TechRepublic Blogs

Sunday, May 19, 2024

बिंदू तेथे सिंधू

 एकदा निंबाळला पारमार्थिक बैठकीत अनुभवांबद्दल चर्चा चालू होती. त्यावेळेला श्री.गुरुदेव रानडे यांनी साधकांना विचारले " कुणी नामात (जपात) मोती पाहिले आहेत का ?" काही वेळ गेल्यानंतर एका ज्येष्ठ साधकाने भावपूर्ण अंत: करणाने सांगितले,


 "आपल्या कृपेने मला असा अनुभव आहे." त्यानंतर एका ज्येष्ठ साधक भगिनीने कापऱ्या आवाजात सांगितले मला ही असा अनुभव आहे. श्री.गुरुदेव हसले व म्हणाले "बिंदू हा देव आहे. परमात्म्याचे ते सूक्ष्म रूप आहे. हे सर्वात महत्वाचे आहे. 'बिंदू तेथे सिंधू' असे श्री.अंबुराव महाराजांचे वचन आहे.या बिंदू द्वारे परमात्म्याने साधकवर कृपा केली आहे. ज्याला बिंदू दिसला तो भाग्यवान. या बिंदुल्यात विश्वात्मक अनंतत्व सामावलेले असते. त्यात ईश्वरी शक्ती असते.या साठी पूर्वसुकृताची गरज व सद्गुरूंची कृपाही हवी."

  हा बिंदू पुढे एका पराती एवढा होतो व त्याच्यातून देव प्रकट होतो. " हरिहरांच्या मूर्ती बिंदूल्यात येती जाती " या बिंदुल्याची थोरवी अशा प्रकारची आहे.

No comments:

Post a Comment