सन १९४९ साली श्री.गुरुदेव रानडे नेमास बसले होते. त्यावेळेस एका साधकाचे रुप त्यांचा समोर सारखे येत होते. नेम झाल्यावर ते म्हणाले " आज हा साधक माझ्यासमोर का येत आहे?" त्या सुमारास हे साधक फारच प्रापंचिक अडचणीत होते. हे साधक म्हणजे श्री.शंकरराव तेंडुलकर. पुढे त्यांची स्थिती सुधारली. ते जेव्हा निंबाळला आले तेव्हा गुरुदेवांनी त्यांना आपल्या नेमाच्या ,जप करण्याच्या खोलीत बोलावून घेतले.
श्री.शंकररावांचा श्री.गुरुदेवांनाशी एकट्याने बोलण्याचा हा पहिला प्रसंग होता. श्री.गुरुदेव स्वतः जमिनीवर बसले व श्री.शंकर रावांना खाली बसण्यास सांगितले. ते श्री.गुरुदेव यांच्या समोर बसले. गुरुदेवांनी त्यांना अगदी जवळ बसण्यास सांगितले.
त्यानंतर श्री.गुरुदेव स्वतः त्यांच्या जवळ सरकले व मांडीला मांडी लावून बसले. त्यांच्या कानात श्री.गुरुदेवांनी सांगितले " या पुढे तुम्हांला अन्न वस्त्रास कमी पडणार नाही. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हांस येथे वरचेवर यावयास मात्र पाहिजे."
No comments:
Post a Comment