श्रीराम समर्थ
*सुखाचा संसार*
डॉ. राजाभाऊ पाथरकर [मालाडचे जेष्ठ साधक डॉ. भाऊसाहेब पाथरकर यांचे चिरंजीव] यांस विवाहबध्द व्हावे असे श्रीमहाराज [वाणीरुप अवतार] २/३ दा बोलले पण सध्या नको असे ते म्हणत. शेवटी श्रीमहाराजांनी जी मुलगी पसंत केली तिच्याशी श्री राजाभाऊंनी विवाह केला. विवाह झाल्यावर उभयता श्रीमहाराजांचे पाया पडायला आली तेंव्हा श्रीमहाराजांनी योग्य तो उपदेश केला. त्यावर डॉ .राजाभाऊ जरा सलगीने श्रीमहाराजांना म्हणाले :
'आपल्या सांगण्यावरुनच आपल्या पसंतीच्या मुली बरोबर मी लग्न केले. आपली आज्ञा मी तंतोतंत पाळली आहे. तरी माझा संसार सुखाचा होईल असा आशिर्वाद द्यावा'. हे ऐकून श्रीमहाराज जरा हसले व म्हणाले :
'राजाभाऊ संसार सुखाचा होत असता तर श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली नसती. नाथांनी भागवत लिहीले नसते, तुकारामांनी गाथा लिहिली नसती, श्रीसमर्थांनी दासबोध लिहीला नसता. तेंव्हा तुझा संसार सर्वतोपरी सुखाचा होईल हे नक्की सांगता येणार नाही पण परमार्थाला तो हितावह होईल याची मी तुला हमी देतो.
*******
संदर्भंः बापुसाहेब मराठे यांचे हस्तलिखीत
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment