TechRepublic Blogs

Tuesday, May 14, 2024

रंगले

 *मन हो रामरंगी रंगले*

*सौ. विनयाताई देसाई*

संकलन आनंद पाटील 

*भक्ती म्हणजे निस्सिम प्रेम* *भगवंताच्या निर्गुण रूपावर आणि*

*सगुण रूपावर. आपण केलेली अशी भक्ती आपल्यावर उत्तम परिणाम करत असते. त्या* *भक्तीतून मिळणारी ताकद, उर्जा, शक्ती आपल्या आतपर्यंत पोहचते म्हणजे आपलं आत्मबल,*

 *आत्मविश्वास वाढतो. निर्गुण रूप म्हणजे अव्यक्त स्वरूपातील भगवंत आणि सगुणरूप म्हणजे त्याचं व्यक्त स्वरूप. सगुण* *रूपावर भक्ती, प्रीती जडणं मूर्ती पाहन मन प्रसन्न होणं, बरं वाटणं, आधार व आनंद वाटणं हीच ती भक्ती मधली शक्ती.*


*मुरलीधर कृष्ण, सावळा विठुराया, सात्विक भावातील राम पंचायतन,* *प्रेमवर्षाव करणारी गुरुमाऊली या सगुणरूपाची समर्पण भावाने केलेली साधना म्हणजे भक्ती.*


*भक्त हा नेहमी साधक भूमिकेत असायला हवा.* *भगवंत भेटीची तळमळ हवी.* *तो आहेच पाठी असा विश्वास हवा. आज भजन,* 

*पूजन, वाचन, नामस्मरण झाले, आजचा पाठ संपला असे नाही साधक अवस्था ही सतत* *भक्तीभावाने* *जगायला, वागायला शिकवते. आपण त्या भक्तीमय अवस्थेत जगतो हे सांगावे लागत*

 *नाही, लागू नये समर्थांची करुणाष्टके भक्त मंडळींनी अभ्यासावी. साधक अवस्थेचे दर्शन तिथे घडेल. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरशी मोहमाया... इथून ती केलेली सुरवात, ती तळमळ ,* *अगतिकता, व्याकुळता.... शेवटी म्हणतात, "तुजवीण रामा मज कंठवेना" ही खरी अंतरीची ओढ, भक्ती. 

No comments:

Post a Comment