*वृद्धापकाळ आणि नामसाधना :-*
अंते मति सः गती,
अर्थात आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जशी बुद्धि होते, तशी मानवाला (जीवाला) गती लाभते. श्रीतुकाराम महाराजांनी तर स्पष्ट्च सांगून टाकले, “याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड होण्या."
श्रीमहाराजांनीही अनेक जणांचा शेवट साधून दिला असा उल्लेख त्याच्या चरित्रात आहे,आणि आजही श्री त्याचे हे ब्रिद ते राखून आहेत. मग हा शेवटचा क्षण ते कसा साधतात किंवा शेवटचा दिवस गोड कसा करायचा,यात नक्की अडचण काय आहे?
’म्हातारपण’ हिच फार मोठी अडचण आहे. म्हातारपणी देहाची आणि मनाची अशा दोन्ही शक्ति कमी होतात. नजर कमी होते, काहीना हातापाय़ांना कंप सुटतो, अन्न पचत नाही, श्रवण शक्ति कमी होते, एकाग्रता कमी होते, काहींना उच्च तर काहींना कमी-रक्तदाब, ह्रदयरोग, मेंदूचा थकवा, मूत्रविकार, दातपडणे, अशक्तपणा, अधिरपणा, कमरेत बाक येणे, पाठदुखी असे एक-ना-अनेक आजार संभवतात. या शारिरीक व्याधिंमुळे कोणत्याही कामात कसून प्रयत्न करता येत नाहित. मनाची अवस्था अतिशय नाजूक झाल्याने अनेकांना उत्साहच रहात नाही. म्हातारपणी काही नविन छंद जोपासावा तर शरिर, मन यांच्याबरोबर आर्थिक बलही नसल्यास, जीवाचा पुरता कोंडमारा होतो. असा चारी बाजूंनी खचलेला व आणखिन आणखि खचत जाणारा वृद्ध जीव हताश –निराश होतो, अत्तापर्यंत जिवनात केलेले सारे चांगले-वाईट कार्य हे त्याला फोल वाटायला लागते. अशा परिस्थित रहाणारा जीव, आपली सुप्त ईच्छा पूर्ण करायला काहीसा हट्टी व दूराग्रही होतो. शरिर, मन व वित्त बल नाही, अशा परिस्थित हट्ट, दुराग्रह –यांच्यामुळे कुटुंबिय मंडळी, नातेवाईक, जुने-नवे मित्र यांच्याशी असले त्याचे मैत्रिपूर्ण संबंध ताणले जाउ लागतात. मग हळू हळू एकेकजण काढतापाय घेउ लागतो. अचानक गळून तड्णारे आप्तसंबंध, यासार्यामुळे तो वृद्धजीव पुरता एकटा पड्तो. मागची वाट पुसलेलि आहे,पूढ्चे काही माहित नाहि व क्षण सहन होत नाहि, असा जीव पार पिचुन जातो. मनाच्या अशा च्छिन्न अवस्थेत काहि माणसे आत्महत्येसारखे विचारही करताना पहाण्यात येतात. काहींना (क्षणिक) यश येते,तर बहुतांशी अपयशी तर होतातच परंतु क्वचित प्रसंगी जन्माचे जायबंदी होऊन बसतात. अशा प्रसंगी, “जळत ह्रदयमाझे जन्म कोट्यानुकोटी” अशा अनुभवातुन त्याला जावे लागते.
मात्र वर नमुद केलेल्या सार्या अवस्था एउनही काही वृद्धजीव फारच शांत, सौम्य असे आढळतात. असे जीव पाहिल्यास नक्कि जणावे की त्याच्या आत नामाचे अनुसंधान स्थिर झाले आहे, व तो जीव (नव्हे साधक) गुरुकृपेच्या छत्राखालि वावरतो आहे. नाम हे एक ’व्रत’ आहे,हे एक-दोन दिवसांची कृति नाहि तर अनेक जन्मांचे व्रत आहे. नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ’गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम.
*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*
!! श्री महाराज !!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!! श्रीराम समर्थ!!
No comments:
Post a Comment