चिंतन
श्रीराम
सध्याच्या युगात जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले... अंतराळातील अंतरे कमी होत गेली. तसतशी संवादाची जागा विसंवादाने घेतली गेली. माहितीच्या जागी अपमाहिती आली. मानसिक ताणापासून ते आत्महत्यांपर्यंत प्रवास सहज घडू लागला कारण स्वतःचा स्वतःशी संवाद बंद झाला.
अत्यंत चुकीच्या अहंकाराने स्वतःच्या अंतरंगातील अंतरे वाढत गेली. ती कशी? तर सतत बहिर्मुख राहून.. कायम दुसऱ्यांच्या चुका काढायची सवय लागलेली असते. सतत दुसऱ्यांच्या चुका काढायची सवय लागलेली असते. सतत कोणावर तरी कुरघोडी करायची असते. सतत दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करताना, आपले कुठे चुकत आहे, हे बघायला कोणाला वेळच नाही.
समर्थ सांगतात - अहंता गुणे यातना ते फुकाची ||९७|| अहं अहं म्हणणारी, सतत नाचणारी अहंवृत्ती आपल्याला व्यर्थ यातना देत असते आणि त्याने माणूस डिप्रेशन मध्ये जातो.. व्यसनी होतो. यातून बाहेर यायचे असेल तर संत सांगतात त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ समांतर रेषेत करता आला पाहिजे. त्यातही परमार्थाला प्राधान्य देऊन मग प्रपंच अनासक्तीने केल्यास आयुष्यातील दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती होऊ शकते.
प्रपंच अनासक्तीने करण्यासाठी चित्त शुद्ध आणि चित्त शांत असणे मात्र आवश्यक असते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment