🌹🌸🎶🔆🌅🔆🎶🌸🌹
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*स्वप्नपूर्तीच्या अपेक्षेची*
🌹🎼🌸🔆💞🔆🌸🎼🌹
*भारतीय संस्कृती नांदली ती नदीकाठी हिरव्यागार निसर्गातील रम्य खेड्यात. या निसर्गाचे मनुष्य जीवनावर सकारात्मक परिणाम व्हायचे. सभोवतालच्या वातावरणात मन प्रफुल्लीत व्हायचे. पंचेन्द्रिय सुखावायची.*
*डोळ्यांना हिरवीगार शेते.. रंगीबेरंगी फुले.. फळे दिसायची. पक्ष्यांचा किलबिलाट.. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज असे नैसर्गिक मधुर गान ऐकून कान तृप्त व्हायचे. झाडावरची कच्ची पिकली फळे थेट खात जिभेचे चोचले पुरवले जायचे. फळे.. फुलेच काय पण चिखल मातीच्या सुवासाने नाशिकेलाही आनंद व्हायचा. सभोवती वाहणाऱ्या वाऱ्याने त्वचा कधी थंड तर कधी उष्णता अनुभवायची. यामुळे मन हर्षोल्हासीत व्हायचे. हृदयी आनंद लहरी प्रकटायच्या. यामुळे अत्युत्तम आनंददायी असेच साहित्य, संगीत.. कलेचे दर्शन घडायचे. कितीही कष्ट केले तरी इथे जाणवायचेच नाही. उलट निरामय आरोग्य लाभायचे.*
*पण.. पण अचानक सगळेच बदलले. महानगरे वाढली. सारे पोटासाठी महानगरांकडे धावले. गर्दी कोंबायला गगनचुंबी इमारतींची स्पर्धा लागली. जीवघेणी गर्दी सर्वत्र झाली. प्रवासासाठी रेल्वे.. रस्ते.. उड्डाणपूल कितीही बांधले तरीही कमीच पडू लागले. मग जीव गुदमरला. वरकरणी सुखसोई वाढल्या तरीही जीवन अश्वातता निर्माण होत शांतता हरपली. महानगरात सूर्य चंद्राचे दर्शनही अवघड झाले. मुक्त अशा प्राणवायूचा श्वास घेणे अवघड झाले.*
*आमचे सगळं ऋषी.. मुनी हे खेड्यात कुटीत राहात. आज ही गावे स्वप्नवत झालीत. त्या गावची वाट तर फार फार दूर झालीय.*
*ज्या गावात हिरवीगार झाडे असतील.. मनातील मधूर संभाषण करणारा सुंदर पोपट असेल.. पक्षी झाडाच्या ढोलीत पिलाकडे धावताना दिसतील, अस्ताला जाणारे सूर्यबिंब स्पष्ट दिसेल. सूर्यकिरणांनी ते ढग रंगीबेरंगी सजलेले दिसतील, माझ्या प्रियेसह मी मनसोक्त गाणे गात हातात हात घेत मनसोक्त फिरेल असे निसर्गसंपन्न गाव जे मला स्वप्नात दिसलेय ते प्रत्यक्षात सापडेल का..*
*या गाण्यातून शांता शेळके स्वप्नातील गाव प्रत्यक्षात दाखवत आहेत.*
🌹🌸🎶🌴🏕️🌴🎶🌸🌹
*ही वाट दूर जाते,*
*स्वप्नामधील गावा*
*माझ्या मनातला का*
*तेथे असेल रावा*
*जेथे मिळे धरेला,*
*आभाळ वाकलेले*
*अस्ताचलास जेथे*
*रवीबिंब टेकलेले*
*जेथे खुळया ढगांनी,*
*रंगीन साज ल्यावा*
*स्वप्नामधील गावा,*
*स्वप्नामधून जावे*
*स्वप्नातल्या प्रियाला,*
*मनमुक्त गीत गावे*
*स्वप्नातल्या सुखाचा,*
*स्वप्नीच वेध घ्यावा*
🌺🎶🌸🎼💞🎼🌸🎶🌺
*गीत : शांता शेळके* ✍
*संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर*
*स्वर : आशा भोसले*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌻🌷🥀🎼💗🎼🥀🌷🌻
No comments:
Post a Comment