एका शहरात एक वेड्यांचे इस्पितळ होते. तेथील वेडे पहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला. त्याने अनेक वेडे पाहिले. त्यांच्यापैकी त्याने एक तरुण व सुरेख वेडा पहिला. त्याच्या शेजारी बसून त्याने त्याला विचारले की "
अरे तू येथे कसा आलास ?" त्यावर तो तरुण म्हणाला की " तुमचा प्रश्न बरोबर नाही. पण मी त्याचे उत्तर देतो. त्याचे असे झाले की मी लहानपणा पासून बुद्धिमान होतो. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे मी मोठा विद्वान व्हावा.
आईला वाटे मी मोठा श्रीमंत व्हावा. शिक्षकांना वाटे मी पुढारी व्हावा. या साऱ्या गोंधळा मध्ये माझा मी हरवून बसलो. माझे मन कशात लागेना. म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्याने मला येथे आणून सोडले. येथे मला बरे वाटते कारण माझा मी माझ्यापाशी असतो. त्यामुळे मी विचार करू शकतो."
हे झाल्यावर त्या वेडा मनुष्याने त्या माणसाला विचारले "स्पर्धा , शिक्षण आणि महत्वाकांक्षा यांच्यापांयी वेड लागून तुम्ही येथे आलात काय ?" तो म्हणाला " तसे नाही. मला मीचे निरोगी स्वरूप दाखविणारा कोणी आहे काय हे पाहण्यास मी येथे आलो."
तो तरुण वेडा म्हणाला " म्हणजे वेड्याच्या बाजारातून तुम्ही येथे आलात." प्रत्येक माणूस वेडाच आहे. दृश्याचे वेड सोडून आदृष्याचे वेड लागलेली माणसे स्वस्थ होतात.
No comments:
Post a Comment