडले नाही. फडके गेल्यावर महाराज मला म्हणाले, *कोणत्या सत्पुरुषाकडे कोण जाणार, तो तिकडे टिकणार की नाही हे ठरलेले असते. आपण त्या भानगडीत पडू नये. म्हणून मग मी यांनाही [सौ. आईंना] सांगितले होते की मला हे महाराज आवडले आहेत पण तुमचे तुम्ही स्वतंत्रपणे ठरवा.*


               ********** 

संदर्भः *अध्यात्म संवाद [भाग-३] पान १८०-१८१* 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Tuesday, May 6, 2025

देवाचे दार

 *माझा महाटा बोलु अमृतालाही कौतुके पैजा जिंकणारा, असं*

*मातृभाषेविषयी प्रगाढ प्रेम* *असणाऱ्या ज्ञानराजांनी दार हा मराठी शब्द न वापरता " द्वार” हा संस्कृत शब्द वापरला. या द्वारात उभे राहिले असताना चारी मुक्ती लाभतात. मुक्तींच्या संदर्भात द्वार या शब्दाला विशेष अर्थ आहे.*

*श्रीमद्भागवतात म्हटले आहे, "महत् सेवां द्वारं आहः विमुक्ते ।" संतांची सेवा हे मोक्षाचे द्वार आहे. श्रीगुरुसेवा हे मोक्षाचे दार आहे. ज्ञानेश्वरीतही ज्ञानराज म्हणतात, “जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।" आणि सेवा,* *श्रीगुरुंची / संतांची म्हणजे काय ? तर ज्ञानेश्वरमहाराजांनी स्पष्ट सांगितले आहे, “स्वामीचिया मनोभावा । न चुकीचे हेचि परमसेवा । "*

*श्रीगुरु / संतांचा मनोभाव काय असतो ? तर “आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥ "* *किंवा सेवा शब्दाचा अर्थ श्रीतुकोबांनी सांगितला,*

*"सगळ्या सेवेबरोबर " आवडी उच्चारावे नाम" या सगळ्याचा* *अर्थ असा झाला.” नामस्मरण हेच *माझा महाटा बोलु अमृतालाही कौतुके पैजा जिंकणारा, असं*

*मातृभाषेविषयी प्रगाढ प्रेम* *असणाऱ्या ज्ञानराजांनी दार हा मराठी शब्द न वापरता " द्वार” हा संस्कृत शब्द वापरला. या द्वारात उभे राहिले असताना चारी मुक्ती लाभतात. मुक्तींच्या संदर्भात द्वार या शब्दाला विशेष अर्थ आहे.*

*श्रीमद्भागवतात म्हटले आहे, "महत् सेवां द्वारं आहः विमुक्ते ।" संतांची सेवा हे मोक्षाचे द्वार आहे. श्रीगुरुसेवा हे मोक्षाचे दार आहे. ज्ञानेश्वरीतही ज्ञानराज म्हणतात, “जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।" आणि सेवा,* *श्रीगुरुंची / संतांची म्हणजे काय ? तर ज्ञानेश्वरमहाराजांनी स्पष्ट सांगितले आहे, “स्वामीचिया मनोभावा । न चुकीचे हेचि परमसेवा । "*

*श्रीगुरु / संतांचा मनोभाव काय असतो ? तर “आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥ "* *किंवा सेवा शब्दाचा अर्थ श्रीतुकोबांनी सांगितला,*

*"सगळ्या सेवेबरोबर " आवडी उच्चारावे नाम" या सगळ्याचा* *अर्थ असा झाला.” नामस्मरण हेच देवाचे दार आहे.* दार आहे.*

Monday, May 5, 2025

अनन्य निष्ठा

 प.पु.श्रीगोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परंपरेतील एक शिष्य प.पु.श्रीप्रल्हाद महाराज यांची एक आठवण. संत एकनाथ महाराजांप्रमाणे श्रीप्रल्हाद महाराजांच्या ठिकाणीही अपार शांतता होती. 

त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शिष्यानाही सर्व परिस्थितीत शांत राहण्यास शिकविले. श्रीप्रल्हाद महाराजांचे अकोल्याचे श्री दिनकरराव देव नावाचे शिष्य होते. कोर्टात त्यांचा खटला चालू होता. 

दुर्दैवाने कोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध बाजूने लागला त्यामुळे त्यांची संपूर्ण शंभर एकर जमीन त्यात गेली. जवळ काहीच राहिले नाही. प्रपंचिकला फार मोठा धक्का होता. त्यांना आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. खूप नैराश्य आले." सद्गुरुवाचोनी सापडेना सोय" असे वाटून ते साखरखेरड्याला पु.श्रीप्रल्हाद महाराजांच्या मठात आले. त्यांनी सर्व वरील हकीगत महाराजांना सांगितली.

 तेव्हा महाराज त्यांना म्हणाले "रामरायाची इच्छा.  गेले त्याची काळजी करू नये. रामरायचा आठव ठेवावा. तोच यातून मार्ग काढील. रामरायाच्या नैवेद्यासाठी पेढे घेऊन या." म्हणून अशा परिस्थितीत गुरू आज्ञा मानुन एक पाव पेढे आणून ते वाटले. त्यानंतर देवांचे एक मारवाडी मित्र होते. त्यांची जमीन खूप चांगली होती व भरपूर होती. ते देवांना म्हणाले " माझी तुम्ही पाच एकर जमिन करा. तुम्हालाच ठेवा. 

देवांना संकोच वाटला तेव्हा मारवाडी मित्रा म्हणाला तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा पैसे द्या." त्या जमिनीची किंमत त्यावेळी पंधरा सोळा हजार रुपये होती. देवांना ता जमिनीत इतके पीक मिळाले की प्रपंचाच खर्च भागून पंधरा सोळा हजार वर मिळाले . 

ते त्यांनी एक वर्षातच त्या मारवाडी मित्राला दिले. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्या शेताला जोडून असलेली त्याच मारवाडी मित्राची वीस एकर जमीन विकत घेतली. त्या उत्पन्नातून मुलीचे लग्न मुलांची शिक्षणं सर्व केले. ते म्हणायचे " माझा प्रपंच महाराजांनीच केला." "सद्गुरूंवर अनन्य निष्ठा असेल तर सद्गुरू मदत केल्या शिवाय राहत नाहीत."

Sunday, May 4, 2025

प्रेमगीत

 *पृथ्वीचे प्रेमगीत...*


*- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष*


लहानपणात वाचलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या कांही गोष्टी आपल्या मनात कायमचे घर करून असतात. आपल्या भावना हेलावून सोडतात. जेंव्हा जेव्हां त्या गोष्टी मनात आठवतांत, तेंव्हा त्यावेळचे प्रसंग चक्क डोळ्यासमोर उभे राहतात. 

शाळेत असताना अभ्यासाच्या क्रमिक पुस्तकात अशीच एक कविता माझ्या वाचनात आली, अन मी त्या काव्यांत पूर्ण गुरफ़टूनगेलों. ती कविता होती " पृथ्वीचे प्रेमगीत " आणि तिचे कवि होते महाराष्ट्राला भूषणावह असलेले वि. वा. शिरवाडकर अर्थात आपले सर्वांचे लाडके ' कुसुमाग्रज. 


वास्तविक कुसुमाग्रजांचे काव्य हे कधी क्रांतीच्या ज्वाला प्रज्वलीत करणार असतं,  कधी ' पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण ' असे धीराचे प्रोत्साहन देणार असतं, तर कधी प्रेमाचे तरल असे मुलायम तरंग हळुवारपणे उलगडणारे प्रेमकाव्य असतं. 

महान प्रतिभेच्या या महाकवीला जेंव्हा काव्य सुचत असेल तेव्हां त्याला आपल्या दैवी काव्य लेण्याचे पंख लावून अवकाशात विहार करायला लावणारा एक सर्जनशील कवी.

 त्यांच्या हृदयातून निघालेले शब्द मनाच्या कोंदणात नटवून त्यांना मखमली वस्त्रे चढवून जेव्हां लेखणीतून उतरतात तेंव्हा ते शब्द केवळ आपल्या हृदयांत जपून सांभाळावेत  अशीच भावना होते. आणि हेच नेमके त्यांनी त्यांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या अमर काव्यात गुंफलेले आहेत. अर्थात त्या काळचे आमचे शिक्षक तसेच विद्वान असायचे. भाषेवर त्यांचे प्रभुत्व असायचे. 

एखादा विषय शिकवायचा म्हणजे त्या संदर्भात अनेक उदाहरणे देत असत. कवितेचे जेव्हां ते रसग्रहण करीत तेव्हां आम्हाला चक्क त्या वातावरणात मिसळून टाकत असत. त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या एकेक शब्दाला आम्ही साठवून ठेवत असू . आणि ह्या कवितेचे रसग्रहण असले की  मग बघायलाच नको. आणि मला तर मोहवूनच टाकलं होतं या अवीट काव्यानं.

                   

" युगामागुनी चालली रे युगे ही, 

 करावी किती भास्करा वंचना,

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी,

कितींदा करू प्रीतीची याचना...”


पृथ्वी स्वतः भोवती फिरताना सूर्याभोवती फिरत असते, हे एक भौगोलिक सत्य. तिच्या समवेत अनेक ग्रह तारे या अवकाशात आहेत. त्यांचाच आधार घेऊन कवीची प्रतिभा बहरुन येते, आणि तिच्या त्या सूर्याभोवतीच्या भ्रमंतीला मिळाले  एक प्रेममय असे शाश्वत रूपक. आणि निर्माण झाले एक अमर काव्य. 

सूर्यदेव आपले दिव्य तेज पसरवीत चाललेले असता, तिच्यावर मूक प्रेम करणारी पृथ्वी अथकपणे त्याच्या मागोमाग चालत असते, केवळ त्याने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा या हेतूने. युगायुगांचा चाललेला हा खडतर प्रवास असतो. त्यातही तिला जाणीव होत असते की सूर्यदेव आपली वंचना करीत आहे  याची. ती प्रश्न विचारते अजून किती काळ मला तू तुझ्या मागे  भटकवणार आहेस? 


आज माझ्या मनातील तारुण्याची आग ही विझून चालली आहे. केवळ तेथे उरले आहे काजळी कोपरे. आजूबाजूला असलेले अनेक तारे, ग्रह तिच्या प्रेमाची याचना करीत आहेत. कोणी आपल्या शिरावर दिव्य उल्काफुले नटवून, तूच अंतःराळात सांडलेले दीव्य तेज:कण वेचून  मला मोहवायला बघणारा चंद्र, 

कधी लाजून लाल होऊन मागणी घालणारा मंगळ तर कधी पिसाटापरी केस पिंजारून आर्जव करणारा धूमकेतू. आता सूर्यदेवा, तूच मला सांग, तुझे भव्य दीव्य तेज मी सतत पाहीले, पुजले असता या काजव्यांना मी कशी गळ्याशी घेऊ? ध्रुव तर  निराशेने संन्यस्त होऊन बसला आहे. कधी प्रेमळ शुक्र पहाटेच दारी येऊन उभा राहतो. पण या दुर्बळांचा क्षूद्र शृंगार मला नकोसा वाटतो. त्यापेक्षा तुझी दूरताही सोसण्यास मी तयार आहे. 

               

आपण या ओळी वाचताना आपले अंग थरारून उठते. पृथीच्या पोटात असलेल्या ज्वालामुखीला तिच्या मनातील उफाळून येणाऱ्या निखार्यांची  उपमा जेव्हा कवी देतो, तेव्हां तिच्या सोबत आपणही शहारून उठतो. तिला सूर्याची थोरवी माहित असते, किंबहुना तिला हीहि जाणीव असते की त्याच्यापुढे आपण एक क्षुल्लक धुळीचा कण आहे, तरीही त्याच्या पद्स्पर्शाला अलंकारुन त्या धुळीचेच तिला भूषण आहे.

 कवी जेव्हा त्यापृथ्वीची मिलनोत्सुक अवस्था वर्णनं करतात तेव्हां त्यांनी आपल्या कल्पना शक्तीची परिसीमा गाठलेली असते. जेव्हां पृथ्वी सूर्याला आपल्या  प्रेमाच्या विरहाचे वर्णन करते , तेव्हा कवीच्या दैवी प्रतिभेला एक अलंकारीक लेणं लाभतं, आणि पृथ्वी सूर्याला सांगते,

                 

" गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे ,

मिळोनी गळा घालुनियां गळा,

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी,

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा ...."


हे वाचल्यावर कालिदासाच्या मेघदूताची आठवण कां नाही होणार ? आपल्या या प्रेमप्रवासात पृथ्वी आपल्या असफल प्रेमाची एकेक समिधा सूर्यदेवाच्या यज्ञकुंडात समर्पीत करीत आहे याची जाणीव प्रकर्षाने होते. जणू त्या तप्त प्रियकराच्या मिठीत शिरून त्या मध्ये स्वतः विरघळून जावे, त्यामध्ये सामावून जावं ही एकच पवीत्र भावना तिने बाळगली होती.

एक काव्य ! पृथ्वी अन सूर्याची भ्रमंती अशीच चालू रहाणार आहे. अंतापर्यंत हा वीरह प्रवास चालू रहाणार आहे. यामध्ये खंड न पडता. 

                        

यामध्ये कौतूक कोणाचे करू ? ज्या निसर्गाने अवकाशात हा अनोखा खेळ मांडला होता त्याचा, की आपल्या शब्द श्रीमंतीने त्याच गोष्टींवर अनोखा साज चढवून त्याला प्रेमाचा  साजशृंगार देणाऱ्या कविवर्याचा !


*- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष*

Saturday, May 3, 2025

हक्क

 मैत्री या संदर्भात पु.श्री.गुरुदेव रानडे व श्री.काकासाहेब तुळपुळे (गुरुदेवांचे गुरुबंधू) यांची एक आठवण . १९१२ - १३ साली  दोघेही डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात राहात होते.

 त्यावेळी एका प्रसंगाने एका मित्रा बद्धल बोलताना श्री गुरुदेव म्हणाले " माझा एक स्नेही नुकताच एम.ए. झाला आहे आणि त्याला एकदम मोठ्या ऑफिसरची जागा मिळाली आहे. 

तेव्हा पासून त्याचा अभिमान वाढला आहे. देव आणि परमार्थ याची तो उपेक्षा करू लागला आहे. त्यामुळे त्याच्या बद्धल मला प्रेम वाटत नाही. 

पुढे म्हणाले ग्रीक तत्वज्ञानाने तीन प्रकारची मैत्री सांगितली आहे. 

१) स्वतःच्या लाभासाठी

२) परस्परांच्या संगतीत राहून सुख मिळविण्यासाठी 

3)तत्त्वासाठी. 

यातील तत्वासाठी केलेली मैत्री ही खरी मैत्री होय.

 त्यामुळे परमार्थ हे ज्याचे ध्येय आहे त्यांनी त्याकरिता उपयुक्त व उपकारक मित्र असे संबंध जोडावेत.ह्यावर श्री.काकासाहेब म्हणाले आपण म्हणता ते  खरे आहे. काका पुढे म्हणाले तुमचा मित्र नास्तिक जरी असला तरी भलेपणा दाखविला पाहिजे व पूर्वीच्या मैत्रीमुळे त्यांचा तुमच्या भलेपणावर हक्क आहे. 

यावर श्रीगुरुदेव म्हणाले माझ्या मित्राचा माझ्या भलेपणावर हक्क आहे आणि तसा सर्व जगाचा  पण आहे. हे ऐकून काकांना फार आश्चर्य वाटले कारण वयाच्या पंचविसाव्या वर्षीच जगाला भलेपणा दाखवायचा हे  गुरुदेवांना इतक्या लहान वयात स्पष्टपणे समजले होते.

Friday, May 2, 2025

परमात्मास्वरूप

 जग काय आहे तर ते परमात्मास्वरूपच आहे. त्या परमात्मस्वरूपाची तीन अंगे आहे. तो सच्चिदानंद आहे. सत, चित व आनंद. आनंद हे त्याचे खरे स्वरूप आहे.

 कारण प्रेरणा तिथूनच येते. सारखा आनंद बाकीच्या गोष्टी आनंदामध्ये आपोआप येतात. जर हे विश्व आनंदमय आहे आणि हा अनुभव सत्पुरुषांना आहे तर मग हे जग सुद्धा आनंदमय असलं पाहिजे.

 आम्हाला ते दिसत नाही. आता समजा प्रत्येक व्यक्ती हा मणी समजला आणि ते एका धाग्यात   ओवलेले  आहे आहेत. मग ते सुद्धा आनंदमय असले पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. जर असं आहे तर मग दुःख करण्याचे कारणच काय ? 

या आंनदाचे स्वरूप मी विसरतो तेव्हा दुःख आहे, हे त्याच्या इच्छेने आहे, हे मी विसरतो. आपल्या दृष्टीने सुख आणि दुःख आपण बघू तसं आहे. एक नारायण बुवा जालवणकर म्हणून दत्त भक्त होते. त्यांना लग्न करायचे नव्हते. 

आईने आग्रह केला म्हणून लग्न केले. बाळंतपणात त्यांची बायको मेली म्हणून त्यांनी गावात पेढे वाटले. कारण पाशातूनमुक्ती मिळाली. ही श्रुष्टी जर आनंदमय आहे तर आपण आपल्या मनाची धारणा जी आहे ती  बदलली की झालं. ती धारणा बदलायला तो अंतर्यामी आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. हे ती धारणा बदलणं आहे.

Thursday, May 1, 2025

मोठे भक्त

 *श्रीराम समर्थ"


*ती बाबा लिमये -  पुण्यातील श्रीमहाराजांचे एक मोठे भक्त*


[ती तात्यासाहेब केतकर यांच्या रोजनिशीतून] 


आम्ही [ तात्यासाहेब]  पुण्यात रा. रानडे यांचे वाड्यात रहात असताना रा. बाबा लिमये म्हणून एक गृहस्थ श्रींचे दर्शनास आले. मधूनमधून येत असत. श्रीमहाराजांबरोबर बराच वेळ बोलत असत. श्री बाबा लिमये हे श्री [ संत] रामभाऊ रानडे यांचे काॕलेजातील सहाध्याही होते. एम.ए,चा अभ्यास दोघेही करीत. 

पण घरगुती अडचणीमुळेच शरीरपीडेमुळे बाबा परीक्षेला बसू शकले नाही. श्री रामभाऊंचे ते गुरुबंधू होते. ते अत्यंत समाधानी होते. त्यांचे स्वतःचे डोळे बिघडलेले होते. पुढे पुढे त्यांस मुळीच दिसेनासे झाले. नोकरी नव्हतीच. काही शिकवण्या होत्या, त्याही प्रकृतीमानामुळे टिकत नव्हत्या. 

दुसरे कोणतेही उत्पन्न नाही. त्यांच्या पत्नी फार साध्वी होत्या. त्यांचेही समाधान वाखाणण्यासारखे होते.  पूर्वीच्या काळच्या त्या मॕट्रिक होत्या पण नोकरीमागे गेल्या नाहीत. श्री बाबाचें रहाण्याचे ठिकाणी वारा अगर ऊन मुळीच येत नव्हते. भर उन्हाळ्यात घरातील जमिन ओलीचिंब असे. कोणी आपलेपणाने मदत केली तर खपत नसे. कोणी काही दिले, अगर त्यास विशेष मान दिला तर म्हणत की,'असे चालले तर माझे येणे बंद होईल.'  अशा सर्व परिस्थितीत त्यांचे समाधान अलौकिक होते. श्रीभगवंताचे कृपेचेच लक्षण होय. श्रीमहाराजांचे त्यांचेवर व त्यांचे श्रींवर अत्यंत प्रेम होते. 


त्यांस श्रीमहाराजांनी दर रविवारी  सवडीप्रमाणे कोणचीतरी पोथी वाचण्यास सांगितले होते. त्यांनी पोथी वाचण्यास प्रथम सुरवात ता. २०-१०-१९३५ पासून केली. ते सुमारे एक तास सांगत असत. नंतर श्रींचे प्रवचन होई. रा. बाबा लिमये चांगला अभ्यास करुन मुद्देसुद सांगत असत. 

श्रीमहाराजांचा मुक्काम पुण्यात असेपर्यंत आमचे बि-हाडी वाचत. त्यानंतर रा अण्णासाहेब मनोहर आजारी होते म्हणून तेथे वाचण्यास श्रींनी विचारले. त्यांनी कबुल केले. असे हे वाचन बरोबर बारा वर्षे चालू होते. एक दिवसही खंड पडला नाही. मंडळी कोणी असली नसली तरी त्यांनी नेम चुकविला नाही.  

बरोबर बारा वर्षांनी श्रीमहाराज पुण्यात अण्णासाहेबांकडे गेले होते. त्या दिवशी रविवार होता. बाबा आले, त्यांनी पोथी वाचली, व श्रीमहाराजांस नमस्कार करुन म्हणाले,' आपण सुरवात केलेल्या पोथीचे वाचनास आज बारा वर्षे पुर्ण झाली. माझे आयुष्यात एवढा एकच नेम इतका वेळ कधीही न चुकता शेवटास गेला.' श्रींस फार आनंद वाटला. श्री म्हणाले,' त्याचे फळ श्रीराम देईलच.' व यापुढे पुरे करण्यास सांगितले.


                  ***** 


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*