उपरती म्हणजे विरक्ती.
विरक्ती म्हणजे कर्मावरची श्रद्धाच नाहीशी होणे. ही उपरती आहे. कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे, धडपड आहे ती शांत होणं ही उपरती. उपरती नंतर श्रद्धा. श्रद्धा म्हणजे जे सगळे चालले आहे ते बरोबरच चाललेले आहे. या नंतर समाधान.
हे जे साधन चतुष्ट शम, दम, तितीक्षा उपरती ज्याच्या जवळ आहे तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. पु.श्री.तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याच्या घराला आग लागली आहे, मी स्वस्थ बसलो आहे. आज माझ्या घराला आग लागली नाही पण ही आग माझ्यापर्यंत येणार आहे.हे भान ज्याला असत तो ज्ञानमार्गी. ज्ञानमार्गाच लक्षण काय तर मी अशाश्वत आहे. माझ्या बरोबरीचे गेले , लहान गेले , मोठे गेले, मी पण जाणार आहे ही जाणीव ज्याच्या आचरणात दिसते ,
तो सर्व व्यवहार करील , पण त्यात तो म्हणेल की हे सगळं तात्पुरतं आहे. ही जाणीव ज्याला सतत राहील तो ज्ञानमार्गी आहे. या जगाला कर्मभूमी म्हणतात.कर्म माणसाला सुटत नाही. माझं जे कर्म आहे ते भोगण्यासाठी मी या जगात आलेलो आहे. एक तुर्की सुलतान होता. त्याने 39 वर्षे राज्य केले. त्याने डायरी लिहिली आहे त्यात त्याने लिहिले की इतक्या वर्षाच्या राजभोगा मध्ये एक आठवडासुद्धा सुखाचा गेला नाही. एकंदर जगाचा स्वभाव बघितला तर माणसाला सुखदुःख भोगावे लागते. हे जग म्हणजे कर्मभूमी आहे. प्रत्येकाला सुखदुःख भोगावी लागतात.
शिवाजी राजा हा पुण्यश्लोकी होता तरी त्याला गुडघेदुखीचा त्रास झाला होता. प्रत्येक माणसाला सुख हवे असते दुःख नको असतं. दुःख वाट्याला येतं ते भोगावे लागते . तर मग या दुःखातून सुटण्यासाठी जो मार्ग आहे तो कर्मयोग आहे. तो मार्ग, कर्म तर करावंच लागणार , कर्मफळ भोगावच लागणार , पण त्यातील कर्तेपण जर काढून घेतलंत तर सुख आणि दुःख या दोन्हींची किंमत सारखीच राहील.
No comments:
Post a Comment