चिंतन
श्रीराम,
जिथे व्यवहार करायचा आहे तिथे तो त्याच्या नियमानुसार झालाच पाहिजे. मात्र तो करताना हे मी श्रीरामासाठी करीत आहे असे मनात असले पाहिजे. असे असेल तर अनासक्तीने प्रपंच करता येईल आणि आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या डिप्रेशन सारख्या मानसिक आजारापासून स्वतःला बाजूला ठेवता येईल.
भगवंत गीतेत सांगतात, परमार्थाच्या मार्गावरून गेल्यास सुख आणि दुःख या भावनांपासून मुक्त होता येते. ज्यावेळी मन हे मी माझं अहं यांच्या सह इच्छा आणि लालसा यासारख्या दुर्गुणांपासून मुक्त होतं त्यावेळी त्याला शुध्द स्वरूप प्राप्त होऊन सुख आणि दुःख यांच्याकडे ते समदृष्टीने पाहतं. त्यानंतर अंतरात्मा हा प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या पुरुषाशी एकरूप होतो. तो अपरिवर्तनीय, स्वयंप्रकाशी, सूक्ष्म आणि अविभाज्य असतो. ही स्थिती प्राप्त केलेली व्यक्ती ज्ञानसंपन्न, मोहमुक्त आणि संपूर्ण समर्पित असते. आपले संत आणि सद्गुरू ह्यांनी ही स्थिती प्राप्त करून घेतलेली असते आणि साधकाचे ध्येय देखील या स्थितीला पोहचणे असेच असावे असे सद्गुरू सगळ्यांना सांगत असतात.
||श्रीराम ¦|
No comments:
Post a Comment