TechRepublic Blogs

Friday, May 31, 2024

पाच मुख्य गोष्टी!*

 *रामायणातील 'ही' पाच मुख्य पात्र, शिकवतात आयुष्यातील पाच मुख्य गोष्टी!*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


राजा दशरथ: वृद्धत्वाकडे झुकल्यावर राजा दशरथाने स्वेच्छानिवृत्ती पत्करून राज्यकारभार श्रीरामांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पदाचा, सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. परंतु दुसऱ्याने जाणीव करून देण्याआधी आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होणे आणि पदाचा मोह त्यागणे गरजेचे आहे. 


प्रभू श्रीराम : अयोध्येचा राजा म्हणून राजपदाची शपथ घेणार तेवढ्यात वार्ता येते वनवासाची! काय असेल तो प्रसंग, कसा असेल तो क्षण, कशी असेल रामाची मानसिक स्थिती? अन्य कोणी असते, तर त्याला हा धक्का सहन झाला नसता, परंतु रामांनी पितावचनाचे पालन केले आणि आनंदाने वनवासदेखील पत्करला. अशा या दशरथपुत्र श्रीरामाचे नाम घेणे केव्हाही चांगलेच, परंतु त्यांचे गुण अंगिकारणे त्याहून चांगले. श्रीरामांच्या चरणांचा ध्यास आपल्याला मंदिरापर्यंत नेईल, परंतु आचरणाचा ध्यास श्रीरामांपर्यंत नेईल!


माता सीता : वनवासात जाण्याची शिक्षा फक्त रामाला मिळाली होती. परंतु पत्नीधर्म म्हणून सीतेने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी तिला विरोध केला. खुद्द रामांनीसुद्धा तिला नाही म्हटले, परंतु सीतेने राजसुखाचा त्याग करून पतीला साथ द्यायची ठरवली. यातून आपल्याला शिकवण मिळते, की कितीही मोठे संकट आले, तरी ही नियतीची योजना आहे असे मानून तिचा स्वीकार करा आणि आपल्या तत्त्वाला तिलांजली न देता सुखदु:खात आपल्या माणसांची साथ द्या. या निर्णयामुळे सीतेला अनेक कष्ट सहन करावे लागले, परंतु तिच्या त्यागामुळेच ती माता सीता म्हणून गौरवली गेली. 


भरत : लक्ष्मण रामाच्या सावलीप्रमाणे सर्वत्र वावरत असला, तरीदेखील बंधू प्रेमाबाबत राम भरताच्या प्रेमाचे दाखले दिले जातात. रामाला वनवास मिळाला, हे कळताच आजोळी गेलेला भरत रामाच्या भेटीला चित्रकुट पर्वतावर येऊन पोहोचतो आणि राज्यकारभार तुम्ही स्वीकारा अशी विनवणी करतो. राम पितृआज्ञेबाहेर नसतात. ते भरताला वडिलांची आणि आईची ईच्छा आणि कर्तव्य पूर्ण कर सांगतात. तेव्हा भरत श्रीरामांच्या पादुका राज्यसिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहतो आणि राम परत येईपर्यंत आपणही राज्याबाहेर छोटीशी कुटी बांधून वनवासी जीवन व्यतीत करतो. यावरून शिकवण मिळते, जी गोष्ट आपली नाही, त्यावर अधिकार दाखवू नका आणि ती ज्याची आहे त्याला आदराने सुपूर्द करा. 


लक्ष्मण : लक्ष्मणाने रामाला सदैव साथ दिली, तरी रामाचे भरतावर अधिक प्रेम होते. परंतु म्हणून लक्ष्मणाने कधीच वाईट वाटून घेतले नाही. तो आपले कर्तव्य निभावत राहिला. म्हणून त्याच्याकडून आपण शिकले पाहिजे, की नाव व्हावे म्हणून काम करू नये, तर काम करत राहावे, आपोआप नाम होते. निष्काम मनाने केलेली सेवा ईश्वरचरणी रुजू होते. म्हणतात ना...जिनके मन कपट, दंभ नही, हो माया, उनके हृदय बसहु रघुराया!


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

अपमाहिती

 चिंतन 

            श्रीराम

         सध्याच्या युगात जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले... अंतराळातील अंतरे कमी होत गेली. तसतशी संवादाची जागा विसंवादाने घेतली गेली. माहितीच्या जागी अपमाहिती आली. मानसिक ताणापासून ते आत्महत्यांपर्यंत प्रवास सहज घडू लागला कारण स्वतःचा स्वतःशी संवाद बंद झाला.

                  अत्यंत चुकीच्या अहंकाराने स्वतःच्या अंतरंगातील अंतरे वाढत गेली. ती कशी? तर सतत बहिर्मुख राहून.. कायम दुसऱ्यांच्या चुका काढायची सवय लागलेली असते. सतत दुसऱ्यांच्या चुका काढायची सवय लागलेली असते. सतत कोणावर तरी कुरघोडी करायची असते. सतत दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करताना, आपले कुठे चुकत आहे, हे बघायला कोणाला वेळच नाही.

                    समर्थ सांगतात - अहंता गुणे यातना ते फुकाची ||९७|| अहं अहं म्हणणारी, सतत नाचणारी अहंवृत्ती आपल्याला व्यर्थ यातना देत असते आणि त्याने माणूस डिप्रेशन मध्ये जातो.. व्यसनी होतो. यातून बाहेर यायचे असेल तर संत सांगतात त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ समांतर रेषेत करता आला पाहिजे. त्यातही परमार्थाला प्राधान्य देऊन मग प्रपंच अनासक्तीने केल्यास आयुष्यातील दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती होऊ शकते.

          प्रपंच अनासक्तीने करण्यासाठी चित्त शुद्ध आणि चित्त शांत असणे मात्र आवश्यक असते.

                  ||श्रीराम ||

Thursday, May 30, 2024

नामोच्चारण

 श्रीराम समर्थ


नामोच्चारण आणि नामस्मरण यांत फरक कोणता ? 


         वस्तुतः दोन्हीमध्यें फरक नाही. दोन्ही नाम परावाणीतूनच उगम पावतात. परंतु नामोच्चारणामधे ती जाणीव नसते तर नामस्मरणामध्यें ती जागी राहते. अर्थात दोन्हीमध्यें नाम एकच असते. पहिल्यामधे अधूनमधून भगवंत मनांत येतो तर दुसऱ्यामध्यें तो सारखा ठाण मांडून बसतो. तरी पहिल्यातूनच दुसरे आपोआप उदय पावाते हें मात्र विसरू नये. *म्हणून नुसत्या नामोच्चारणाने देखील जीवाचे पाप नष्ट होते असा अनुभव येतो*.

               --------- *पू बाबा बेलसरे*


               *********

संदर्भः *सहज समाधी* हे त्यांचे पुस्तक पान ९१[जुनी आवृत्ती] व पान १५५ [नवी आवृत्ती].

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Wednesday, May 29, 2024

नमन

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺* 


      *मनुष्यजन्मास येऊन साधायचे काय ? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमहाराज म्हणाले , ' सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात. भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला पाहिजे. त्याने मनावर पूर्ण स्वामित्व येईल. ही स्थिती प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही . त्याच्या पुढे जावे लागते. संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते. तीच ' न मन ' अवस्था होय. त्यासाठी ' नमन ' हा एकच उपाय आहे. नमन याचा अर्थ भगवंताला अथवा सद्गुरूला संपूर्ण शरण जाणे. '*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

ईशोपनिषद

 ईशावास्य मिदं सर्वं


ईशोपनिषद हे सुरुवातीचं उपनिषद. त्यातला पहिलाच विचार असा आहे की , ईशावास्य मिदं सर्वं , म्हणजे विश्वात जे जे काही आहे ते सर्व ईश्वराच्या मालकीचं आहे आणि त्यानं ते काही काळ आपल्याला वापरायला दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला मिळालेली सत्ता , संपत्ती , शारीरिक ताकद ही सर्व ईश्वराची देणगी आहे.


मग प्रश्न असा येतो की , आपल्याला मिळालेल्या ईश्वराच्या देणगीचा आपण उपभोग आपण घ्यायचा की नाही ? या प्रश्नाचं उत्तर श्रीगोंदवलेकर महाराज फार छान देतात. ते म्हणतात , आपल्या प्रारब्धानुसार ईश्वराने आपल्याला दिलेल्या सत्तेचा , संपत्तीचा , शारीरिक ताकदीचा उपभोग जरूर घ्या , त्यातून आनंद निर्माण करा पण हे करताना ईश्वराला विसरू नका. तसेच ज्या ईश्वराने हे सर्व दिलंय ते त्यानं अचानक काढून घेतलं तर वाईट वाटून घेऊ नका.🙏🙏🙏

Tuesday, May 28, 2024

श्रद्धा

 साखरेचा जेव्हा पाक करतात तेव्हा त्यात  एक गंमत असते. जोपर्यंत पाकात मळी असते तो पर्यंत त्यातून बारीक धूर निघतो आणि बुडबुड आवाज येतो आणि वर फेस निघत राहतो. पण फेस काढून काढून जेव्हा पाकातील सगळी मळी निघून जाते , तेव्हा मग धुरही निघत नाही आणि आवाजही होत नाही. 

मग असतो तो शुद्ध स्वच्छ पाकच असतो. त्याचे छान मिष्टान्न तयार करतात. ते मिष्टान्न देवाच्या नैवेद्यात वाढले जाऊ शकते आणि त्याने आल्यागेल्याचे चांगले स्वागतही करता येते. श्रद्धावान मनुष्याच्या मनावरही अशीच सगळी प्रक्रिया घडते. श्रद्धा आणि ज्ञान यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे. 

जितकी श्रद्धा वाढेल तितके अधिकाधिक ज्ञान प्राप्त होईल. श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्तीची आशा धरणे व्यर्थ आहे. जी गाय निवड करीत खाते ती दूध कमी देते. जी गाय पाला, चारा, कोंडा, कडबा, भुसार इत्यादी जे मिळेल ते गपागप खाते, ती गाय अगदी सुर्र सुर्र दूध देते. तिच्या दुधाची धार कधी संपतच नाही.

Monday, May 27, 2024

मनोबोध

 *भावार्थ मनोबोध*

 *श्रीरविंद्रदादा पाठक*

 संकलन आनंद पाटील

 

*नाम नेमके काय करते? मनावरती काम करते. श्रीमहाराज याला फार सुंदर म्हणायचे, 'नाम काय करते तर ते मनाला उलटे करते' म्हणजे मनच उलटे झाले म्हणजे ते अंतर्मुख होते. ते जाणिवेच्या दिशेने जाऊ लागते. आज* *आपले मन हे बहिर्मुख आहे. इंद्रियाधीन आहे. ते मन आपल्याला जाणिवेपासून लांब घेऊन जाते. या त्रिगुणांमध्ये घेऊन जाते. आपल्या देहाचे चोचले पुरवण्याकडे घेऊन जाते. पण नाम या मनाला उलटे* *फिरवते आणि हळूहळू उलटे करत स्वतःलाच जाणिवेकडे घेऊन जाते. ज्याक्षणी आपले मन जाणिवेमध्ये विलीन होते, त्याक्षणी ही सृष्टी आपल्याला* *परमात्मामय दिसू लागते. आणि हीच नामाची फलश्रुती आहे. हे कितीही वेळा जरी सांगितले तरी ते समजणार नाही. म्हणून* 'कळेना तरी सर्व शोधूनि पाहे ।।'.

*हे कितीही कल्पनेने सांगायचा प्रयत्न केला तरी सर्व काही शोधले तरी ते सापडणार नाही. ते केवळ अनुभूतीने जाणता येते. मग शेवटी नाम या जीवनामध्ये, या जाणीवप्रधान रूपाने सर्व सृष्टीकडे*

*बघायला लावायला लागले की, ही सर्व सृष्टी म्हणजे भगवंताची एक लीला होते. भगवंताच्या लीलेमध्ये जरी काही* *वर-खाली होत असेल, एखादा फायदा-नुकसान होत असेल, जरी आपला देह प्रारब्धानुसार वरखाली गटांगळ्या खात असला, तरी या सर्व गोष्टींमध्ये आपले समाधान हे शाश्वत राहते, कायम राहते.*

*ज्याचे समाधान शाश्वत राहिले, ज्याचे समाधान हे कायम राहिले त्याच्या जीवनातील संशय निघून गेला. तेच समर्थ आपल्याला इथे सांगतात की,* 'जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।'

*मी जीव आहे. हा भ्रम, द्वैतपसारा जातो तो केवळ नामाने जातो. हा जीव असल्याचा संशय, हा वाउगा संशय आपण त्यागू शकतो केवळ नामाने* *आलेल्या समाधानामुळे. हे समाधान टिकवण्यासाठी अखंड नामाची संगत ही* *आत्मज्ञानानंतरदेखील गरजेची असते. त्यामुळे मी ज्ञानी झालो, आता मला नामाची गरज नाही असा क्षण कधीच येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाम हे आपल्या जीवनाचा सारथी असते. अशा नामाचे आपल्या जीवनातील प्रथम* *क्षणापासून, प्रभातकाळापासून आपण जर चिंतन केले तर नामाने येणारी ही स्थिती आपल्याला याच जन्मात अनुभवता येते. हेच समर्थांच्या या श्लोकाचे मर्म. संकलन आनंद पाटील*

॥ जानकीजीवन स्मरण जय जय राम ।।

Sunday, May 26, 2024

उत्कट भाव

 एकदा निंबाळला काही तरुण साधक पू.श्री.गुरुदेव रानडे यांच्या दर्शनाला आले होते. त्यातील एका साधकाने उत्साहाच्या भरात श्री.गुरुदेवांना विचारले "परमार्थात उत्कट भाव पाहिजे, पद भावपूर्ण म्हटले पाहिजे असे म्हणतात. पण भाव म्हणजे काय असतो ?" गुरुदेव त्या साधकाला म्हणाले "तुमचा मुक्काम येथे आठवडा भर आहे ना ? मग चार दिवस थांबा म्हणजे भाव काय असतो ते दिसून येईल." त्या तरुण साधकास याची उत्कंठा लागली.

 चार दिवसांनी एक वयस्कर साधक ज्यांनी नुकतेच नाम (अनुग्रह) घेतले होते ते श्री.गुरुदेवांच्या दर्शनाला आले. त्यांनी आल्यानंतर ज्येष्ठ साधकाकडे  हट्ट धरला की " मला गुरुदेवांच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करावयाचा आहे. तरी तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन चला व तशी विनंती श्री.गुरुदेवांना करा."


 श्री.गुरुदेवांना मुळांत नमस्कार केलेला आवडत नसे त्यातून  पायावर डोके ठेऊन नमस्कार दूरच राहिला. हे त्या ज्येष्ठ साधकाने त्या वयस्क साधकाला सांगितले. पण ते साधक काही ऐकेनात. शेवटी ज्येष्ठ साधक त्यांना घेऊन श्री.गुरुदेवांनापाशी गेले व त्यांना सांगितले की  "ह्यांना आपल्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करायचा आहे."  त्या वयस्क साधकाच्या चेहेऱ्यावरील भावोत्कटता पाहून श्री.गुरुदेव म्हणाले " अहो, एवढेच ना ! मग करू द्या की नमस्कार!" हे ऐकून वयस्क साधक गहिवरले. त्यांनी श्री.गुरुदेवांच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार केला व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

 तो प्रश्न विचारणारा साधक पुढे बसला होता. श्री.गुरुदेव त्याच्याकडे पाहून म्हणाले "याला म्हणतात भाव."

Saturday, May 25, 2024

चिंतन

 चिंतन 

       श्रीराम,

        जिथे व्यवहार करायचा आहे तिथे तो त्याच्या नियमानुसार झालाच पाहिजे. मात्र तो करताना हे मी श्रीरामासाठी करीत आहे असे मनात असले पाहिजे. असे असेल तर अनासक्तीने प्रपंच करता येईल आणि आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या डिप्रेशन सारख्या मानसिक आजारापासून स्वतःला बाजूला ठेवता येईल.

              भगवंत गीतेत सांगतात, परमार्थाच्या मार्गावरून गेल्यास सुख आणि दुःख या भावनांपासून मुक्त होता येते. ज्यावेळी मन हे मी माझं अहं यांच्या सह इच्छा आणि लालसा यासारख्या दुर्गुणांपासून मुक्त होतं त्यावेळी त्याला शुध्द स्वरूप प्राप्त होऊन सुख आणि दुःख यांच्याकडे ते समदृष्टीने पाहतं. त्यानंतर अंतरात्मा हा प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या पुरुषाशी एकरूप होतो. तो अपरिवर्तनीय, स्वयंप्रकाशी, सूक्ष्म आणि अविभाज्य असतो. ही स्थिती प्राप्त केलेली व्यक्ती ज्ञानसंपन्न, मोहमुक्त आणि संपूर्ण समर्पित असते. आपले संत आणि सद्गुरू ह्यांनी ही स्थिती प्राप्त करून घेतलेली असते आणि साधकाचे ध्येय देखील या स्थितीला पोहचणे असेच असावे असे सद्गुरू सगळ्यांना सांगत असतात.

              ||श्रीराम ¦|

Friday, May 24, 2024

यथाशक्ती

 *ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


शिष्याने कुठेही आडवळणाने इकडे तिकडे न जाता, त्याला थेट परमात्मप्राप्ती व्हावी, यासाठी साधनेचा राजमार्ग सद्गुरू शिष्याला दाखवतात.  सद्गुरू सांगतात, साधना नित्य करावी. साधनेत सातत्य असावे. साधना यथाशक्ती, यथामती करावी. यथाशक्ती म्हणजे, जशी जमेल तशी नव्हे, तर पूर्ण शक्ती वापरून करावी.

 ज्या ठिकाणी शक्तीचे शेवटचे टोक गळून पडते, म्हणजे आता यापेक्षा जास्त शक्ती लावता येत नाही, अशा पूर्ण प्रयत्नाने आणि तीव्र संवेगाने साधना करावी. यथामती म्हणजे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत समजून घेऊन साधना करावी.  


*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

Thursday, May 23, 2024

मृत्यू

 *मृत्यू : जीवनातील एक महन्मंगल क्षण !*



*सर्वच माणसं मृत्यूला भितात आणि ते स्वाभाविकही आहे.*

*कारण, कोणालाही इहलोकात आपण निर्माण केलेले गोकुळ सोडून जाण्याची कल्पना दुःखदायक वाटणारच. त्यातल्या* *त्यात आकस्मिक होणारा मृत्यू सर्वांनाच भीतिदायक वाटतो. तेही* *अगदी स्वाभाविक आहे. हे दुःख आपल्यासाठी नसते, तर आपल्यावर अवलंबून* *असणार्यांच्या  असहाय्यतेच्या कल्पनेतून निर्माण झालेले ते एक सात्त्विक दुःख असते, असेच म्हणावे लागेल.*

   *शोक कुणी करायचा? ज्याला आयुष्यात काहीच करता आलं नाही, पारमार्थिक, सुसंस्कार संपन्न जीवन जगता आलं नाही, आला तसा गेला आणि मध्यंतरी* *इतरांना जड भार झाला, उपद्रवी ठरला ई, त्यानं मृत्यूचा शोक करावा. कारण त्याच्या दृष्टीनं जन्म हाच मृत्यू आणि मृत्यू हाच अशुभ जन्म.*

   *म्हणून हे ध्यानात असू द्या की, जीवन चांगलं जगा,सुसंस्कृत जीवन जगा,परमेश्वराच्या* *अस्तित्वाचं भान राखून त्याच्या नामस्मरणाने, साक्षीने सारी कर्तव्य कर्मे करा, ती त्याला अर्पण होणार आहेत याचं भान* *राखा. तुमच्या मुखातून सदा नामजप होत चांगली कर्मे झाली तरी मृत्यू केंव्हाही येवो तो* *जीवनातली महन्मंगल क्षण ठरेल व त्याक्षणी तुम्हाला शाश्वत आनंद भेटेल.

 संकलन आनंद पाटील*

विसरावे...

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*




*देवाकरिता  स्वतःला  विसरावे .*


तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही.

 अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्य आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो.

 त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ?

 भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.


व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. 

हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? 

तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे , विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ?

 ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ?

 मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.


*१४४ .   परमात्म्याचे  स्मरण  ।  यातच  विषयाचे  विस्मरण  ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, May 22, 2024

तृप्त

 *सुखदुःख हे जाणिवेत आहे.आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे.वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही;* *आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.... श्रीमहाराज* 🌹🙏

Tuesday, May 21, 2024

सुखदुःख

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*प्रपंचातले  सुखदुःख  हे  केवळ  जाणिवेत  आहे .*


प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे ? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग ?

 किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे ! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे ? 

भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का ?


'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही.

 वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत ! 

वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.


*वासना  म्हणजे  देवाच्या  विरूद्ध  असलेली  आपली  इच्छा .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, May 20, 2024

नाथबाबा

 *कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.* 


नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघुन गेला. 

त्याच्या मनात एक अधीरता, 

उत्कटता दाटून आली होती. 

घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. 

हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

*नाथबाबा, मला भगवंताचं,* 

*"श्रीकृष्णाचं" दर्शन घडवा.*


एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. 

हा कोण कुठला ब्राह्मण? 

आपली व त्याची ओळख पण नाही, 

त्याला मी कोठे रहातो? 

हे पण माहित नाही. 

माझे घर शोधत शोधत तो आलाय. 

तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या. 

त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.


नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले. 

पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.


नाथबाबा, 

*मला भगवंताच,*

*श्रीकृष्णाच दर्शन घडवा.*


त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. 

नाथांनी त्याला मंचकावर बसवले. 

स्वताच्या हाताने त्याचे पाय धुतले. 

तोपर्यंत गिरीजादेवींनी गुळपाणी आणले. 

ते पाहून त्या ब्राह्मणाच मन भरून आलं.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, 

नाथबाबा, 

मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. 

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणी मला म्हणाले की, 

*मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.* 

आता माझी येथुन जायची वेळ झाली आहे. 

तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तु एकनाथ महाराज यांच्या घरी ये.


नाथबाबा, 

मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते. 

ते कोठे आहेत?


हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली. 

नाथ देहभान विसरले. 

*प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.* 

आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. 

इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगीतले. 

तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकुन हळुहळु खाली बसले. 

गिरिजादेवी भानावर आल्या. 

मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

*ते श्रीखंड्याचे साधेपण,*

*त्याची प्रत्येक हालचाल,* 

*शांतपणे आपले काम करणे,* 

*काल जातानाचं त्याच मुग्ध हसणं.*


नाथांचे डोळे भरून वाहू लागले. 

त्यांनी ध्यान लावले. 

त्यांना समजले की, 

*खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनुन गेली १२ वर्ष रहात होता.*

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. 

दोघांनीही एकमेकांकडे पाहीले. 

गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की.....

*चोर, माखनचोर, चितचोर...!*


बारा वर्ष आमच्या जवळ राहीलास पण कळुनही दिले नाहीस. 

इतक्या वर्षात तु आमच्यावर अपार माया केलीस.

नाथ खांबाला धरून ऊठले. 

त्यांनी रांजण पाहीला, 

त्याला स्पर्श केला. 

श्रीखंड्यान बारा वर्ष खांद्यावरून वाहीलेली कावड पाहीली, तीला स्पर्श केला. 

नाथांच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागले. 

श्रीखंड्या जिथ जेवायला बसायचा, 

जिथ विश्रांती घ्यायचा. 

नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जीथे जीथे झाला होता, 

तीथे तीथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यातील अश्रुंनी, 

श्रीखंड्या जिथे बसत असे तीथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. 

कंठ दाटून आला. 

त्यांनी आकाशाकडे बघीतले. 

आणी त्या म्हणाल्या की,

*हे भगवंता,*

*सगळीकडे तुच आहेस,* 

*डोळ्यात तुच, देहात तुच,* 

*अंतर्बाह्य तुच आहेस.*

आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तुच रहात होतास. 

आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. 

आम्हाला क्षमा कर देवा 

*श्रीकृष्णा.......!*

पण तु जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खुण दे.....


*काय आश्चर्य.....!*


 त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला, 

जोरात वारा सुटला.

अन कोपरयातली श्रीखंड्याची घुंघुरकाठी त्या वारयाने पडली. 

घुंघरांचा आवाज झाला. 

त्या घुंघुरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. 

त्या शेल्यातुन केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.


तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. 

तो आ वासुन हे बघत होता. 

भगवान श्रीकृष्णान त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.


 *आपल्या सगळ्यांची अवस्था*

*पण तीच असते.*

*देव कुणाच्या तरी रूपात*

*आपल्या आसपास रहात असतो,*

*आपली सेवा करत असतो.*

*आपल्याला मदत करत असतो.*

*आणी आपल्याला हे माहीत नसते.*

*कळते तेव्हाच,*

*जेव्हा ती व्यक्ती निघुन जाते.*

जय जय राम कृष्ण  हरी.

👏👏👏


- इदं न मम

🙏🙏🚩🚩🙏🙏

Sunday, May 19, 2024

बिंदू तेथे सिंधू

 एकदा निंबाळला पारमार्थिक बैठकीत अनुभवांबद्दल चर्चा चालू होती. त्यावेळेला श्री.गुरुदेव रानडे यांनी साधकांना विचारले " कुणी नामात (जपात) मोती पाहिले आहेत का ?" काही वेळ गेल्यानंतर एका ज्येष्ठ साधकाने भावपूर्ण अंत: करणाने सांगितले,


 "आपल्या कृपेने मला असा अनुभव आहे." त्यानंतर एका ज्येष्ठ साधक भगिनीने कापऱ्या आवाजात सांगितले मला ही असा अनुभव आहे. श्री.गुरुदेव हसले व म्हणाले "बिंदू हा देव आहे. परमात्म्याचे ते सूक्ष्म रूप आहे. हे सर्वात महत्वाचे आहे. 'बिंदू तेथे सिंधू' असे श्री.अंबुराव महाराजांचे वचन आहे.या बिंदू द्वारे परमात्म्याने साधकवर कृपा केली आहे. ज्याला बिंदू दिसला तो भाग्यवान. या बिंदुल्यात विश्वात्मक अनंतत्व सामावलेले असते. त्यात ईश्वरी शक्ती असते.या साठी पूर्वसुकृताची गरज व सद्गुरूंची कृपाही हवी."

  हा बिंदू पुढे एका पराती एवढा होतो व त्याच्यातून देव प्रकट होतो. " हरिहरांच्या मूर्ती बिंदूल्यात येती जाती " या बिंदुल्याची थोरवी अशा प्रकारची आहे.

योग

 🍁🌿 *समर्थवाणी बोधामृत* 🌿🍁


*श्रीराम!*


‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा श्लोक आपण नेहमी म्हणत असतो. योग म्हणजे संबंध. सदा सर्वकाळ एका भगवंताशीच संबंध राहावा, हे संबंधात्मिका भक्तीचे मर्म आहे. हा योग जन्मोजन्मीचे सर्व भोग संपवून समाधीसुखाचा आनंद देतो. पातंजल योगसूत्रामध्ये योगाच्या ज्या पायऱ्या किंवा अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील शेवटच्या तीन पायऱ्या म्हणजे ध्यान धारणा समाधी. समर्थांनी भगवंताची प्रीती लागलेले दास जन्माला आलेले पाहिले. त्यांची रामप्रीती असंख्य उदाहरणाने सांगितली. त्यावर आपण सूक्ष्म चिंतन केले तर आपल्या मुखात एकच वाक्य येईल,

*बहु धारणा घोर चकीत जालों ।* 


भगवंतावर अनन्यभावाने प्रेम करणारी भक्तमंडळी बघितली की ते त्या अवस्थेला पोचण्यासाठी ज्या अवस्थांमधून गेले त्या अवस्था आपल्याला अतिशय चकित करतात. त्यातील एक अवस्था म्हणजे ‘धारणा’. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे *धारणा नामचित्तस्य स्थानबन्ध: समासतः।* आपले चित्त एका ठिकाणी बांधून ठेवण्याला धारणा म्हणतात. तुमची आमची अवस्था अशी आहे की आपले चित्त प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकते. ज्या चित्तात सर्व प्रकारच्या तमोगुणी विषयांची पकड असते, ते चित्त ‘धारणा’शक्ति विकसित करू शकत नाही. अगदीच क्षुल्लक गोष्टींमध्ये जरा काही मनाविरुद्ध किंवा अनपेक्षित घडले की *‘चित्त दुश्चित्त झाले’* अशी आपली अवस्था. त्यामुळेच भक्त व साधकांची ‘बहु धारणा’ बघितली की आपण कमालीचे विस्मित होऊन जातो. 


आपल्याला जर धारणशक्ति विकसित करायची असेल तर अगोदर ग्रहणशक्ति शुद्ध करावी लागेल. आपल्यात ग्रहणशक्ति आहे परंतु आपले चित्त विषयविचारांचे ग्रहण करीत असल्याने आपण परमात्मचिंतन धारण करू शकत नाही. ग्रहणशक्ति म्हणजे Grasping Power आणि धारणशक्ति म्हणजे Retention Power. चोवीस तासातील जास्तीत जास्त वेळ आपण निंदा, स्तुति, द्वेष, लोभ, मत्सर याच गोष्टी grasp करत राहिल्याने थोडावेळ केवळ देहाच्या पातळीवर केलेला तथाकथित परमार्थ किंवा सात्विक विचार आपण retain करूच शकत नाही. म्हणून आपण अगोदर grasping content म्हणजे ग्रहण करण्याची वस्तु केवळ आत्मवस्तू अर्थात भगवंतच राहील, याचा प्रयत्न करणे जरूर आहे. यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात. हे ध्यान लागण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे ‘नामस्मरण’. श्रीमहाराज म्हणत त्याप्रमाणे दिवसभरातील शक्य तितका वेळ नामात घालवण्याचा प्रयत्न करूया. त्यातून आपल्यात आपोआप ग्रहणशक्ति आणि भगवद्चिंतनाची धारणशक्ति विकसित होईल. आणि याची परिणती सर्व विषयभोग विरून जाऊन सदा सर्वदा रामयोग घडेल. योग्यवेळी सावध होऊन साधनस्थ झालो नाही तर शेवटी आपल्याला म्हणावे लागेल,

*तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥* 


📿 *॥ जय जय रघुवीर समर्थ ॥* 📿

Saturday, May 18, 2024

साधक

 सन १९४९ साली श्री.गुरुदेव रानडे नेमास बसले होते. त्यावेळेस एका साधकाचे रुप त्यांचा समोर सारखे येत होते. नेम झाल्यावर ते म्हणाले " आज हा साधक माझ्यासमोर का येत आहे?" त्या सुमारास हे साधक फारच प्रापंचिक अडचणीत होते. हे साधक म्हणजे श्री.शंकरराव तेंडुलकर. पुढे त्यांची स्थिती सुधारली. ते जेव्हा निंबाळला आले तेव्हा गुरुदेवांनी त्यांना आपल्या नेमाच्या ,जप करण्याच्या खोलीत बोलावून घेतले. 

श्री.शंकररावांचा श्री.गुरुदेवांनाशी एकट्याने बोलण्याचा हा पहिला प्रसंग होता. श्री.गुरुदेव स्वतः जमिनीवर बसले व श्री.शंकर रावांना खाली बसण्यास सांगितले. ते श्री.गुरुदेव यांच्या समोर बसले. गुरुदेवांनी त्यांना अगदी जवळ बसण्यास सांगितले.

 त्यानंतर श्री.गुरुदेव स्वतः त्यांच्या जवळ सरकले व मांडीला मांडी लावून बसले. त्यांच्या कानात श्री.गुरुदेवांनी सांगितले " या पुढे तुम्हांला अन्न वस्त्रास कमी पडणार नाही. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हांस येथे वरचेवर यावयास मात्र पाहिजे."

Friday, May 17, 2024

विरक्ती

 उपरती म्हणजे विरक्ती. 


विरक्ती म्हणजे कर्मावरची श्रद्धाच नाहीशी होणे. ही उपरती आहे. कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे, धडपड आहे ती शांत होणं ही उपरती. उपरती नंतर श्रद्धा. श्रद्धा म्हणजे जे सगळे चालले आहे ते बरोबरच चाललेले आहे. या नंतर समाधान.

 हे जे साधन चतुष्ट शम, दम, तितीक्षा उपरती ज्याच्या जवळ आहे तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. पु.श्री.तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याच्या घराला आग लागली आहे, मी स्वस्थ बसलो आहे. आज माझ्या घराला आग लागली नाही पण ही आग माझ्यापर्यंत येणार आहे.हे भान ज्याला असत तो ज्ञानमार्गी. ज्ञानमार्गाच लक्षण काय तर मी अशाश्वत आहे. माझ्या बरोबरीचे गेले , लहान गेले , मोठे गेले, मी पण जाणार आहे ही जाणीव ज्याच्या आचरणात दिसते , 

तो सर्व व्यवहार करील , पण त्यात तो म्हणेल की हे सगळं तात्पुरतं आहे. ही जाणीव ज्याला सतत राहील तो ज्ञानमार्गी आहे. या जगाला कर्मभूमी म्हणतात.कर्म माणसाला सुटत नाही. माझं जे कर्म आहे ते भोगण्यासाठी मी या जगात आलेलो आहे. एक तुर्की सुलतान होता. त्याने 39 वर्षे राज्य केले. त्याने डायरी लिहिली आहे त्यात त्याने लिहिले की इतक्या वर्षाच्या राजभोगा मध्ये एक आठवडासुद्धा सुखाचा गेला नाही. एकंदर जगाचा स्वभाव बघितला तर माणसाला सुखदुःख भोगावे लागते. हे जग म्हणजे कर्मभूमी आहे. प्रत्येकाला सुखदुःख भोगावी लागतात. 

शिवाजी राजा हा पुण्यश्लोकी होता तरी त्याला गुडघेदुखीचा त्रास झाला होता. प्रत्येक माणसाला सुख हवे असते दुःख नको असतं. दुःख वाट्याला येतं ते भोगावे लागते . तर मग या दुःखातून सुटण्यासाठी जो मार्ग आहे तो कर्मयोग आहे. तो मार्ग,  कर्म तर करावंच लागणार , कर्मफळ भोगावच लागणार , पण त्यातील कर्तेपण जर काढून घेतलंत तर सुख आणि दुःख या दोन्हींची किंमत सारखीच राहील.

Thursday, May 16, 2024

परमार्थ

 *सदुपयोग आणि परमार्थ*

संकलन आनंद पाटील 

*आमच्या पुढे कशीही परिस्थिती, देश, काल, व्यक्ती, वस्तू इत्यादी आले, तरी ती सगळीच्या सगळी* *परम्यातम्याच्या प्राप्तीत साधन सामुग्रीच आहे. जर मनुष्य त्याच्या सदुपयोगाची विद्या शिकेल, तर त्याचे निश्चित कल्याण होते.* 

   *कशीही परिस्थिती का असेना तिचा सदुपयोग केला पाहिजे. जर सदुपयोग करता येत नसेल तर संत महापुरुषाना विचारा, स्वतः विचार करा. भगवंतांचे स्मरण करून त्याला प्रार्थना कराल तर सद्बुद्धी प्राप्त होईल. तिच्या अनुसार आचरण केल्याने उध्दार होईल.*

   *दुःखदायी परिस्थितीचा सदुपयोग सुखाच्या इच्छेचा त्याग केल्याने होतो. सुखाच्या इच्छेनेच दुःख होते. सुखाच्या इच्छेचा त्याग केला तर दुःख होणारच नाही.*

*म्हणून सुख आले किंवा दुःख आले;नफा झाला किंवा* *नुकसान झाले, आजार आला किंवा निरोगिता राहिली, आदर* *झाला किंवा अनादर झाला, प्रशंसा झाली किंवा निंदा झाली, ह्या* *प्रत्येक परिस्थितीत साधकाने सम राहिले पाहिजे. असे सुख यावे, इतका नफा व्हावा, अशी प्रशंसा व्हावी, इत्यादी इच्छा ठेवल्याने तसे होत तर नाही आणि* *निष्कारण दु:खी होऊन बसतो. सुखदायी परिस्थितीत सुखी होणे;* *ही त्याचा 'उपभोग' घेणे आहे आणि दुःखदायी परिस्थितीत दुःखी होणे, हाही त्याचा भोग घेणेच आहे. परंतु दोन्ही* *परिस्थितींचा जर सदुपयोग केला, तर भोग होत नाही, तर 'योग' होतो. अर्थात त्याद्वारे भगवंताशी संबंध होतो. 'भोगी व्यक्ती कधी 'योगी' होऊ शकत नाही. '* *संकलन आनंद पाटील*

चिंतन

 चिंतन 

          श्रीराम,

     भक्तीमार्गाने आत्मनिवेदन भक्ती पर्यंत पोहोचणे किंवा देव पहाया गेलो व देवचि होऊन ठेलो'ह्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि आयुष्याच्या अखेरीला पश्चात्तापाची वेळ आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल तर मनाची भूमिका आणि अंतःकरणातील वृत्तींचा विचार नीट समजावून घेऊन त्यांचा वापर नेमकेपणाने करता आला पाहिजे. आपल्या अंतःकरणात आता कोणती वृत्ती उमटली आहे हे फक्त आपल्यालाच कळत असते. उदा :माझ्या मनात मला एखाद्या व्यक्तीबद्दल राग, द्वेष, लोभ वाटत असला तरी ती व्यक्ती समोर आल्यावर मात्र माझ्या चेहर्‍यावर लोकांना दाखवायला मी त्याची किती काळजी करते, किती प्रेम करते, हे दाखवत असते. त्यामुळे माझ्या आत काय चालू आहे हे समोरच्याला कळू शकत नाही. थोडक्यात, माझ्या मनात उमटलेल्या भावभावनांची मी खरी एकटीच साक्षीदार असते.

             त्यामुळे आपल्या मनात उमटलेली किंवा निर्माण झालेली प्रत्येक वृत्ती कशाची आहे.. रजोगुणाची, तमोगुणाची की सत्वगुणाची आहे, त्यात षड्रिपू किती आहेत, हे स्वतःचे स्वतःला तपासता आले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे करताना माझे काही चुकत आहे हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा स्वतःकडे असावा लागतो.. अन्यथा मी कधीच चुकत नाही. मी वागतो /वागते.. ते बरोबरच असते, असे असेल तर.. राम कृष्ण हरी ||

                         ||श्रीराम ||

Wednesday, May 15, 2024

वेडे

 एका शहरात एक वेड्यांचे इस्पितळ होते. तेथील वेडे पहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला. त्याने अनेक वेडे पाहिले. त्यांच्यापैकी त्याने एक तरुण  व सुरेख वेडा पहिला. त्याच्या शेजारी बसून त्याने त्याला विचारले की "

 अरे तू येथे कसा आलास ?" त्यावर तो तरुण म्हणाला की " तुमचा प्रश्न बरोबर नाही. पण  मी त्याचे उत्तर देतो. त्याचे असे झाले की मी लहानपणा पासून बुद्धिमान होतो. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे मी मोठा विद्वान व्हावा. 

आईला वाटे मी मोठा श्रीमंत व्हावा. शिक्षकांना वाटे मी पुढारी व्हावा. या साऱ्या गोंधळा मध्ये माझा मी हरवून बसलो. माझे मन कशात लागेना. म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्याने मला येथे आणून सोडले. येथे मला बरे वाटते कारण माझा मी माझ्यापाशी असतो. त्यामुळे मी विचार करू शकतो."

  हे झाल्यावर त्या वेडा मनुष्याने त्या माणसाला विचारले "स्पर्धा , शिक्षण आणि महत्वाकांक्षा यांच्यापांयी वेड लागून तुम्ही येथे आलात काय ?"  तो म्हणाला " तसे नाही. मला मीचे निरोगी स्वरूप दाखविणारा कोणी आहे काय हे पाहण्यास मी येथे आलो." 

तो तरुण वेडा म्हणाला " म्हणजे वेड्याच्या बाजारातून तुम्ही येथे आलात." प्रत्येक माणूस वेडाच आहे. दृश्याचे वेड सोडून आदृष्याचे वेड लागलेली माणसे स्वस्थ होतात.

परमात्मास्वरूप

 एक राजा आहे. त्याचे राज्य आहे. राजा सुखाने निजला असतानासुद्धा प्रजा आपापली कामं करतेच ना , तसं हा परमात्मास्वरूप असलेला आत्मा हा आतमध्ये निजलेला आसला तरी त्याची प्रजा काम करीत असते. 

श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राजाने शहर बांधले तर त्याचे हात क्षीणले का ? राजा काय विटा उचलत होता ? तसा हा परमात्मा सर्व कर्ता असूनसुद्धा त्याचे कर्तेपण आपण समजतो तसं नाही. *"असणं"* 

हेच त्यांचे कर्तेपण आहे. श्रीमहाराजांनी याला फार सुंदर दृष्टांत दिला आहे. एका माणसाला तीन मूल होती. भारी खोडकर होती. त्यामुळे वडील घरी नसले की मारामाऱ्या, गडबड , गोंधळ चालत असे. वडील थोडे स्वभावाने कडक होते. अशीच त्यांची गडबड चालू होती. संध्याकाळी वडील घरी आले. जिन्यावर त्यांची पावलं वाजली. मुलांचा गोंधळ एकदम थांबला . त्याला कल्पनाही नाही की मुलं गोधळ करीत होती.

 तर श्रीमहाराज म्हणाले त्याने मुलांचा गोंधळ बंद करण्यात काय काम केलं ? त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच काम केलं ना , तसं म्हणाले परमात्मा कोणालाही काही सांगत नाही काही म्हणत नाही . तो नुसता प्रकट झाला की जग चालतं. परमात्मा कसा आहे तर म्हणाले तो सत्तारूपाने आहे. आपल्याला जाणीव नसली तरी कार्य होईल. पण त्याचे अस्तित्व आहेच. ही जाणीव ठेवणे हा परमार्थ आहे.

एक ध्रुवतारा

 स्वातंत्र्यवीर सावरकर - एक ध्रुवतारा 


काल रात्रीपासून अस्वस्थ आहे फार, झोपेतही सतत वीर सावरकर आठवत होते. खरं तर रणदीप हूडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या चित्रपटाविषयी इतकं काही लिहून आलंय की परीक्षण म्हणून फार काही वेगळं लिहिता येईल असं मला वाटत नाही. हे मुक्त चिंतन आहे, चित्रपटाच्या अनुषंगाने आलेलं. 


सावरकर फार लवकर माझ्या आयुष्यात आले. आमच्या घरात सावरकरांची बरीच पुस्तकं होती, त्यातलं ‘माझी जन्मठेप’ मी नववीत असताना वगैरे वाचलं असेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकिकडे तोंडात काजू किंवा आंब्याची साठं चघळत निवांत पुस्तकं वाचायची अशी मला सवय होती तेव्हा पण ‘माझी जन्मठेप’ वाचताना इतका त्रास झाला होता की खाणं-बिणं तर सोडाच पण कोलूची, एकलकोठडीची वर्णनं वाचताना हमसून हमसून रडले होते मी. बारीची परपीडक वृत्ती तेव्हाही चीड आणणारी होती, पण ह्या सर्व दुःखदायक भावनांना पुरून उरेल अशी सावरकरांची विजिगीषू वृत्ती ही त्या कोवळ्या वयातही प्रेरणा देणारीच होती. 


माझी जन्मठेप वाचताना माझ्या कल्पनेत मी अंदमानच्या त्या काळकोठडीतल्या नरकयातना जश्या उभ्या केल्या होत्या त्याहून किती वाईट यातना प्रत्यक्षात सावरकरांना भोगाव्या लागल्या होत्या हे काल स्क्रीनवर त्याची एक झलक पाहताना प्रकर्षाने जाणवलं. सारखे सारखे डोळे भरून येत होते, दुःख, चीड, बारी आणि जेलरबद्दलची घृणा आणि सावरकरांबद्दलचा आदर ह्या सर्व भावना एकाच वेळी मनात दाटून येत होत्या आणि परत परत मी स्वतःला बजावत होते, की आपण जे अर्ध्या तासात पडद्यावर बघून संपवतोय ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तब्बल दहा वर्षे अंदमान मध्ये भोगले होते. जे हरामखोर आज सावरकरांना ’माफीवीर’ म्हणून हिणवतात त्यांनी एक दिवस अंधारकोठडीत घालवून दाखवावा. सावरकर हे एकमेव राजबंदी असे होते ज्यांना सहा वेळा अंदमान मध्ये सॉलिटरी मध्ये ठेवले गेले. 


चित्रपटात एक प्रसंग दाखवलाय, जेलमधले कुजलेले, सडलेले, निकृष्ट प्रतीचे अन्न इतकी वर्षे खाल्ल्यानंतर शेवटी त्यांची सुटका झाल्यानंतर सावरकर घरचे अन्न यमुनाबाई ताटात वाढताना बघतात तेव्हा ती साधी भाजी-भाकरी पाहून त्यांचा बांध फुटतो. इतक्या अनन्वित छळानंतरही डेव्हिड बारीच्या डोळ्यात डोळे घालून ’आय आऊटलास्टेड यू बारी’ म्हणणारे कणखर सावरकर भावनिक दृष्ट्या क्षणभर विकल होतात ते त्या क्षणी. भारतीय लोकांचा करंटेपणा की ते सावरकरांना सोडून गांधींसारख्या दुबळ्या मनाच्या नेत्याच्या मागे गेले! 


ह्या चित्रपटात गांधी पहिल्यांदा जसे होते तसे दाखवले गेलेत, अहंमन्य, अहिंसेचा अतिरेकी कैवार घेणारे, सदैव मुसलमानांचे लांगूलचालन करणारे, काँग्रेसमध्ये आपल्या आणि आपल्या लाडक्या जवाहरशिवाय दुसऱ्या कुणाही नेत्याला मोठे न होऊ देणारे, मातीचे पाय असलेले सामान्य कुवतीचे नेते म्हणून गांधी ह्या चित्रपटातून आपल्या समोर येतात, आणि म्हणूनच ‘गांधी इतना बडा हो गया’ ह्या सावरकरांच्या प्रश्नातला उपरोध आपल्याला बोचतो. 


चित्रपटात जेव्हा सावरकर विचारतात की ब्रिटिश सरकार तर्फे अंदमान मध्ये काळ्या पाण्याची सजा भोगायला केवळ क्रांतिकारकांनाच का पाठवले गेले? काँग्रेसच्या एकही नेत्याला काळ्या पाण्याची सजा का झाली नाही? एकही काँग्रेसचा नेता फासावर का गेला नाही? त्या प्रश्नाला काय उत्तर आहे कोणाकडे? 


चित्रपटात जेव्हा कोवळी कोवळी अठरा-वीस वर्षांची मुले हसत हसत फासावर जाताना दिसतात तेव्हा जीव तुटतो. चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव... किती उड्डाण पूल आहेत आज भारतात त्यांच्या नावाने बांधलेले, किती संस्था? किती विमानतळ? किती सरकारी योजना? किती रस्ते? विचारा हा प्रश्न स्वतःलाच! 


सावरकर आणि इतर क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक हयांच्या नशीबी अंदमानची कालकोठडी आणि गांधीचा ‘तुरुंग’ म्हणजे पुण्याचा आलिशान ‘आगाखान पॅलेस’, असे का? गांधींच्या लाडक्या नेहरूंसाठी नगरच्या किल्ल्यात स्वतंत्र स्वयंपाकी होता, त्यांना दिवसातून दोन तास बॅडमिंटन खेळण्यासाठीखास कोर्ट बनवले होते, नेहरूंना गुलाब आवडतात म्हणून नगरच्या किल्ल्यात खास गुलाबाची बाग जोपासायला ब्रिटिशांनी परवानगी दिली होती. आणि सावरकरांच्या नशिबी? दिवसातून आठ तास कोलूला जुंपून तेल काढणे! तितके तेल निघाले नाही तर पाठ चाबकाने फोडून काढली जायची. 


अजूनही मला समजत नाही, वीर सावरकरांबद्दल ह्या देशातल्या काही लोकांच्या मनात इतका पराकोटीचा द्वेष का? त्यांच्या त्यागाचा ना कधी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फायदा करून घेतला ना त्यांच्या मुला-नातवंडांनी. सत्तेच्या राजकारणापासून सावरकर कुटुंब कायमच ठरवून दूर राहिले. 


सावरकर त्यांच्या उत्तरआयुष्यात जातीअंतासाठी आणि हिंदू एकतेसाठी लढले. भारत सरकारकडे ना त्यांनी कधी सरकारी सवलती मागीतल्या, न स्वतंत्र भारताच्या कुठल्या पंतप्रधानाने त्यांना भारतरत्न देऊ केले! उलट स्वतंत्र भारतातही ज्यांना दोनदा कारावास भोगावा लागला असे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक! ज्या देशासाठी इतके कष्ट सोसले त्या देशाने, तिथल्या राज्यकर्त्यांनी काय दिलं सावरकरांना? सन्मान तर सोडाच, दिल्लीतल्या निर्बुद्ध राष्ट्रीय पप्पू पासून ते महाराष्ट्रातले गल्लीतल्या गटारात वळवळण्याची देखील लायकी नसलेले क्षुद्र शेणकिडे त्यांच्यावर सतत खोटे निरर्गल आरोप करतात, सत्य सर्व बाहेर आलेले असूनही. 


सावरकर गेले. त्यांच्या वाट्याला जितके भोग आले ते धीरोदात्तपणे भोगून, शांतपणे, स्वतःच्या अटींवर प्रायोपवेशन करून गेले. सूर्यावर थुंकण्याचा गांडूळांनी कितीही प्रयत्न केला तरी गांडूळ गांडूळच असतं. चिमूटभर मीठ टाकलं तर तडफडतं. पण तरीही इतका आंधळा द्वेष का? 


रणदीप हूडाने हा चित्रपट बनवून भारताच्या पुढच्या पिढयांवर अनेक उपकार केलेले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्षितिजावर उगवलेला विनायक दामोदर सावरकर हा तेजस्वी ध्रुवतारा हा होता तरी कसा हे पुढच्या पिढ्यांना बघता तरी येईल. चित्रपटात रणदीप हूडा कुठेच दिसत नाही, दिसतात फक्त सावरकर, पडदा दशांगुळे व्यापून वर पुरून उरलेले. चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा, तुमच्याबरोबर इतरही लोकांना घेऊन जा. स्वातंत्र्यवीर सावरकर हा केवळ एक चरित्रपट नाही, तो स्वतंत्र भारताचा खरा इतिहास आहे, आजवर तुम्हाला कोणीही न सांगितलेला! 


शेफाली वैद्य 



Tuesday, May 14, 2024

पंचामृत

 चिंतन १३३(१२मे)

                 श्रीराम,

पंचविषयांचे पंचामृत केले, चरणी वाहिले दयाघना ||५

           प्रेमभावनेच्या शुद्ध जलाने चरण कमलांचे प्रक्षालन केल्यानंतर सद्गुरूंच्या चरणांवर पंचामृत अर्पण करायचे असते. हे पंचामृत दुध दही तूप साखर आणि मधाचे करतो. तर पंचविषय म्हणजे शब्द स्पर्श रुप रस गंध असे या विषयांचे पंचामृत दयाघन सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करीत आहे. 

पंचविषय का अर्पण करायचे? तर आपले मन अनंत जन्मांच्या संस्काराने सतत बहिर्मुख राहून विषयात आनंद शोधत असते, आणि त्याने सुखी व दुःखी होत असते. या पाच विषयातील प्रत्येक विषय आपल्याला अनुकूल तरी असतो किंवा प्रतिकूल तरी असतो. यावर आपल्या सगळ्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. हे पंचविषय पंचामृत म्हणून सद्गुरूंच्या चरणांवर वाहणे म्हणजे त्यांच्या सुखदुःखाच्या प्रतिक्रिया अर्पण करणे होय.

            सद्गुरू म्हणतात - विषय आपल्याला त्रास देत नाहीत, तर विषयात अडकलेले मन आसक्ती आणि अपेक्षा त्रास देत असतात.. ते अर्पण करता आले पाहिजे.

                  ||श्रीराम ||

रंगले

 *मन हो रामरंगी रंगले*

*सौ. विनयाताई देसाई*

संकलन आनंद पाटील 

*भक्ती म्हणजे निस्सिम प्रेम* *भगवंताच्या निर्गुण रूपावर आणि*

*सगुण रूपावर. आपण केलेली अशी भक्ती आपल्यावर उत्तम परिणाम करत असते. त्या* *भक्तीतून मिळणारी ताकद, उर्जा, शक्ती आपल्या आतपर्यंत पोहचते म्हणजे आपलं आत्मबल,*

 *आत्मविश्वास वाढतो. निर्गुण रूप म्हणजे अव्यक्त स्वरूपातील भगवंत आणि सगुणरूप म्हणजे त्याचं व्यक्त स्वरूप. सगुण* *रूपावर भक्ती, प्रीती जडणं मूर्ती पाहन मन प्रसन्न होणं, बरं वाटणं, आधार व आनंद वाटणं हीच ती भक्ती मधली शक्ती.*


*मुरलीधर कृष्ण, सावळा विठुराया, सात्विक भावातील राम पंचायतन,* *प्रेमवर्षाव करणारी गुरुमाऊली या सगुणरूपाची समर्पण भावाने केलेली साधना म्हणजे भक्ती.*


*भक्त हा नेहमी साधक भूमिकेत असायला हवा.* *भगवंत भेटीची तळमळ हवी.* *तो आहेच पाठी असा विश्वास हवा. आज भजन,* 

*पूजन, वाचन, नामस्मरण झाले, आजचा पाठ संपला असे नाही साधक अवस्था ही सतत* *भक्तीभावाने* *जगायला, वागायला शिकवते. आपण त्या भक्तीमय अवस्थेत जगतो हे सांगावे लागत*

 *नाही, लागू नये समर्थांची करुणाष्टके भक्त मंडळींनी अभ्यासावी. साधक अवस्थेचे दर्शन तिथे घडेल. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरशी मोहमाया... इथून ती केलेली सुरवात, ती तळमळ ,* *अगतिकता, व्याकुळता.... शेवटी म्हणतात, "तुजवीण रामा मज कंठवेना" ही खरी अंतरीची ओढ, भक्ती. 

Monday, May 13, 2024

सूक्ष्मदेह



          *नामस्मरणाचा परिणाम*


          नीलगिरीच्या बाजूला एक मोठा काॕफीचा मळा आहे. त्याच्या श्रीमंत मालकाला एकच मुलगा होता. लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले. तो बी.ए. झाला व आपलें जीवन ध्यानधारणेला लावायचें त्यानें ठरवलें. म्हणून गुरूच्या शोधांत तो हिमालयांत गेला. 

तेथें एका थोर संन्याशाची गांठ पडली. त्याच्याकडून या तरुण मुलांनें संन्यासदीक्षा घेतली. गुरूनें त्याला सोहंचा मंत्र दिला व कांहीं योगप्रक्रिया शिकवल्या. तो मैसूरमधें एका मठांत उतरला होता. 

*हुच्चुराव नांवाचे एक साधक तेथें ज्या घरांत राहात त्या घरातील एका खोलीमधें नारायणाप्पांच्या प्रेरणेनें तेरा कोटी जप झाला होता. जप तेरा अक्षरीं मंत्राचाच झाला.*

 संन्यासी मैसूरला आलेला हुच्चुरावना कळले. ते त्याच्याकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरीं येण्यास त्याला विनवलें. संन्यासी म्हणाला 'मला साडेअकरा वाजता राजवाड्यांत जायचें आहे. त्याच्या आधी पांच मिनिटें मी येऊन जाईन.' ठरल्याप्रमाणें हुच्चुरावनीं त्याला आणलें.

 संन्यासी घरांत आला, ज्या खोलीत तेरा कोटी जप झाला होता तिच्या दाराशी आला. पण तो उंबरठ्यापाशीच थबकला आणि कानडीत म्हणाला, *'अरे, या खोलीमधें प्रचंड प्रमाणांत नाम भरलेलें आहे.' समोर श्रीब्रह्मचैतन्यांची मोठी तसबीर होती. तिच्याकडे पाहून तो म्हणाला 'हा कोण थोर पुरुष आहे ?

 त्याच्याभोवतीं मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो. मी येथे थोडावेळ बसतो.'* म्हणून तो हातपाय धुवून आला आणि सिद्धासनावर डोळे झांकून बसला. पाच मिनिटांसाठीं आलेला तो वीस मिनिटें शांतपणे बसला. जातांना तो म्हणाला *'मोठे रम्य स्थान आहे.'* 

          *नाम घेणाऱ्याचा सूक्ष्मदेह नामाच्या स्पंदनांनीं भरून जातो. पण जेथें नाम चालतें तें स्थानही नामाच्या स्पंदनांनीं भरून जातें. त्या स्पंदनांचा अनुभव येण्यास आपण संवदेनशील व्हावें लागतें.*


               ---------- *प्रा के वि बेलसरे* 


               *******

संदर्भः *साधकांसाठी संतकथा हें यांचे पुस्तक. पान ८१/८२*

संदर्भः श्रीप्रसाद वामन महाजन.

ब्राह्ममुहूर्त

 *ब्राह्ममुहूर्त*


*सर्वप्रथम आपण सर्वांनी हे* *लक्षात घेतले पाहीजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून* 

*"ब्राह्ममुहूर्त" असा योग्य शब्द आहे.*

*ब्राह्ममुहूर्त*

 *हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो.*

*याला "रात्रीचा चौथा प्रहर" अथवा उत्तररात्र असेही म्हणतात.* 

*याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.*


*०१) पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.*


*०२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.*


*०३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो.*

*हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो.*

*हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात* *मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.*


*०४) चौथा फायदा म्हणजे*

*आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते. या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात.*

*ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे :* 

*दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार.*

*या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात.*

*या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.*  *हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.*


*०५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.*


*०६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते.*

*तसेच याकाळात "ॐकार जप*

 *केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.*


*०७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात. त्यासाठी "ब्राह्ममुहुर्तावर" उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.*


*०८) या काळात आपण "ॐ मंत्र जप" साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.*


*०९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.*


*असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस "ब्राह्ममुहूर्तावर" उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो...*


*संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार*

Sunday, May 12, 2024

विस्मयकारक माहिती

 *शिवथर घळीशी संबंधित एका समर्थभक्ताने अनुभवलेली  अत्यंत विस्मयकारक माहिती.* एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली... आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले.एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! "हाय ! मी भोपळे !" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता... इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली... माझी उत्कंठा ताणली गेली.. "हे काय आहे ?" "ही जीपीएस मशीन्स आहेत ...

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! "येस, आय नो... पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?" हसत हसत ते म्हणाले "मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले - "हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !" असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली ... ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले "चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात..." असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो... उघड्या आकाशाखाली...  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

*भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?*

*मी : "९० तरी असेल."*

*भोपळे : "गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?"*

*मी : "तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत."*

*भोपळे: "करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !"*

*असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८... नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !*

*भोपळे :" मी जगभरातील अनेक देश फिरलोय... सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते". आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो - "भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, कसे काय वाट चुकलात ?"*

*"तीच तर गंमत आहे!" भोपळे हसत हसत म्हणाले - "इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !"*

*मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !*

*"डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !" असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले.* 

*भोपळे : "वर पहा, किती आकाश आहे ?"*

*मी :" ७० अंश तरी आहेच आहे."*

*भोपळे :" मग किती उपग्रह दिसावेत ?"*

*मी : निदान २०-२५ ?*

*भोपळे : "करेक्ट, नाऊ लेट्स चेक..." असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली ... आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !*

*भोपळे म्हणाले "पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !" आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्र्कन स्मरल्या !*

*विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !!                                       विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार !*

*म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !*

*अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या... भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला... समर्थांच्या पायावर लोटांगण घातले... आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती... अधिक गंभीर होती... अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !*

*आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !*

*दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल ... तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !*🙏🙏🏼!! जय जय रघुवीर समर्थ !! 🙏🙏🏼

Saturday, May 11, 2024

li.आनंदी°पहाट.il

 🌹🌸🎶🔆🌅🔆🎶🌸🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


           *स्वप्नपूर्तीच्या अपेक्षेची* 

                                               

🌹🎼🌸🔆💞🔆🌸🎼🌹

                       

        *भारतीय संस्कृती नांदली ती नदीकाठी हिरव्यागार निसर्गातील रम्य खेड्यात. या निसर्गाचे मनुष्य जीवनावर  सकारात्मक परिणाम व्हायचे. सभोवतालच्या वातावरणात मन प्रफुल्लीत व्हायचे. पंचेन्द्रिय सुखावायची.*

        *डोळ्यांना हिरवीगार शेते.. रंगीबेरंगी फुले.. फळे दिसायची. पक्ष्यांचा किलबिलाट.. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज असे नैसर्गिक मधुर गान ऐकून कान तृप्त व्हायचे. झाडावरची कच्ची पिकली फळे थेट खात जिभेचे चोचले पुरवले जायचे. फळे.. फुलेच काय पण चिखल मातीच्या सुवासाने नाशिकेलाही आनंद व्हायचा. सभोवती वाहणाऱ्या वाऱ्याने त्वचा कधी थंड तर कधी उष्णता अनुभवायची. यामुळे मन हर्षोल्हासीत व्हायचे. हृदयी आनंद लहरी प्रकटायच्या. यामुळे अत्युत्तम आनंददायी असेच साहित्य, संगीत.. कलेचे दर्शन घडायचे. कितीही कष्ट केले तरी इथे जाणवायचेच नाही. उलट निरामय आरोग्य लाभायचे.*        

        *पण.. पण अचानक सगळेच बदलले. महानगरे वाढली. सारे पोटासाठी महानगरांकडे धावले. गर्दी कोंबायला गगनचुंबी इमारतींची स्पर्धा लागली. जीवघेणी गर्दी सर्वत्र झाली. प्रवासासाठी रेल्वे.. रस्ते.. उड्डाणपूल कितीही बांधले तरीही कमीच पडू लागले. मग जीव गुदमरला. वरकरणी सुखसोई वाढल्या तरीही जीवन अश्वातता निर्माण होत शांतता हरपली. महानगरात सूर्य चंद्राचे दर्शनही अवघड झाले. मुक्त अशा प्राणवायूचा श्वास घेणे अवघड झाले.*

        *आमचे सगळं ऋषी.. मुनी हे खेड्यात कुटीत राहात. आज ही गावे स्वप्नवत झालीत. त्या गावची वाट तर फार फार दूर झालीय.*

        *ज्या गावात हिरवीगार झाडे असतील.. मनातील मधूर संभाषण करणारा सुंदर पोपट असेल.. पक्षी झाडाच्या ढोलीत पिलाकडे धावताना दिसतील, अस्ताला जाणारे सूर्यबिंब स्पष्ट दिसेल. सूर्यकिरणांनी ते ढग रंगीबेरंगी सजलेले दिसतील, माझ्या प्रियेसह मी मनसोक्त गाणे गात हातात हात घेत मनसोक्त फिरेल असे निसर्गसंपन्न गाव जे मला स्वप्नात दिसलेय ते प्रत्यक्षात सापडेल का..*

        *या गाण्यातून शांता शेळके स्वप्नातील गाव प्रत्यक्षात दाखवत आहेत.*


🌹🌸🎶🌴🏕️🌴🎶🌸🌹

   

  *ही वाट दूर जाते,*

  *स्वप्नामधील गावा*

  *माझ्या मनातला का*

  *तेथे असेल रावा*


  *जेथे मिळे धरेला,*

  *आभाळ वाकलेले*

  *अस्ताचलास जेथे*

  *रवीबिंब टेकलेले*

  *जेथे खुळया ढगांनी,*

  *रंगीन साज ल्यावा*


  *स्वप्नामधील गावा,*

  *स्वप्नामधून जावे*

  *स्वप्नातल्या प्रियाला,*

  *मनमुक्त गीत गावे*

  *स्वप्नातल्या सुखाचा,*

  *स्वप्नीच वेध घ्यावा*


🌺🎶🌸🎼💞🎼🌸🎶🌺


  *गीत : शांता शेळके*  ✍

  *संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर*

  *स्वर : आशा भोसले*


    🎼🎶🎼🎶🎼    🎧


    


🌻🌷🥀🎼💗🎼🥀🌷🌻

Friday, May 10, 2024

शुभेच्छा

 *🌺🚩अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🚩🌺*


कंठातून गाण्यात आणि

गाण्यातून अंतरंगात जे नेतात

ते सूर..... *अक्षय्य*👌👌


अनुभवातून वाक्यात आणि

वाक्यातून डोळ्यात जी चमकते

ती बुद्धी... *अक्षय्य*👌👌


वर्दीतून निश्चयात आणि

निश्चयातून सीमेवर उभे असते

ते धैर्य.... *अक्षय्य*👌👌


एकांतातून शांततेत आणि

शांततेतून आनंदात जो लाभतो

तो आत्मविश्वास... *अक्षय्य*👌👌


सुयशातून सातत्यात आणि

सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते

ती नम्रता... *अक्षय्य*👌👌


स्पर्शातून आधारात आणि

आधारातून अश्रुत जी ओघळते

ती माया.... *अक्षय्य*👌👌


हृदयातून गालावर आणि

गालावरून स्मितेत जे तरंगते

ते प्रेम... *अक्षय्य*👌👌


इच्छेतून हक्कात आणि

हक्कातून शब्दात जी उमटते

ती खात्री... *अक्षय्य*👌👌


स्मृतितून कृतित आणि

कृतितून समाधानात जी दिसते

ती जाणीव.... *अक्षय्य*👌👌


मनातून ओठावर आणि

ओठावरून पुन्हा मनात जाते

ती आठवण..... *अक्षय्य*👌👌


*🙏🏻शुभेच्छा अक्षय्य राहोत 🙏🏻*

ज्ञानी भक्त

 *॥श्रीहरिः॥*


मागील श्लोकात भगवंतांनी सांगितले ज्ञानी भक्त मला सर्वाधिक प्रिय आहे. मग इतर भक्त (आर्त,अर्थार्थी,व जिज्ञासू) प्रिय नाहीत का अशी शंका निर्माण होऊ शकते त्या शंकेचे निरसन करण्यासाठी भगवंत म्हणतात.. 


*-----------------------------*


 ॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*उदाराः सर्व एवैते*

*ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।*

*आस्थितः स हि युक्तात्मा* 

*मामेवानुत्तमां गतिम् ॥*

*॥७.१८॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१८) 


*भावार्थ :- सर्वच भक्त चांगले उदार आहेत. पण जो ज्ञानी (भक्त) तो म्हणजे मला माझा प्राणच वाटतो. कारण युक्तचित होऊन तो माझ्याच ठिकाणी स्थिरावलेला असतो.(केवळ माझ्याच) सर्वोत्कृष्ट गतीला तो प्राप्त झालेला असतो. (माझ्याशिवाय दुसरी अन्य श्रेष्ठ गती नाही हे त्याला ज्ञात झालेलं असतं.)*


*-----------------------------*


*भगवंतानी* १६व्या श्लोकात भक्ताचे चार प्रकार सांगितले.आता भगवंत म्हणतात की, हे चारही भक्त थोर आहेतच; परंतु १७व्या श्लोकात वर्णिलेला ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे.



*'चोराच्या हातची लंगोटी'* 

अशी म्हण आहे. म्हणजे काहीही न होण्यापेक्षा काहीतरी होणं चांगलं. मग ते अत्यल्प प्रमाणातही का असेना... 

ही बाब भक्तीच्या बाबतीतही लागू होते. भलेही थोड्यापासूनच सुरुवात होते,भले अन्य लाभासाठी प्रारंभ होवो, परंतु भक्तीची छोटीशी ठिणगी पेटणं हीदेखील मोठी बाब आहे. कारण ही ठिणगीच पुढे जाऊन मोठ्या प्रकाश स्रोतामध्ये  परिवर्तित होऊ शकते.


*याच भावनेने भगवान श्रीकृष्ण सांगतात,* 

ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहे परंतु अन्य भक्तदेखील उदार आहेत. कारण लोभापायी किंवा अन्य कारणांमुळे, कोणत्याही मार्गाने का असेना परंतु

किमान ते माझ्या भक्तीच्या मार्गावर अग्रेसर तर झाले आहेत! कमीत कमी त्यांच्या सत्ययात्रेला सुरुवात तर झाली आहे.


*अन्यथा* लोक आपली कामं पूर्ण करण्यासाठी किंवा दुःख दूर करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबू शकतात. किमान ते ईश्वराला शरण तरी आले आहेत.



*भगवान श्रीकृष्ण म्हणतात -* 

निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झालाय त्यालाच मी माझ्या स्वतःप्रमाणे मानतो. माझ्या दिव्य- सेवेमध्ये युक्त झाल्याने तो निश्चितच माझी, सर्वोच आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो.



*आर्तभक्त* स्वतःच दुःख दूर व्हावे म्हणून भक्ती करतो हे आपण बघितलं.पण उदार आर्तभक्त दुसऱ्याच दुःख दूर व्हाव म्हणून झटतो. हीच मागणी तो भगवंतापाशी करतो. 


*त्याचप्रमाणे* जिज्ञासू भक्तामागे 'उदार' शब्द आला की तो दुसरा का दुःखी आहे, त्याचं दुःख मी कसं कमी करू शकेन, असा विचार करतो. उदार जिज्ञासू भक्त या प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी झटतो. आपल्याला ज्ञान मिळालं तर त्याचा समाजासाठी उपयोग करता येईल असा व्यापक हेतू त्याच्या जिज्ञासेमागे असतो.


*अर्थार्थी भक्त* द्रव्यप्राप्तीसाठी झटत असतो. पण उदार अर्थार्थी भक्त भगवंताजवळ धनाची मागणी करतो ती सात्त्विक कार्यासाठी. धर्मकार्यासाठी संपत्ती आवश्यक असल्यामुळे हा अर्थार्थी भक्त भगवंताजवळ अर्थाची मागणी

करतो. दाराशी आलेला याचक विन्मुख जाऊ नये, अतिथी, अभ्यागतांची सेवा करता यावी यासाठी घर धनधान्यानं भरलेलं असावं हा उदार भाव त्याच्या मागणीत असतो. 


*म्हणूनच,* 

आर्तभक्त, जिज्ञासूभक्त किंवा अर्थार्थी भक्त हे सर्व चांगलेच आहेत; परंतु तुलनाच करायची झाली तर ज्ञानी भक्त सर्वांत श्रेष्ठ आहे. कारण, 'तो माझा आत्माच आहे; आणि माझ्याशिवाय श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही हे त्यानं ओळखलेलं असतं.' असं भगवंत सांगतात.



*सामान्य कामी भक्त आणि ज्ञानी संत महात्मे किंवा ऋषिमुनी यांच्यात भेद हा असणारच.* वसिष्ठ, याज्ञवल्क्य, पतंजली, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज,संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, श्रीगोंदवलेकर महाराज असे एकेक महान ज्ञानी भक्त होऊन गेले आहेत. त्यांनी भगवंतासाठी आयुष्यभर कार्य केलं. जनसामान्यांमध्ये ईशभक्ती जागृत व्हावी यासाठी ते झटले.असे उदार ज्ञानी भक्त श्रेष्ठ होत. किंबहुना ते ज्ञानीजन हे भगवंताचीच विभूती असतात. ते उत्तम गतीला पोचतात.



*एका* शिक्षकांच्या काही विद्यार्थ्यांमध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा चालू असते. त्या शिक्षकांचा हुशार मुलगादेखील त्यांचा विद्यार्थी असतो. एका विद्यार्थ्याला श्रेष्ठ ठरवल्यावर मुलगा वडिलांना विचारतो, 

'मग माझं काय?' 

शिक्षक म्हणतात, 

'अरे, तू तर माझा मुलगाच आहेस!' 

*ज्ञानी भक्ताचं परमात्म्याशी असं नातं असतं.*



*सारांश:*

*सर्व भक्तांमध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो. ज्ञानी हा भगवंताचा जणू आत्माच असतो. किंबहुना भगवंताचा लाडका पुत्र असतो. तो त्याच्याशीच एकरूप झालेला असतो.* 


*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Wednesday, May 8, 2024

ईश्वर

 *॥श्रीहरिः॥*


परमात्म्याचा आश्रय केल्यावर माया तरून जाता येते, हे भगवंताचे अभिवचन असूनही सर्व प्राणिमात्र या मार्गाचा आश्रय का करत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे स्पष्टीकरण भगवंत देतात,


*-----------------------------*

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*दैवी ह्येषा गुणमयी* 

*मम माया दुरत्यया ।*

*मामेव ये प्रपद्यन्ते* 

*मायामेतां तरन्ति ते ॥*

*॥७.१४॥*


*न मां दुष्कृतिनो मूढाः* 

*प्रपद्यन्ते नराधमाः ।*

*माययापहृतज्ञाना* 

*आसुरं भावमाश्रिताः ॥*

*॥७.१५॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१४ ७.१५)


*भावार्थ: कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया अत्यंत कठीण आहे; परंतु जे पुरुष केवळ मलाच अखंडपणे पूजतात, मला शरण येतात, ते या मायेला सहजपणे उल्लंघून जातात, तरतात.*


*जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत.*


*-----------------------------*


*मायेमुळे, प्रकृतीमुळे* किंवा *स्वभावामुळे* ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे. त्या सृष्टीमध्ये, मायेच्या या वैश्विक पसाऱ्यामध्ये अज्ञानी लोक गढून जातात. म्हणजे illusion मध्ये अडकून जातात. मायेमध्ये गुरफटून गेल्यामुळे ते परमेश्वराला विसरतात आणि नाश पावतात. स्वत:च्या नाशाला ते स्वत:च कारण ठरतात.


*आयुष्यातले* भोग यथेच्छ भोगणं हेच खरं जीवन आहे असं या असुरी वृत्तीच्या लोकांना वाटतं. मनुष्य जन्मामध्ये जितका उपभोग घेता येईल तितका घ्यावा, आलेल्या क्षणाचा आनंद लुटावा, भरपूर खावं-प्यावं, मजा करावी;उद्याचं कुणी बघितलंय् अशी त्यांची वृत्ती असते. 


बहुतेक तथाकथित बुद्धिवादी हे चार्वाकवादी असतात.

 

*'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः'*


हे चार्वाकाचं तत्त्वज्ञान! 

'खा-प्या-मजा करा; ऋण काढून सण साजरे करा! या वृत्तीचे लोक परमेश्वराला शरण जात नाहीत. जे उपभोग त्यांना मिळत असतात ते स्वकर्तृत्वानं मिळतात, असा या लोकांचा समज असतो. मेंदूच तसा आभास निर्माण करत असतो. त्यामुळे या विश्वाचा जो नियंता आहे त्याला ते मानत नाहीत.'


'इंद्रियांना जे जाणवतं ते दृश्य जगत् हे अनित्य आहे आणि परमात्मा नित्य आहे, या ज्ञानाची जाणीव मोहामुळे त्यांना होत नाही. या भ्रांतीमुळे अनित्य असं दृश्य जगतच अशा लोकांना सत्य आणि नित्य वाटू लागतं.'



*‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना'* लिहिणारे इक्बाल लाहोरमध्ये वास्तव्याला होते. 


*एक परस्थ निरीश्वरवादी गृहस्थ* त्यांना भेटायला म्हणून लाहोरमधे गेला. जो पत्ता दिला होता तिथे तो इक्बाल यांची चौकशी करू लागला. एकानं सांगितलं, 'ते त्या गल्लीत उजवीकडून पाचव्या घरात रहातात. '


तो गृहस्थ त्या घरापाशी गेला, दार ठोठावू लागला. इक्बालनी दार उघडलं. त्या गृहस्थानं विचारलं, 


'आपणच इक्बाल ना?' 

'नाही, मी इक्बाल नाही...'

त्यांनी दार लावून घेतलं. पुन्हा त्या गृहस्थानं आजूबाजूला चौकशी केली; आणि पुन्हा येऊन दार ठोठावू लागला. पुन्हा इक्बालनी दार उघडलं. 


‘आपणच इक्बाल ना?' त्यानं विचारलं. 

'नाही...' दार लावलं गेलं.


तो गृहस्थ त्या संपूर्ण भागातून फिरला, प्रत्येकाला इक्बालांचा पत्ता विचार लागला. पुन्हा पुन्हा त्याच घराकडे निर्देश होऊ लागला. चार-पाच वेळा तसं घडल्यानंतर तो पुन्हा इक्बालांकडे आणि म्हणाला, 


'मी दहा ठिकाणी चौकशी केली, आपणच इक्बाल आहात हे आता मला कळून चुकलंय् !'


तेव्हा इक्बाल त्या निरीश्वरवाद्याला म्हणाला, 


*'केवळ दहा लोकांवर विश्वास ठेवून मीच इक्बाल आहे यावर तुमची श्रद्धा बसली; मग हजारो तत्त्वज्ञ-दार्शनिक सांगतात की, ईश्वर निश्चित आहे, तेव्हा मात्र तुमचा विश्वास बसत नाही!'* 


त्या निरीश्वरवाद्याला चोख उत्तर मिळालं होतं. जोपर्यंत ईश्वरानुभूती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अशा तत्त्वज्ञ - दार्शनिकांवर एकवेळ विश्वास ठेवला नाही तरी चालेल; पण म्हणून ईश्वर नाहीच या निर्णयापर्यंत येणं योग्य ठरणार नाही.


बुद्धीसारखाच मनुष्याचा आत्मा हा देखील सृष्टीतल्या अन्य वस्तूंप्रमाणे नामरूपात्मक देहेंद्रियांनी आच्छादित झालेला असतो. जो मूढ मनुष्य असतो तो देहालाच सर्वस्व मानतो आणि आत्म्याला विसरून जातो. दिसत नाही म्हणजे नाही, अशी त्याची भूमिका असते. 


*त्यामुळे* देहाचे भोग भोगण्यात तो गढून जातो. त्यामुळे तो सत्कृत्य करत नाही. त्याच्या हातून दुष्कृत्यंच होतात.पण या जगात जे काही आहे ते परब्रह्मच आहे अन्य काही नाही, हे निश्चित. जग चालवणारी शक्ती स्वत: अज्ञात राहून जग चालवत असते. नाटक ही नाटककाराची कलाकृती असते. रंगमंचावरील नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक त्या नाटकाच्या कथेमध्येच गुंतून पडतात. प्रत्यक्ष नाटककाराचा, दिग्दर्शकाचा किंवा नाट्यगृहाचा विचारही त्याक्षणी त्यांच्या मनात येत नाही. 


*त्याप्रमाणे*

ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला विसरून आपण हे जग पहात असतो.नाट्यनिर्मितीमागे नाटककाराचं जसं कौशल्य असतं, तसंच विश्वनिर्मितीमागे ईश्वराचं कौशल्य असतं. फरक इतकाच की, नाटककरानं नाटक लिहिल्यानंतर

तो प्रत्यक्ष सादरीकरणातून अलिप्त राहिला तरी प्रत्यवाय नसतो. पण या विश्व-रंगमंचावर चाललेल्या या महानाट्यात नाटककार अलिप्त नसतो तर त्याच्या उपस्थितीमुळेच नाट्य सादर होत असतं. सादरीकरणात तो नसेल तर सादरीकरण होऊच शकणार नाही! आपण मात्र त्याचा सहभाग विसरून मायेमध्येच गुरफटून जातो. 


ही सृष्टी कशी चालते, ती कुणी निर्माण केली याचा जे विचार करत नाहीत ते मूढ असुरीवृत्तीचे पुरुष होय. हे लोक स्वत:लाच श्रेष्ठ मानतात; परमेश्वराला ते शरण जात नाहीत.


*भगवान श्रीकृष्ण सांगतात -*

'जगामध्ये अधिकाधिक लोक अज्ञानरूपी मायेशी बद्ध असतात. ती मूर्ख माणसं (जे योग्य आणि अयोग्य यांच्यामध्ये फरक करू शकत नाहीत) असुरी स्वभाव म्हणजे अज्ञान धारण करून आपल्या सांसारिक लाभांसाठी उलट-सुलट कामं करत राहतात, ते माझी भक्तीही करत नाहीत आणि मला जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. असे लोक स्वतःमध्येच मस्त,आपल्या सुख-दुःखांना सत्य मानून, त्यांच्यामध्येच गुरफटून मायेच्या दलदलीत पडून राहतात. ते कधीही मुक्त होत नाहीत.'



*सारांश:* 

*सृष्टीनिर्मात्याविषयी आदरभाव नसणं म्हणजेच ईशभावनारहित जीवन जगणं ही दुष्कृती होय. असे जे मूढ पुरुष विश्वनियंत्याचा विचारच करीत नाहीत किंवा ईश्वराला मानीत नाहीत ते कृतघ्न होत.*



*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र- श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Tuesday, May 7, 2024

समाधीसुखाचा.....

 🍁🌿 *समर्थवाणी बोधामृत* 🌿🍁


*श्रीराम!*


‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा श्लोक आपण नेहमी म्हणत असतो. योग म्हणजे संबंध. सदा सर्वकाळ एका भगवंताशीच संबंध राहावा, हे संबंधात्मिका भक्तीचे मर्म आहे. हा योग जन्मोजन्मीचे सर्व भोग संपवून समाधीसुखाचा आनंद देतो. पातंजल योगसूत्रामध्ये योगाच्या ज्या पायऱ्या किंवा अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील शेवटच्या तीन पायऱ्या म्हणजे ध्यान धारणा समाधी. समर्थांनी भगवंताची प्रीती लागलेले दास जन्माला आलेले पाहिले. त्यांची रामप्रीती असंख्य उदाहरणाने सांगितली. त्यावर आपण सूक्ष्म चिंतन केले तर आपल्या मुखात एकच वाक्य येईल,

*बहु धारणा घोर चकीत जालों ।* 


भगवंतावर अनन्यभावाने प्रेम करणारी भक्तमंडळी बघितली की ते त्या अवस्थेला पोचण्यासाठी ज्या अवस्थांमधून गेले त्या अवस्था आपल्याला अतिशय चकित करतात. त्यातील एक अवस्था म्हणजे ‘धारणा’. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे *धारणा नामचित्तस्य स्थानबन्ध: समासतः।* आपले चित्त एका ठिकाणी बांधून ठेवण्याला धारणा म्हणतात. तुमची आमची अवस्था अशी आहे की आपले चित्त प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकते. ज्या चित्तात सर्व प्रकारच्या तमोगुणी विषयांची पकड असते, ते चित्त ‘धारणा’शक्ति विकसित करू शकत नाही. अगदीच क्षुल्लक गोष्टींमध्ये जरा काही मनाविरुद्ध किंवा अनपेक्षित घडले की *‘चित्त दुश्चित्त झाले’* अशी आपली अवस्था. त्यामुळेच भक्त व साधकांची ‘बहु धारणा’ बघितली की आपण कमालीचे विस्मित होऊन जातो. 


आपल्याला जर धारणशक्ति विकसित करायची असेल तर अगोदर ग्रहणशक्ति शुद्ध करावी लागेल. आपल्यात ग्रहणशक्ति आहे परंतु आपले चित्त विषयविचारांचे ग्रहण करीत असल्याने आपण परमात्मचिंतन धारण करू शकत नाही. ग्रहणशक्ति म्हणजे Grasping Power आणि धारणशक्ति म्हणजे Retention Power. चोवीस तासातील जास्तीत जास्त वेळ आपण निंदा, स्तुति, द्वेष, लोभ, मत्सर याच गोष्टी grasp करत राहिल्याने थोडावेळ केवळ देहाच्या पातळीवर केलेला तथाकथित परमार्थ किंवा सात्विक विचार आपण retain करूच शकत नाही. म्हणून आपण अगोदर grasping content म्हणजे ग्रहण करण्याची वस्तु केवळ आत्मवस्तू अर्थात भगवंतच राहील, याचा प्रयत्न करणे जरूर आहे. यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात. हे ध्यान लागण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे ‘नामस्मरण’. श्रीमहाराज म्हणत त्याप्रमाणे दिवसभरातील शक्य तितका वेळ नामात घालवण्याचा प्रयत्न करूया. त्यातून आपल्यात आपोआप ग्रहणशक्ति आणि भगवद्चिंतनाची धारणशक्ति विकसित होईल. आणि याची परिणती सर्व विषयभोग विरून जाऊन सदा सर्वदा रामयोग घडेल. योग्यवेळी सावध होऊन साधनस्थ झालो नाही तर शेवटी आपल्याला म्हणावे लागेल,

*तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥* 


📿 *॥ जय जय रघुवीर समर्थ ॥* 📿

Monday, May 6, 2024

परमेश्वरप्राप्ती

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*🌸  प्रवचने  


*भगवंताची  स्मृति  आणि  कर्तव्याची  जागृति .*


प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे.


ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.


*८८ .   फळाची  अपेक्षा  सोडून  कर्म  करणे  याचे  नाव  कर्तव्य  होय .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, May 5, 2024

श्रद्धावान

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा : मनाकडे नुसते पहाणे सोपे नाही. ते जमले तर छानच. नाहीतर मनाची मनधरणी किंवा आळवणी (persuation) करावी. मनाच्या चांगल्या भागाने दुसऱ्या भागाला पटवावे. तथापि यासाठी मनाच्या चांगल्या भागावरची श्रद्धा दृढ झाली पाहिजे. अंतर्मुखता नामानेच येईल. मनामधे खोल उतरायला नामच उपयोगी पडेल. एकदा श्रीमहाराजांना मी म्हणालो की जगात खरी बुद्धिमान माणसे कमी असतात. त्यावर श्रीमहाराज चटकन म्हणाले, नाही; जगात खरी श्रद्धावान माणसे कमी असतात.*


*🍁अध्यात्म संवाद🍁*

Saturday, May 4, 2024

क्षणभंगुर

 झाडावरुन प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही'... "प्राजक्त" किंवा "पारिजातक" किती नाजुक फुलं..! कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फुल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फुल जमिनीवर ओघळतं. "सुख वाटावे जनात, दुःख ठेवावे मनात " हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं. एवढसं आयुष्य त्या फुलांचं..! झाडापासुन दूर होतानाही गवगवा करीत नाहीत. छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात. आणि केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की. खरंच... ! माणसाचं आयुष्यही असंच... एवढसं... क्षणभंगुर प्राजक्तासारखं... ! कधी ओघळून जाईल माहीत नाही. आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं...!!

जीव आणि आत्मा

 श्रीराम समर्थ


          आत्म्याच्या अनुसंधानांत स्वत:चा पूर्णपणें विसर पडणें हें अध्यात्मसाधनेचें फळ समजावें. सामान्य माणसाला प्रपंच्यामधें स्त्री-पुरुष संयोगांत उत्कटतेचा आणि स्वतःला विसरण्याचा सहज अनुभव येत असल्यानें *जीव आणि आत्मा* किंवा *भक्त आणि भगवंत* यांच्या तद्रूपतेला स्त्री-पुरुष संयोगाची उपमा देतात. *आत्म्याशीं एकरूप झालें असतां सर्व दृश्य मावळतें म्हणून जीवाच्या ठिकाणीं कोणतीहि वासना शिल्लक राहात नाहीं.* तो *आप्तकाम* म्हणजे सर्व वासना तृप्त झालेला, *आत्मकाम* म्हणजे भगवंतावांचून अन्य इच्छा नसणारा आणि *अकाम* म्हणजे मुळीं वासनाच नसलेला असा बनतो. जागेपणीं अवश्य असणारे अनेक संबंध आपोआप अन्तर्धान पावतात. चांगलेंवाईट, भयशोक, उच्चनीच इत्यादि सर्व भेद विलीन होतात. साधकानें भगवंतावर प्रेम करायला शिकलें पाहिजे. आपल्यापाशीं प्रेम नाहीं असें नाहीं, परंतु अनेक ठिकाणीं वाटणी झाल्यानें आपण सर्वस्वीं भगवंताचे होऊं शकत नाहीं. *म्हणून विवेकानें आणि अभ्यासानें इतर ठिकाणचें प्रेम गोळा करून एका भगवंताच्या ठिकाणीं केंद्रित करावें. हें साधण्यास रात्रंदिवस त्यांचें स्मरण फार उपयोगी पडतें.*


               ---------- *प्रा के वि बेलसरे* 


               **********

संदर्भ: *उपनिषदांचा अभ्यास* हें त्यांचेच पुस्तक पान ४४०/४४१

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

Friday, May 3, 2024

संतसंगती

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*




*संगतीचे  जीवनात  अतिशय  महत्त्व  आहे .*


आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. 

संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. 


समजा, काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसर्‍याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की, ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते. 


इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, तर कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील; परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. 

असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ! 


आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. 

व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्‌वासना आणि सद्‌विचार प्राप्त होतात.


एखादा साधू बैरागी असेल. तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, 'मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे; दोघेही भिक्षा मागून आणू , आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ.' पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाराला तो वाटेल ते खायला घालील. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे. 


संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहात असेल तिथून आपण लांब राहात असू; आणि जवळ राहात असलो तरी प्रपंच-कामधंद्यामुळे चोवीस तासांत त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार ? मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल ? तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदासर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय.


*९२.  परमार्थ  साधण्यास  सत्संगती  फारच  उपयोगी  पडते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, May 2, 2024

चिंतन

 चिंतन 

      श्रीराम,

     समर्थांनी लाखो लोकांच्या मनःस्थितीचा अभ्यास करून ४०० वर्षांपूर्वीच डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी काय करावे हे म.श्लोकातून सांगितले आहे. ते म्हणतात - तुटे वाद संवाद तेथे करावा |विवेके अहंभाव हा पालटावा |जनीं बोलण्यासारिखे आचरावे|क्रियापालटें भक्तिपंथेचि जावे ||११५|| म्हणजे आपल्या छोट्याश्या जगात सगळ्यांच्या बरोबर योग्य संवाद साधावा. बुद्धीभेद होऊन घोटाळ्यात भर पडेल अशा ठिकाणी मुळीच जाऊ नये. जे आपण बोलतो तसेच आचरण करावे. म्हणजे आपल्या आत द्विधा मनःस्थिती निर्माण होणार नाही आणि मन सदासर्वदा मोकळे राहू शकते. मात्र जोपर्यंत अहंकार 'मी मी' करत खेळ खेळत बसतो तोपर्यंत अंतर्मुख होता येत नाही आणि विवेक आत रुजत नाही.

                      विवेक वैराग्य सर्व काही माहित असते. त्याच्या व्याख्या पण आपल्याला पाठ असतात... पण जेव्हा प्रत्यक्ष जीवनात ते वापरण्याची वेळ येते तेव्हा सर्व विस्मृतीत जाते.. आणि ये रे माझ्या मागल्या, सुरू होते.. म्हणजे विवेकयुक्त वैराग्याने आपली बुद्धी जी आत्मबुद्धी करायची असते, ती होत नाही कारण प्रबळ असलेली देहबुद्धी.!

            ||श्रीराम ||

Wednesday, May 1, 2024

शरणागती

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


     *व्यवहारामध्ये सज्जन म्हणवून घेण्यासाठी दैवी गुणांचा अभ्यास करणे योग्य आहे , पण परमार्थामध्ये शरणागती हा सर्व गुणांचा राजा आहे. शरणागतीला दोन अंगे आहेत. आतील अंग नामस्मरण आणि राम कर्ता यांचे बनलेले असते. बाहेरील अंग जनप्रियत्वाचे बनलेले असते. बाहेरून मी कधी कोणाचे अंत:करण दुखवले नाही कारण कोणाचे अंत:करण दुखवणे म्हणजे हृदयस्थ भगवंताला दुखवणे होय आणि आतमध्ये मी नामाची तळमळ सांभाळली. श्वास कोंडला म्हणजे जीव कासावीस होतो तसे जरा नाम इकडेतिकडे झाले तर माझा जीव कासावीस होई. नाम सुटले असते तर मी मेलोच असतो. मी तुकामाईंना पूर्ण शरण गेलो. माझा मी उरलो नाही. त्यांना शरण जाईल त्याचे काम हमखास होईल.*

     *🪷श्रीमहाराज 🪷*

नामप्रभात

 

*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


     *आपल्या गुरूने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचे रोपटे लावले आहे आणि तो त्याला काळजीपूर्वक जपत आहे; परंतु आपण मात्र विषयासक्तीची गरम राख त्याला घालतो. त्या राखेच्या धगीने ते रोपटे भाजल्यानंतर मग भगवंताच्या नामाचे थोडेसे पाणी आपण त्यावर शिंपडतो. असे केल्यावर ते रोपटे कसे जगेल ? तसे थोडा जरी विषय भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्यावाचून राहणार नाही हे ध्यानात ठेवा.*


    *🪷श्रीमहाराज 🪷*