TechRepublic Blogs

Tuesday, May 14, 2024

पंचामृत

 चिंतन १३३(१२मे)

                 श्रीराम,

पंचविषयांचे पंचामृत केले, चरणी वाहिले दयाघना ||५

           प्रेमभावनेच्या शुद्ध जलाने चरण कमलांचे प्रक्षालन केल्यानंतर सद्गुरूंच्या चरणांवर पंचामृत अर्पण करायचे असते. हे पंचामृत दुध दही तूप साखर आणि मधाचे करतो. तर पंचविषय म्हणजे शब्द स्पर्श रुप रस गंध असे या विषयांचे पंचामृत दयाघन सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करीत आहे. 

पंचविषय का अर्पण करायचे? तर आपले मन अनंत जन्मांच्या संस्काराने सतत बहिर्मुख राहून विषयात आनंद शोधत असते, आणि त्याने सुखी व दुःखी होत असते. या पाच विषयातील प्रत्येक विषय आपल्याला अनुकूल तरी असतो किंवा प्रतिकूल तरी असतो. यावर आपल्या सगळ्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. हे पंचविषय पंचामृत म्हणून सद्गुरूंच्या चरणांवर वाहणे म्हणजे त्यांच्या सुखदुःखाच्या प्रतिक्रिया अर्पण करणे होय.

            सद्गुरू म्हणतात - विषय आपल्याला त्रास देत नाहीत, तर विषयात अडकलेले मन आसक्ती आणि अपेक्षा त्रास देत असतात.. ते अर्पण करता आले पाहिजे.

                  ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment