TechRepublic Blogs

Thursday, May 16, 2024

परमार्थ

 *सदुपयोग आणि परमार्थ*

संकलन आनंद पाटील 

*आमच्या पुढे कशीही परिस्थिती, देश, काल, व्यक्ती, वस्तू इत्यादी आले, तरी ती सगळीच्या सगळी* *परम्यातम्याच्या प्राप्तीत साधन सामुग्रीच आहे. जर मनुष्य त्याच्या सदुपयोगाची विद्या शिकेल, तर त्याचे निश्चित कल्याण होते.* 

   *कशीही परिस्थिती का असेना तिचा सदुपयोग केला पाहिजे. जर सदुपयोग करता येत नसेल तर संत महापुरुषाना विचारा, स्वतः विचार करा. भगवंतांचे स्मरण करून त्याला प्रार्थना कराल तर सद्बुद्धी प्राप्त होईल. तिच्या अनुसार आचरण केल्याने उध्दार होईल.*

   *दुःखदायी परिस्थितीचा सदुपयोग सुखाच्या इच्छेचा त्याग केल्याने होतो. सुखाच्या इच्छेनेच दुःख होते. सुखाच्या इच्छेचा त्याग केला तर दुःख होणारच नाही.*

*म्हणून सुख आले किंवा दुःख आले;नफा झाला किंवा* *नुकसान झाले, आजार आला किंवा निरोगिता राहिली, आदर* *झाला किंवा अनादर झाला, प्रशंसा झाली किंवा निंदा झाली, ह्या* *प्रत्येक परिस्थितीत साधकाने सम राहिले पाहिजे. असे सुख यावे, इतका नफा व्हावा, अशी प्रशंसा व्हावी, इत्यादी इच्छा ठेवल्याने तसे होत तर नाही आणि* *निष्कारण दु:खी होऊन बसतो. सुखदायी परिस्थितीत सुखी होणे;* *ही त्याचा 'उपभोग' घेणे आहे आणि दुःखदायी परिस्थितीत दुःखी होणे, हाही त्याचा भोग घेणेच आहे. परंतु दोन्ही* *परिस्थितींचा जर सदुपयोग केला, तर भोग होत नाही, तर 'योग' होतो. अर्थात त्याद्वारे भगवंताशी संबंध होतो. 'भोगी व्यक्ती कधी 'योगी' होऊ शकत नाही. '* *संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment