चिंतन
श्रीराम,
समर्थांनी लाखो लोकांच्या मनःस्थितीचा अभ्यास करून ४०० वर्षांपूर्वीच डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी काय करावे हे म.श्लोकातून सांगितले आहे. ते म्हणतात - तुटे वाद संवाद तेथे करावा |विवेके अहंभाव हा पालटावा |जनीं बोलण्यासारिखे आचरावे|क्रियापालटें भक्तिपंथेचि जावे ||११५|| म्हणजे आपल्या छोट्याश्या जगात सगळ्यांच्या बरोबर योग्य संवाद साधावा. बुद्धीभेद होऊन घोटाळ्यात भर पडेल अशा ठिकाणी मुळीच जाऊ नये. जे आपण बोलतो तसेच आचरण करावे. म्हणजे आपल्या आत द्विधा मनःस्थिती निर्माण होणार नाही आणि मन सदासर्वदा मोकळे राहू शकते. मात्र जोपर्यंत अहंकार 'मी मी' करत खेळ खेळत बसतो तोपर्यंत अंतर्मुख होता येत नाही आणि विवेक आत रुजत नाही.
विवेक वैराग्य सर्व काही माहित असते. त्याच्या व्याख्या पण आपल्याला पाठ असतात... पण जेव्हा प्रत्यक्ष जीवनात ते वापरण्याची वेळ येते तेव्हा सर्व विस्मृतीत जाते.. आणि ये रे माझ्या मागल्या, सुरू होते.. म्हणजे विवेकयुक्त वैराग्याने आपली बुद्धी जी आत्मबुद्धी करायची असते, ती होत नाही कारण प्रबळ असलेली देहबुद्धी.!
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment